दुसऱ्यांच्या वाईट नजरेपासून वाचायचे असेल तर करा हा उपाय; जीवनातील सर्व संकटे नाहीशी होतील..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो मंगळवार हा हनुमानाची उपासना करण्याचा दिवस, अनेक लोक श्री हनुमानाची भक्ती करतात. पण त्यांना माहितीच नसते कि व्रत करण्याचे काय नियम आहेत व हे केल्याने काय लाभ होतो. आणि कशाप्रकारे श्री हनुमानाची विशेष कृपा होण्यासाठी हनुमान चालीसा पठन केले पाहिजे. अनेकांना व्रत करण्याचे योग्य नियम माहित नसल्याने त्यांना अधिक लाभ मिळत नाही.
श्री हनुमान हे चिरंजीवी आहेत व कलियुगातही अस्थित्वात असलेले देवता आहेत. म्हणून जर तुम्ही मंगळवार या दिवशी श्री हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी विशेष उपाय केले तर त्याचा शीघ्र लाभ तुम्हाला मिळतो. जीवनात सफलता येते प्रत्येक संकटापासून आपण दूर राहतो. अनेक वेळा आपण एखाद्या शुभ कार्यासाठी बाहेर पडत असता व ते लोक जे आपल्यावर जळतात ते उलटेसुलटे प्रश्न आपल्याला विचारतात. व यामुळे कार्यात विलंब होतो.
याला वाईट नजर लागणे असेही म्हणतात. यामुळे अनेकवेळा आपण आजारही पडतो. सतत मन बेचैन राहते, मनात एक प्रकारची भीती राहते, आत्मविश्वास कमी होतो. या सर्व परिस्थितीत मंगळवारी हनुमानाचे व्रत खूपच प्रभावशाली ठरते. अनेक लोकांच्या जीवनात मंगळ ग्रहामुळे लग्नाला विलंब होतो. यासाठीही मंगळवारचा दिवस प्रभावी ठरतो. पण हे व्रत नियमानुसार करणे खूप गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया या व्रताचे नियम.
मित्रांनो हे व्रत २१ मंगळवार ठेवले जाते. कोणतेही व्रत करताना त्याचा संकल्प करणे खूप महत्वाचे असते. यासाठी मंगळवारी सकाळी लवकर उठून स्नान करून लाल वस्त्र परिधान करावे. व हातात पाणी घेऊन संकल्प करावा कि आजपासून २१ मंगळवार पर्यंत तुम्ही हे व्रत करणार आहात. व हे व्रत तुम्ही कोणत्या कारणासाठी किंवा समस्येसाठी करत आहात हेही बोलावे. आणि हातातील संकल्प कारण्यासाठी घेतलेले पाणी जमिनीवर सोडावे. नंतर श्री हनुमानाला फुलांची माला अर्पण करावी. तसेच संध्याकाळीही श्री हनुमानाची मनोभावे पूजा करावी.
मोहरीच्या तेलाचा दिवा भगवान हनुमानासमोर लावावा. शेंदूर मध्ये थोडेसे चमेलीचे तेल मिसळून त्याचा टिळक श्री हनुमानाला लावावा व त्याने स्वतःलाही टिळक करावे. नंतर हनुमान चालीसा पठण करावे व शेवटी श्री हनुमानाचा जप करावा. खालीलप्रमाणे हा मंत्र दिलेला आहे.
ओम श्री रामदूताय नमः.
ओम पावनपुत्राय नमः
या दोन्ही मंत्रांच्या ११-११ वेळा जप करावा. नंतर श्री हनुमानाला नेवेद्य दाखवावा. आणि हाच नेवैद्य लहान मुलांना प्रसाद म्हणून द्यावा व स्वतःही घ्यावा. अशाप्रकारे २१ मंगळवार हे व्रत केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतील. आत्मविश्वास वाढेल, काम कार्यातील सर्व अडथळे दूर होतील, श्री हनुमान आपल्या मागे सावलीप्रमाणे उभे राहतील.
नासे रोग हरे सब पिरा जपत निरंतर हनुमत बिरा
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.