१ वर्षांमध्ये कोंबडी किती अंडी देते.? अंडी कच्ची खावीत कि उकडून.? जाणून घेण्यासाठी एकदा नक्की वाचा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो शरीरात मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळवायण्याचा मोठा स्त्रोत म्हणजे अंडे. अंडे आपल्या शरीरासाठी एक उत्तम पोषक आहार आहे. अंड्यामध्ये अनेक गुणधर्म आहेत जे आपल्या शरिराला प्रोटीन्स आणि प्रथिने देतात. आपण सगलेच अंड्याचे शौकीन आहोत. जे लोकं मटण-मच्छी म्हणजेच शाकाहारी ते सुद्धा अंड्याचे सेवन करतात.
तुम्ही कोंबडीच्या अंड्यांचे सेवन करत असाल परंतू तुम्ही एका गोष्टीचा कधी विचार केला आहे का ? कोंबडी एका वर्षात किती अंडी देते आणि इतके अंडी तिच्या पोटात येतात कुठून ? चिंता करण्याचे काही कारण नाही आम्ही आज तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देवू परंतू हे जाणण्यासाठी आमचा लेख शेवटपर्यंत वाचा.
मित्रांनो जगभरात सगळीकडेच कोंबडीची अंडी मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात सोबतच. बदक व टर्की तसेच अन्य पक्षांची अंडी देखील खाल्ली जातात मात्र बाजारात सर्वात जास्त मागणी असते ती फक्त कोंबडीच्या अंड्यांना. एका शोधात असे समोर आले आहे की एक कोंबडी एका वर्षामध्ये 305 ते 310 अंडी देते म्हणजेच प्रमाण काढल्यास एका महिन्यात एक कोंबडी 25 ते 30 अंडी देते.
तसेच जर गावठी कोंबड्या एका वर्षामध्ये 150 ते 200 अंडी देतात. त्या सोबतच कोंबडींची अंडी देण्याची क्षमता पौल्ट्री फार्म चालवणार्या लोकांवर सुद्धा आधारीत आहे ते कश्या प्रकारे कोंबडींची काळजी घेतात. त्यांचे पालन-पोषण कसे केले जाते. तसेच त्यांच्या तब्येतीची काळजी कश्या प्रमाणे घेतली जाते. या सगळ्याचा देखील कोंबड्यांच्या अंडी देण्यावर मोठा फरक पडतो. काही कोंबड्या 70 ते 75 आठवडे अंडी देवू शकतात तर काही मोठ्या जातीच्या कोंबड्या 95 ते 100 आठवडे देखील लगतार अंडी देण्याची क्षमता ठेवतात.
मित्रांनो कोंबड्यांचे पौल्ट्री फार्मिंग हे मुख्यतः अंडी आणि मांससाठी केली जाते. जगभरात पौल्ट्री फार्म हा एक मोठा व्यवसाय आहे. सोबतच चुकीच्या प्रकारे अंडी खाणे सुद्धा शरीराला घातक ठरू शकते. अंडी नेहमी उकडून किंवा शिजवून खावीत अंडी कधी ही कच्ची खाऊ नयेत. अंडी जर कच्ची खाल्ली गेली तर त्यातील जीव-जंतू आपल्या पोटात जाऊन आपल्या शरीरावर हल्ला करतात.
या कच्या अंड्यामुळे आपल्याला डिसेंट्री तसेच पोटदुखीचा त्रास होवू शकतो. जर अंडे शिजवले गेले तर त्यातील वाईट जीव-जंतू मरण पावतात व हे अंडे खाण्या योग्य व निर्धोक असते. जी माणसे व्यायामशाळेत घाम गाळतात त्यांच्या तब्येतीसाठी देखील अंडी खूप फायदेशीर आहेत पण हे अंडी नेहमी उकडून खावीत कच्चे असल्यास त्याचे ग्रहण करु नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.