आवाज बसल्यावर हा पदार्थ चावून चावून खा; आवाज मोकळा होऊन घसा इंफेक्शन, घसा दुखणे कायमचे थांबेल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या आरोग्याकडे फारसे लक्ष देत नाही. आपल्या जेवनाच्या वेळा सुद्धा बदललेले असतात तसेच अनेकदा आपण बाहेरचे पदार्थ खात असतो त्यामध्ये पिज्जा, वडापाव, मसालेदार पदार्थ, तेलकट, तुपकट यासारख्या अनेक पदार्थामुळे आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो परंतु सध्याच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला एक समस्या प्रामुख्याने जाणवताना दिसत आहे ती म्हणजे घशाशी संबंधित असणारी समस्या.
प्रत्येकाला घसा दुखणे,घशामध्ये खवखव निर्माण होणे ,घशाला सूज येणे, घसा दुखणे अशा अनेक समस्या सध्या अनेकांना उद्भवत आहेत. जर तुम्हाला सुद्धा या समस्या असतील तर आजच्या लेखामध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
आवाज बसल्यावर आपण वेगळे उपाय करत असतो परंतु अनेकदा तसा आपल्याला फारसा काही फरक जाणवत नाही म्हणूनच या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी आयुर्वेदिक उपचार घेऊन आलेलो आहे. हा उपाय केल्याने आपल्याला त्वरित फरक पडेल. आवाज बसल्यावर हा पदार्थ आयाला चावून चावून खायचा आहे आणि एका मिनिटांमध्ये तुमचा आवाज मोकळा होईल.
होय मित्रांनो बोलताना किंचित घोगरा आणि कर्कश आवाज यायला लागला की आवाज बसला असे म्हटले जाते. सर्दीपासून ते घशाचा कॅन्सर मुळे सुद्धा हा त्रास होऊ शकतो त्यामुळे अनर्थ ठरू शकतो. आवाज बसून म्हणजे नेमके काय होते तर आपल्या स्वरयंत्राच्या हालचाली बिघडतात. कधी कधी स्वरयंत्र तार एकमेकांना चिकटतात तर कधीकधी स्वरयंत्रावर मांस वाढते.
स्वरयंत्राच्या तारेवर दबाव निर्माण होण्याची वेगवेगळी कारणे सुद्धा असतात कधी कधी आपण वेगवेगळे आवाज काढतो,जास्त जोर देऊन बोलत असतो. जोरात ओरडले ,भसाड्या आवाजामध्ये गाणी म्हणणे, जास्त खोकल्यामुळे सुद्धा अनेकदा स्वर यंत्रावर ताण निर्माण होतो.
काही वि’षाणू जिवाणू यांच्या इन्फेक्शनमुळे तसेच ऍलर्जीमुळे सुद्धा अनेकदा आपला आवाज बसण्याची शक्यता असते या सगळ्या गोष्टीमुळे आपला आवाज बसतो तसेच अतिथंड पदार्थ वारंवार खाणे,मोठ्याने हसणे अशा कारणांमुळे सुद्धा आपला आवाज बिघडतो. घशाला आराम नाही दिला तर सूज येऊन स्वरयंत्राला गाठ उत्पन्न झाल्यामुळे सुद्धा आवाज बसतो. या आवाज बसण्याच्या विकारांवर अत्यंत साधा आणि सोपा घरगुती उपाय आज आम्ही सांगणार आहे.
हा अत्यंत फायदेशीर प्रभावी असा हा उपाय आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे आल्याचा छोटा तुकडा.हा आल्याचा तुकडा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. आल्याला मधोमध सुरीने हळुवारपणे कापून काढावे. सर्दी आणि खोकला या विकारावर आले खूप फायदेशीर ठरतात. ह्या चिरा पाडलेल्या आल्या मध्ये थोडीशी हिंग पावडर आपल्याला भरायची आहे.
हे आले आपल्याला तव्यावर मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे.आता हे आले थोडे थंड करून कोमट असताना आपल्याला चावून चावून खायचे आहे. फक्त 3 दिवस सकाळ – संध्याकाळ हा उपाय केल्याने तुमच्या बसलेला आवाज पुन्हा पूर्ववत होईल त्याचबरोबर घशामध्ये जर कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल तर ते इन्फेक्शन लवकरच बरे होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.