दुधामध्ये टाका फक्त हा १ पदार्थ; व्हायरस तुमच्या जवळही येणार नाही..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो पावसाळा हा जवळजवळ सर्वांचाच आवडता ऋतू. पावसात भिजायला सर्वांनाच आवडतं, परंतु त्याचबरोबर आपल्याला सर्दी, खोकला, ताप या आजरांचा देखील सामना करावा लागतो. पण प्रत्येक वेळी या आजारांवर गोळ्या औषध घेणं हाच उपाय नसतो. यावर नैसर्गिकरित्या घरच्या घरी उपाय करू शकतो.
पावसाळ्यात हळदीचा समावेश आपण रोजच्या आहारात केला पाहिजे. हळदीमध्ये अँटिबायोटिक आणि अँटिसेप्टिक प्रॉपर्टीस असतात. ग्लासभर दुधात अर्धा चमचा हळद टाकून पियाल्याने सर्दी खोकला ताप असे विकार होत नाहीत. त्याचप्रमाणे आवळ्याचाही समावेश आपण आपल्या आहारात केला पाहिजे.आवळ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
आवळ्याचा रस, मुरंबा, च्यवनप्राश, आवळा सुपारी, यांचा समावेश आहारात केला पाहिजे. पावसाळ्यात काळ्या मिरीचाही समावेश आहारात करावा. श्वसनविकार हातपाय दुखणं, अंगदुखी, ताप, पचन संस्थेचे विकार यावर काळी मिरी हि अत्यंत परिणामकारक ठरते. आपण दररोज काळी मिरी पूड मधातून घेऊ शकतो. व सूप करताना त्यात काळीमिरीचा वापर करावा.
तुळस हि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी सर्वंस्रेष्ट वनस्पती आहे. तुळशीमध्ये अँटीफंगल, अँटीबॅक्टेरिअल, अँटिव्हायरल प्रॉपर्टीस आहेत. त्यामुळे अनेक विकारांपासून आपले रक्षण होते. श्वसन, पचनसंस्थेचे विकार व त्वचेवर तुळस अत्यंत गुणकारी आहे. आपण तुळशीची पान , रस यांचा वापर नियमितपणे करू शकतो. जवळजवळ सर्वच आजरांवर हि तुळस उपयोगी ठरते.
तर मित्रांनो पावसाळ्यात निरोगी राहून पावसाचा मनसोक्त आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर आपली तब्येत बिघडू नये म्हणून वरील अन्नपदार्थांचा समावेश आपल्या आहारात नक्की करा. रोगप्रतिकारक शक्ती वाढवा व आपले आरोग्य उत्तम ठेवा.
मित्रांनो हि माहिती नक्कीच आपल्या सर्वांना फायदेशीर ठरेल, हि माहिती तुमच्यापुरतीच मर्यादित न ठेवता तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.