चांगली वेळ येण्यापूर्वीच मिळतात हे ६ संदेश; साक्षात लक्ष्मी माता होते प्रसन्न, जाणून काय आहेत ते संकेत.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे येत असतात. वाईट काळ येत असतात त्या काळामध्ये आपण त्या संकटांना धीराने सामोरे जात असतो परंतु आपल्या जीवनामध्ये शुभ सकाळ येण्याआधी आपल्याला त्याचे काही संकेत प्राप्त होत असतात. ते संकेत नेमके कोणते आहेत ते संकेत कसे ओळखायचे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
सकाळी जेव्हा आपण झोपेतून जागे होतो आणि आरशासमोर जाऊन आपला चेहरा पाहतो, अशा वेळी जर आपला चेहरा अतीशय तेजल व प्रतिभावंत दिसत असेल तर असे समजायचे कि आपला चांगला काळ जवळ आलेला आहे. याचा अर्थ असा की आपण जर कोणतेही कार्य हाती घेतले तर ते कार्य यशस्वी होणार आहे.
जर आपले डोळे फड पडत असेल तर हे शुभ तसेच वाईट संकेत मानले जाते. पुरुषांसाठी उजवा डोळा फडकणे शुभ मानले जाते तर महिलांसाठी डावा डोळा फडकणे शुभ मानले जाते. जर आपला शुभ डोळा फडफड लागतो त्या दिवशी नक्कीच काहीतरी चांगली बातमी मिळते असे मानले जाते.
जर समजा आपल्या दाराजवळ गाई ने तोंड करून जर हंबरत असेल तर हे सुद्धा शुभ संकेत मानले जाते याचा अर्थ आपल्याला नक्कीच एखादी चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे असे म्हटले जाते त्याच बरोबर जर समजा मांजरीने आपल्या घरामध्ये पिल्लांना जन्म दिला असेल तर ते शुभ धनाचे चांगले प्रतीक मानले जाते. माकडाने एखाद्या फळाचे तसेच फळ खाऊन आपल्या घरांमध्ये त्याची बी टाकल्यास याचा अर्थ आपल्याला धनलाभ होणार आहे असा होतो.
ज्या घरामध्ये काळा मुंग्या छतावर व भिंतीवर फिरत असतात त्या घरामध्ये प्रगती खूप मोठ्या वेगाने होत असते. जर एकाच ठिकाणी काळया मुंग्या आपल्याला जमलेल्या दिसल्यास अशावेळी आपल्याला धनलाभ होण्याची शुभ संकेत मानले जाते. अचानक कोणत्याही मार्गाने आपल्याकडे पैसे देऊन टाकतो त्याच बरोबर जर रात्री गाईचा हंबरणे चा आवाज ऐकू आला तर हा आवाज सुद्धा शुभ मानला जातो. जर घरामध्ये कबुतरांनी घरटे तयार केले तर हे सुद्धा शुभ संकेत मानले जाते.
घरामध्ये मोर व निळकंठ पक्षी जर आला तर हे सुद्धा शुभ संकेत मानले जाते. जर तुम्हाला स्वप्नामध्ये स्वच्छ पाणी दिसले तर याचा अर्थ तुम्हाला लवकरच धन लाभ होणार आहे. आपण कपडे बदलताना आपल्या खिशातून पैसे पडणे हे सुद्धा शुभ संकेत मानले जाते. जर आपण बाहेर जाताना आपल्याला एखादा कोळी जाळे विणताना दिसले तर आपण जे कार्य करण्यास बाहेर जात आहोत ते कार्य पूर्णपणे यशस्वी होतील असा याचा अर्थ होतो.
आपण बाहेर जाताना एखादा पक्षी आपल्या समोर येऊन बसला आणि पंख न हलवता तसाच जर बसलेला असेल तर याचा अर्थ आपल्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. जय समजा आपण मुलाखतीसाठी जात असू आणि अशावेळी जर आपल्याला गाय व नारळ दिसले तर ही नोकरी आपल्यासाठीच आहे असं याचा अर्थ असतो.
या नोकरी मध्ये आपल्याला खूप यश प्राप्त होते त्याचबरोबर जर आपल्याला स्वप्नांमध्ये हिरवे झाड हिरवे गवत तसेच हिरव्या झाडांच्या बाजूला पाण्याचा स्त्रोत दिसला तर आपल्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत असा याचा अर्थ असतो व आपल्या जीवनामध्ये धनलाभ होणार आहे हेसुद्धा मानले जाते.
देवपूजा करताना आपण देवांना वाहिलेली फुले व पाने अचानक आपल्या समोर पडले तर याचा अर्थ असा होतो की आपल्याला देवाने आशीर्वाद दिलेला आहे व आपली पूजा मान्य केलेली आहे. जर आपण लग्नाची बोलणी करताना व मुलगी किंवा मुलगा पाहतांना जर आपण जात असू आणि रस्त्यावर आपल्याला एखाद्या लाल रंगाची साडी नेसलेली महिला तसेच शृंगार करून असलेली महिला जर दिसली तर हे स्थळ निश्चित होते असा याचा अर्थ होतो आणि त्याच बरोबर जर आपण परीक्षेला जाताना अचानक आपल्या समोर एखादी फुल पडले तर आपल्याला ती परीक्षा अगदी सोपे जाणार आहे असे मानली जाते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.