सकाळी उठल्याबरोबर आरसा पाहणाऱ्यांनी हि माहिती एकदा अवश्य वाचा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा सुखाचा जावा आपण अगदी आरामात हा दिवस व्यतित करावा शिवाय आपल्या या दिवसात अफाट फायदा व्हावा असे सगळ्यांनाच वाटते. सकाळी उठल्यावर लगेच आपण काय करतो या गोष्टीचा प्रभाव आपल्या संपूर्ण दिवसावर पडत असतो. जर दिवसाची सुरवात चांगली झाली तर आपल्या सगळा दिवस चांगला जाईल. म्हणूनच सकाळी उठल्यावर मनातल्या मनात असा विचार आपण करायचा की आपला संपूर्ण दिवस चांगला जाणार आहे.
सकाळी उठल्या उठल्या आपण जसा विचार करतो तसेच दिवसभर आपल्या सोबत घडत राहते. काही व्यक्तींना उठल्या उठल्या भगवंतांचे दर्शन घेण्याची सवय असते तर काही वक्तींना कोणाचा तरी लाभदायक चेहरा पाहून उठण्याची सवय असते सोबतच काही व्यक्तींना आपला स्वतःचा चेहरा आरश्यात पाहून उठण्याची सवय असते.
सकाळी स्वतःचा चेहरा आरश्यात पाहून मग दिवसाची सुरवात करणारे लोक सकाळी उठले की पाहिले आरश्यासमोर उभे राहतात व स्वतःचे प्रतिबिंब आरश्यात पाहतात. आरश्याचे आपल्या जीवनात फार मोठे महत्व आहे आपण आपले प्रतिबिंब आरश्यात पाहू शकतो परंतू मित्रांनो आरश्या संबंधी पन समुद्र शास्त्रात काही नियम सांगितले आहेत उदाहरण द्यायचे झाले तर आरसा कुठे ठेवावा ? आरसा कोणत्या दिशेला असावा ? कोणत्या दिशेला आरसा असू नये ? आरश्याचा आकार कोणता असावा ? कोणत्या वेळी आरसा पाहू नये ? असे विविध नियम सांगितले गेले आहेत.
त्यातील महत्वाचा नियम म्हणजे सकाळी लवकर उठल्यावर आरसा पाहू नये. ज्यांना आरसा पाहून दिवसाची सुरवात करण्याची सवय असते समुद्र शास्त्राच्या अनुसार ही सवय अत्यंत चुकिची आहे. या सवयीचा त्यांच्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडतो.
मित्रांनो समुद्र शास्त्राच्या अनुसार सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा संपूर्ण नकारात्मकतेने भरलेलो असतो. आपल्या पुर्ण शरीरावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव असतो आणि या नकारात्मक शक्तींचा सर्वात जास्त प्रभाव हा आपल्या चेहर्यावर असतो आणि सकाळी उठून जर आपण आरश्यात पाहिले तर ही नकारात्मक शक्ती आपल्या डोळ्यांच्या मार्गाने पुन्हा आपल्या शरीरात प्रवेश करते.
यामुळे आपला संपूर्ण दिवस हा नकारात्मकतेणे भरुन जातो आणि आपल्या संपूर्ण जीवनावर त्याचा वाईट प्रभाव जाणवतो. म्हणून सकाळी उठल्यावर लगेच आरश्यात आपला चेहरा पाहू नये. सकाळी आपण स्नान करुन मोकळे झालो अथवा ब्रश केले त्या नंतरच आरश्यात पहावे. जर तुम्ही असे केलात तर सकारात्मक शक्ती तुमच्या मध्ये तयार होईल व येणारी संकटे टळतील. समुद्र शास्त्रातील या नियामाचे पालन करुन तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा आनंदित राहूनच जगू शकता. म्हणूनच सकाळी उठल्यावर सर्व प्रथम भगवंताचे नाम स्मरण करुन मग दिवसाला सुरवात करा आयुष्यात नेहमी चांगले क्षण येत राहतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.