या ३ कारणांमुळे येऊ शकते तुमचे पोट बाहेर., जाणून घ्या काय आहेत ती कारणे..!

या ३ कारणांमुळे येऊ शकते तुमचे पोट बाहेर., जाणून घ्या काय आहेत ती कारणे..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे.  आज आपण पाहणार आहोत काय आहेत नेमके पॉट फुगण्याचे कारण. अनियमित जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पोट फुगते. कामाचा व्यस्तपणा आणि घाईगडबडीच्या युगात शरीराकडे लक्ष न देणे अशी अनेक पोट फुगण्याचे कारणं आहेत. परंतु पोट फुगण्याची इत्तर कारण देखील आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत.

१. जास्त मीठ खाणे:- आपण जे जंक फूड खातो त्यात आणि इतर प्रकारच्या पदार्थांमध्ये मिठाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो त्यामुळे पोट फुगते. पोट फुगण्याच्या आणखी एक कारण म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी. जेव्हा तेल आणि मसालेयुक्त आहार घेतला जातो तेव्हा ऍसिडिटीचा त्रास होतो त्यामुळे देखील पोट फुगते.

याव्यतिरिक्त शरीरात पाण्याची कमतरता झाल्याने किंवा मासिक पाळीच्या वेळी हार्मोन्स बदलांमुळे देखील पोट फुगते. मुलांना जंक फूड आवडते तर त्याचे प्रमाण कमी ठेवले पाहिजे नाहीतर भविष्यात मोठ्या समस्या उदभवू शकतात.

२. जेवण केल्यानंतर बसून राहणे:- जेवण केल्यावर बराच वेळ बसून राहिल्याने देखील पोट फुगत असते. त्यामुळे शक्यतो दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर अर्धा तास फिरणे आवश्यक आहे. वेळ कमी असेल तर पायऱ्या चढा आणि उतरा. या लहान व्यायामांमुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते. हि ऊर्जा पातळी वाढल्याने झोप येत नाही.

३. चिंता:- आपला मेंदू आणि आतडे यांच्यात थेट संबंध आहे. दोघांपैकी एकमध्येही काही समस्या झाली तर एकमेकांवर परिणाम होतो. म्हणूनच जेव्हा तुम्ही टेन्शन घेता किंवा ताणतणावात राहता तेव्हा पोट फुगते. तणावग्रस्त लोकांना हि समस्या जास्त असते. याव्यतिरिक्त ताण घेतल्याने पचनक्रिया संतुलन बिघडते आणि पोटाच्या इतर समस्या निर्माण होतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *