संजीवनी बुटी सुद्धा फेल आहे यासमोर, धरतीवरील अमृत आहे हि वनस्पती, कुठे मिळाली तर सोडू नका.!

संजीवनी बुटी सुद्धा फेल आहे यासमोर, धरतीवरील अमृत आहे हि वनस्पती, कुठे मिळाली तर सोडू नका.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपला निसर्ग आपली जननी आहे. याच निसर्गात आपला ज’न्म झाला. सोबतच अनेक जीव-जंतू व वृक्ष झाडे देखील याच निसर्गात उदयास येतात. या तील काही वनस्पती चमत्कारिक असतात होय आज आम्ही तुम्हाला अशा वनस्पती बद्दल माहिती देणार आहे जो आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवतो. याचे सेवन केल्यास तुमचे पाचनतंत्र देखील मजबूत बनते. चला तर विलंब न करता जाणून घेऊया या भाजी बद्दल..

तर मित्रांनो, शेवग्याच्या शेंगांची फुले, पाने व शेंगा तिन्ही आपण खायला हव्या. मित्रांनो आपल्याला शेवग्याची फुले व पाने घ्यायची आहेत. आयुर्वेदानुसार याच्या पानांमध्ये, फुलांमध्ये, शेंगांमध्ये व्हिटॅमिन सी संत्र्या पेक्षा सात पटीने जास्त प्रमाणात आढळते. शेवग्याच्या शेंगांना आपण आमटी मध्ये तसेच भाज्यांमध्ये शिजवून खातो. याच्या पानांची व फुलांची देखील भाजी बनवली जाते. ह्याचे सेवन केल्यामुळे आपली रोगप्रतिरोधक शक्ती वाढते. यांच्यामध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण गाजरापेक्षा चार पटीने जास्त असते.

व्हिटॅमिन ए आपल्या डोळ्यांसाठी खुप फायदेशीर असतो. यामुळे आपल्याला चष्मा लागत नाही आणि लागला असेल तर तो निघून जायला मदत होते. आपण म्हणतो दुधामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शिअम असत पण यामध्ये दुधापेक्षाही जास्त प्रमाणात कॅल्शिअम असते. तुम्हाला गुडघे दुखत असतील, सांधेदुखीचा त्रास असेल, मान दुखत असेल सर्व प्रकारचे आजार या भाजीमुळे बरे होतात.

हाडांच्या दुखण्यावर तर हे रामबाण उपाय आहे. अजून पर्यंत जर तुम्ही याचे सेवन केले नसेल तर नक्की करा. याच्या फुलांची व पानांची भाजी बनवली जाते. शेवग्याच्या शेंगा तर सर्व जण भाजी मध्ये वगैरे वापरतातच. हे खूप चविष्ट आणि पौष्टिक सुद्धा असत. याच्यामुळे बरेच आजार दूर होतात. म्हणून आयुर्वेदा मध्ये याला औषध म्हटल जात. कॅल्शिअम, मॅगनिशीम, व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन सी हे पोषकतत्त्व यामध्ये आढळतात. मित्रांनो, शेवग्याच्या शेंगांच्या फुलाची भाजी जर तुम्ही खाल्ली तर तुमचं पोट साफ होईल, मूळव्याधाचा त्रास तुम्हाला कधीही होणार नाही.

बरेचशे लोक याच्या पानांना उन्हामध्ये सुकवून जेव्हा याचा सिजन नसतो तेव्हा भाजी म्हणून वापर करतात. याची जी फळ असतात ते वात होऊ देत नाहीत. याच्या पाना, फुलांच्या सेवनाने नेत्ररोग होत नाही. तसेच हे आपल्या लिव्हर ला साफ ठेवते. आपल्याला थोडी फुले घ्यायची आहेत. याच्या पानांच्या भाजी साठी पानं बाजूला ठेवून द्या. त्यांनतर या पानांना नीट स्वच्छपणे या पानांना धुवून घ्यायचे आहे. तुम्ही जशी नेहमी पालेभाजी बनवता त्याचप्रमाणे या पानांची देखील भाजी बनवायची आहे. खूप चविष्ट आणि पौष्टिक असते हि भाजी.

जर तुम्हाला कुठे सूज आली असेल, हाडांमध्ये खूप दुखत असेल तर तुम्ही याच्या पानांचा चुरा करून, थोडंसं राईच तेल टाकून गरम करून, लेप तयार करून घ्यायचे आहे आणि ज्या ठिकाणी त्रास आहे तिथे लावा. तुम्हाला बरं वाटेल. ज्यांना स्टोन ची समस्या आहे, त्यांनाही हि भाजी खायला हवी. पोटामध्ये जंतू होतात, अशावेळी याच्या पानांना पाण्यामध्ये उकळवून ते पाणी प्यायला तर पोटातील जंतू निघून जातात. बीपी कंट्रोल मध्ये राहत. ज्यांचं ब्लड प्रेशर कायम जास्त असत, त्यांनी याचं सेवन नक्की केलं पाहिजे.

तर ज्यांना लठ्ठपणाचा त्रास आहे त्यांनी, मूठभर पान घ्यायची आहेत आणि नीट पाण्यामध्ये उकळवून घ्यायची आहेत आणि गाळून घाययचे आहे आणि त्या पाण्याला रोज प्यायचे आहे. रोज सकाळी उपाशी पोटी हे पाणी प्यायचे आहे. सलग दहा दिवस हे पाणी प्यायल्याने तुम्हाला फरक दिसू लागेल. तुम्ही या पाण्याला गरम गरम च प्यायचे आहे. त्यामुळे लवकर वजन कमी होण्यास मदत होईल.

यामुळे तुमचं बेली फॅट कमी होण्यास मदत होईल, वजन कमी होईल. जर तुम्हाला कुठे सूज आली असेल तर याचे सेवन केल्याने सूज कमी होते. याच्या पानांना सुकवून त्याचे चूर्ण बनवले जाते. प्रोटीन, व्हिटॅमिन आणि अजून बरेच पौष्टिक तत्व असतात याचा पानामध्ये, फुलांमध्ये, शेंगांमध्ये. तुमच्या केसांच्या समस्या दूर होतील, चेहऱ्यावर चमक येईल व पोटाच्या समस्या असतील तर त्या देखील दूर होतील. कफ, ऍ’सिडिटी, मूळव्याध हे सर्व आजार याच्या सेवनाने बरे होतात. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा शेवग्याची भाजी नक्की खा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *