मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर हे संकट का आले.? एकदा हा लेख नक्की वाचा.!

मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर हे संकट का आले.? एकदा हा लेख नक्की वाचा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुमन स्वामींची निस्सीम भक्त .ती गरोदर असताना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपला नवरा विष्णू बरोबर येते. स्वामी म्हणतात तुला संतती मिळेल पण जो काही त्रास होणार ते सहन करायची तयारी ठेव. सुमनला स्वामी वचन खरं होणार ही खात्री होती पण तयारी ठेव या म्हणण्याने तिचा थरकाप उडतो.सुमन या गोष्टीमुळे फार चिंतेत राहायची. सुमन चा भाऊ शिवा जेव्हा स्वामी दर्शनाला येतो तेव्हा स्वामींनी त्याला धान्याचे खाली पोते देतात.

शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणून स्वीकारतो एकदा विहिरीतून पाणी आणताना चिंतेत असल्यामुळे सुमन घसरून विहिरीत पडते तेव्हा तिच्या गर्भातील शिशु चे निधन होते आणि वैद्य गर्भातील बाळ मरण पावले आहे असं विधान करतात आणि सुमन कधीच होणार नाही असे सुद्धा सांगतात हे ऐकून सुमन पार खचून जाते. शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्याने सर्व पीक खराब होते.

शिवा चे सर्व स्वप्न धुळीला मिळतात. त्याच्यावर देशो धडी जायची वेळ येते. अंतरशक्ती ने स्वामी सगळे जाणून घेतात आणि बाळाप्पा ला तिथे पाठवतात.सुमन वेड्यासारखी करते परंतु ती आत्महत्या करायला जात असते . स्वामीच्या कृपेने तेव्हाच सुमन वाचून जाते.स्वामी म्हणतात की बाळप्पा, आमचे जरी भक्त असते त्यांच्या कर्मांची जे काही फळ असते काही भोगावे लागतात ते क्रम त्यांना भोगावे लागतात. पापाचा घडा भरला वरच संपूर्ण जीवन कसे बनते आणि नव्याने जीवनाची सुरुवात होत असते.

आपण आपले भोग मागेपुढे करु शकतो परंतु प्रारब्ध भोग आपल्याला भोगावे लागतात म्हणूनच आम्ही नामस्मरणाला अत्यंत महत्त्व देतो. मनुष्याच्या हातून कळत नकळत परिस्थितीला वश येऊन पाप घडत असतात आणि त्याचे रूपांतर वाईट गोष्टींमुळे होऊ नये म्हणूनच नाम जप केले जाते.प्रारब्ध चुकवण्यासाठी नामस्मरण करायचे असते. लोक म्हणतात परमेश्वर कडे न्याय मिळण्यासाठी वेळ असतो परंतु परमेश्वर सगळ्यांना समान संधी देत असतो कारण परमेश्वर प्रत्येकाला आपले पाप नष्ट करण्यासाठी संधी देत असतो.

जेव्हा आपण त्या पापातून नष्ट होण्यासाठी कोणते प्रयत्न करत नाही तेव्हा परमेश्वर आपला संहार करत असतो. बाळप्पा म्हणतात स्वामी अशा विपरीत परिस्थितीमध्ये माणसाने काय करावे? तेव्हा स्वामी म्हणतात अरे जेव्हा सोसाट्याचा वारा सुटतो तेव्हा मनुष्याने काय करतो ? आपली पांघरलेली गोंघडी घट्ट करतो. जेव्हा मनुष्यावर संकट येते तेव्हा तो देवावरील विश्वास पासून दूर जातो आणि तो म्हणतो मी देवाचे एवढे केले पण तरी माझ्यावर दुःख कोसळले.

अशावेळी स्वामी बाळापा यांना म्हणतात की अशा वेळी भक्त विसरतात की जर यांनी आतापर्यंत नामस्मरण व परमेश्वर यांचे भक्ती केली नसती तर याहून भयानक संकट त्यांच्यावर आले असते.देवाचा धावा व देवांची भक्ती केल्यामुळे संकटाचे स्वरूप व त्याचे परिणाम कमी झाले याची जाणीव त्या भक्तांना नसते म्हणून अनेकदा अज्ञानतेच्या पोटी आपण देवावर आरोप करत असतो.

तिकडे शेत वाया गेल्यामुळे शिवा पूर्णपणे खचला असतो. त्याची पत्नी त्याची सात्वन करते मग त्याच्या मनामध्ये विचार येतो की स्वामीनी आपल्याला धान्याचे रिकामे पोते देऊन एक खूण केली होती हे आठवत असतो ,तो जागेवरून उठलो आणि आपले आयुष्य पुन्हा उभे करण्यास निघतो. स्वामी त्याला सांगतात जसं तू खंबीर होऊन आयुष्यात उभा राहण्याचा प्रयत्न करत आहेस आणि सावरला आहेस तसाच धीर तुझ्या बहिणीला सुद्धा दे. तिथे सुमन वेड्यासारखे वागू लागते.या वेडेपणाच्या नादामुळे गळफास लावायला जाते. परंतु योगायोगाने शिव आणि विष्णू येऊन सुमनला अडवतात आणि घडणारा अनर्थ टळून जातो.

इतक्यात श्री स्वामी समर्थ प्रकट होतात आणि म्हणतात हा वेडेपणा अजिबात करू नको. तुझी मरणाची वेळ अजून निश्चित झालेले नाही आहे.आपण कितीही वेळेच्या आधी मारण्याचा प्रयत्न केला तरी वेळेच्या आधी कुणाला मरण प्राप्त होत नाही ,अशा वेळेस सुमन म्हणते स्वामी बाळाचा दुःख कोणाला सांगावे कारण या क्षणी मला बाळाचा दु:खापुढे काहीच सुचत नाही.

अशा वेळी शिवा ची बायको पुढे येते आणि म्हणते हे घे माझे बाळ ! या बाळाची तुला गरज आहे .मला अपत्य भविष्यात सुद्धा होऊ शकतील परंतु हे बाळ पाहून जेव्हा त्या बाळाला हातात सुमन घेते. त्या बाळाचे संगोपन करु लागते आणि पुढील आयुष्य चांगल्या पद्धतीने व्यतीत करते. या कथेचे तात्पर्य एकच की आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे दुःख येत असतात परंतु जर आपण प्रेमळ निर्मळ मनाने स्वामींची भक्ती आराधना केली तर त्या दुःखाचे स्वरुप तीव्रता मात्र कमी होते म्हणून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नामस्मरण करणे अत्यंत गरजेचे आहे व आपल्या इष्ट देवतेवर आपली श्रद्धा असून सुद्धा गरजेचे आहे आणि त्याचबरोबर आपले मरण हे निश्चित आहे.

परंतु मरणाची वेळ सुधारलेली आहे हे मरण वेळेच्या आधी नाही त्यानंतरसुद्धा नाही वेळेवरच तुमचे मरण लिहिलेले आहे त्यामुळे कोणतेही कार्य करत असताना त्याचा हजारदा विचार करायला हवा आणि आपल्या आपली इष्ट देवतेवर श्रद्धा असायला हवी.फक्त दुःखाच्या क्षणी देवतेला आठवून चालणार नाही तर सुखाच्या वेळी सुद्धा आपल्याला आपल्या इष्ट देवतेची कृपादृष्टि प्राप्त करायला हवी..

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *