बाळूमामा आपल्या भक्तांची परीक्षा कशी पाहतात हे जाणून तुम्हीही थक्क व्हाल.!

बाळूमामा आपल्या भक्तांची परीक्षा कशी पाहतात हे जाणून तुम्हीही थक्क व्हाल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण प्रत्येक देवी देवतांची पूजा करत असतो. देवी दत्ता आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देत असतात परंतु अनेकदा परमेश्वराची भक्ती करत असताना वाटेमध्ये अनेक अडचणी अडथळे निर्माण होत असतात. या अडचणी, अडथळे कधीकधी भगवंतानी निर्माण केलेले असतात ,जेणेकरून आपला भक्त किती शक्तिशाली आहे व सहनशील आहे याचा अंदाज परमेश्वर घेत असतो आणि म्हणूनच जीवन जगत असताना सुद्धा आपल्याला अनेकदा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते परंतु आपण त्या अडचणींना कशा पद्धतीने सामोरे जातो हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे.

अशाच पद्धतीची एक महत्त्वाची माहिती आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. संत बाळूमामा सर्वांचे परिचयाचे आहेत. संत बाळूमामा आपल्या भक्तांवर खूपच प्रेम वर्षाव करत असतात. भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात परंतु बाळूमामा कधी कधी आपल्या भक्तांच्या सुद्धा परीक्षा घेत असतात आणि या परीक्षेमध्ये भक्तां सोबत बाळूमामा अशा पद्धतीने राहतात व बाळूमामा आपल्या भक्तांना कृपा आशीर्वाद कशा पद्धतीने प्राप्त करतात याबद्दलचा एक अनुभव आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

या अनुभवामुळे तुम्हाला सुद्धा परमेश्वराची भक्ती प्राप्त करण्यासाठी मदत होणार आहे आणि जर तुम्हालाही असे काही संकेत भविष्यात प्राप्त झाले तर समजा की ही सगळी कृपा भगवंताची आहे आणि त्या संपूर्ण परिस्थितीला धीराने सामोरे जा चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

बाळूमामा आपल्या भक्तांची नेहमी परीक्षा पाहत असतात.आपण या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न नक्की करा. एकदा दूर गावी मामांचा मुक्काम होता. या गावी मुक्कामी असताना मामांची बकरी कोणत्या तरी विचित्र आजाराने मरण पावू लागली यावेळी नीलाप्पा त्यांनी एक औषध घेण्यास सहकारी यांना जवळच्या गावात पाठवले. नीलाप्पा स्वामी सह जवळच्या लींगापुर गावाला निघाले.

या गावात नीलाप्पा नावाचा धनगर होता. याला या रोगावर औषध ठाऊक होते धनगरकडे जेव्हा स्वामी आणि नीलाप्पा गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की डाव्या बाजूला झुकलेल्या कडूलिंबाची साल आपल्याला शोधावी लागेल. यावेळी रात्र झालेली होती आणि रात्री तिघेही जण हातात कुऱ्हाड घेऊन रानामध्ये ही वनस्पती शोध, हे झाड शोधण्यासाठी निघाले रानात चालले असताना वाटेमध्ये अनेक विचित्र गोष्टी करू लागल्या. जसे की सर्वात प्रथम एका मोठ्या देवळासारखे त्यांना काहीतरी दिसले.

आकाशामध्ये अत्यंत तेजस्वी प्रकाश दिसला आणि काही क्षणातच हा प्रकाश आणि हे देऊळ एकदम बंद व गायब झाले. सारे दिसेनासे झाले. एवढ्या त्या जंगलात त्यांना औषधाचे झाड दिसले.

मोठ्या झाडाची त्यांनी रीतसर पूजा केली आणि या झाडाची साल आणि पाने तोडण्यास सुरुवात करू लागले मात्र त्यांच्या हातातील कुऱ्हाड अनपेक्षितपणे निसटून खाली पडली त्यामुळे स्वामी भयभीत झाला आणि निल्लापा ला हाक दिली तेव्हा त्यांनी बाळूमामा कडून आणलेला भंडारा कडु लिंबाच्या झाडावर फेकला आणि त्यानंतर या झाडाची पाणी झोडपून ती जमिनीवर पडू न देता कांबळीवर चिरडून गोळा केली अशा प्रकारे या झाडाची ही सामग्री गोळा करून परत येत असताना त्यांना वाटेत एक कुत्रा भेटला. तो अत्यंत भयंकर होता.

तो कुत्रा उग्र होता त्याचे रूप पाहून ते तिघेही हादरले आणि घाबरले अश्या वेळी तिघांची फाटाफूट झाली ते जमिनीच्या दिशेने धावू लागले तेवढ्यात आकाशातून अतिशय भयंकर अशा प्रकारचे आवाज येऊ लागले. या सगळ्याचा परिणाम असा झाला की स्वामी बेशुद्ध पडला.

सकाळी जाग आली तेव्हा ती सूर्योदयाच्या वेळी त्याने पाहिले की कोणीही त्याच्या जवळपास नव्हते तो एकटाच होता आणि मग तो एकाकी आपल्या गावाच्या दिशेने चालू लागला मात्र योगायोगाने ओढ्याच्या काठी दिसली आणि त्यांची भेट झाली आणि मग तिथून एकत्रपणे हे तिघे बाळू मामांकडे चालत केले मामांनी घडलेली सर्वच्या सर्व विचित्र प्रकार क्रमशः अगदी क्रमवार त्या तिघांना सांगितले. बाळूमामा पुढे म्हणाले की मी मुद्दाम तुमची परीक्षा बघितली पण तुम्ही भिऊ नका. भक्तावर जेव्हा संकट येते तेव्हा सेवकांच्या रक्षणाची जबाबदारी ही माझी असते.माझ्या आज्ञेप्रमाणे वागणारे माझे जे भक्त असतात त्यानी अजिबात भिऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *