फक्त एक महिना मेथीचे पाणी प्या त्यानंतर होणारे फायदे पाहून तुम्हीसुद्धा व्हाल थक्क.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या हिवाळ्याचा ऋतू चालू आहे परंतु या ऋतूमध्ये सगळीकडे वातावरणामध्ये थंडावा असतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे वायरल इन्फेक्शन त्वरित होते. या दिवसांमध्ये आपले शरीर आतून थंड असते आणि म्हणूनच शरीराला उष्णता प्रदान करणारे पदार्थ आपल्याला सेवन करणे गरजेचे आहे तसेच आपल्या आजूबाजूला असे अनेक औषधी गुणधर्म असलेले पदार्थ उपलब्ध असतात ज्यामुळे आपण आपल्या शरीराला उष्णता प्रदान करू शकतो.
तसेच थंडीच्या दिवसांमध्ये अनेक जण मेथीचे लाडू डिंकाचे लाडू बनवून खात असतात कारण की मेथी ही पदार्थ उष्ण गुणधर्म ची असते आणि या पदार्थांसोबतच आपल्या शरीराला ऊर्जा सुद्धा प्राप्त होत असते आणि या दिवसांमध्ये आपल्या शरीराला ऊर्जेचे नितांत आवश्यकता असते अशाच एका पदार्थाबद्दल आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. हा पदार्थ आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे तसेच या पदार्थाचे अनेक वेगवेगळे पदार्थ सुद्धा आपण स्वयंपाकामध्ये बनवून खात असतो चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
आपल्यापैकी मेथीची भाजी प्रत्येक खात असतो. मेथीची भाजी चवीला कडू असली तरी अनेक औषधी गुणधर्माने उपलब्ध असते. या भाजीमध्ये अनेक औषधी गुणधर्मा सोबतच आपल्या शरीराला मजबुती प्रदान करत असते परंतु आजच्या लेखामध्ये आपण मेथीच्या भाजी विषयी नाही तर मेथीच्या बिया बद्दल जाणून घेणार आहोत. मेथीची बिया या चवीला कडू असतात तसेच त्यांच्या अंगी सुद्धा अनेक औषधी गुणधर्म असतात.
मेथीच्या बियामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते तसेच ज्या व्यक्तींना पोटाच्या पचनाच्या समस्या आहेत अशा व्यक्तीने जर मेथीच्या बियांचे पाणी नियमितपणे सेवन केले तर आपल्या पोटातील विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत होत असते तसेच जर तुमचे केस गळत असतील, केसांमध्ये कोंडा झाला असेल अशावेळी आपण मेथीच्या दाण्याची बारीक पावडर करून आपल्या केसांच्या मुळाला लावू शकतो.
असे केल्याने आपल्या केसांना नैसर्गिक चमक सुद्धा प्राप्त होते त्याचबरोबर केसांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व घटक मेथीच्या दाण्यामध्ये असते आणि म्हणूनच केसांची वाढ सुद्धा चांगल्या प्रमाणात होते. मेथी चवीला कडू असल्यामुळे यामध्ये डायबिटीस सारख्या आजाराला विरोध करण्याची शक्ती असते म्हणूनच जर आपण आपल्या आहारामध्ये मेथी समावेश केली तर आपल्या र”क्ता”तील शुगर सुद्धा नियंत्रणात राहते.
आपल्यापैकी अनेकांना हाय ब्लडप्रेशर ची समस्या त्रास देत असते अशावेळी आपण वेगवेगळ्या सेवन करतो परंतु एवढे सगळे करून सुद्धा आपल्याला फारसा फरक जाणवत नाही अशा वेळी जर आपण रात्री झोपताना एका पातेल्यामध्ये मेथीचे दाणे भिजवून ठेवल्याने तसेच मेथी बी मध्ये कोमट पाणी घालून सकाळी प्यायले तर आपला ब्लडप्रेशर नियंत्रणात राहतो त्याच बरोबर आपल्यापैकी अनेकांना सतत काहीना काही चिंता असते, घाबरल्या सारखे वाटत असते हृदयाची धडधड वाढलेली असते अशावेळी या सर्व गोष्टी नियंत्रण आणण्याची शक्ती मेथीच्या बिया मध्ये असते.
आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल ती हिवाळ्याच्या ऋतूमध्ये आपल्या घरी महिलावर्ग हिवाळ्याच्या दिवसात मेथीचे लाडू बनवतात कारण हा ऋतू आपल्या शरीराला थंडावा प्रदान करत असतो आणि या ऋतूमध्ये अनेक व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच आपल्या शरीराला हिवाळ्याच्या ऋतूमध्ये उष्णता प्रधान व्हावी म्हणून अनेकदा मेथीचे लाडू सुद्धा बनवले जातात.
या व्यक्तींना वाढलेले वजन कमी करायचा आहे त्यांच्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी निर्माण झालेली आहे ,अशा व्यक्तीनेच रात्री झोपताना व सकाळी उठल्यावर मेथीच्या दाण्याचे पाणी नियमितपणे सेवन केल्यास आपल्या शरीरातील मेटॅबॉलिझम रेट वाढतो व परिणामी आपली पचनसंस्था व्यवस्थित कार्य करते तसेच आपल्या शरीरामध्ये जमा झाली असेल तर यामुळे सुद्धा अनेकदा शरीरावर चरबी जमा होते. वजन कमी करण्यासाठी मेथीच्या दाण्याचे पाणी आपल्याला मदत करते.
म्हणून आपल्या शरीरातील असंख्य समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी आपल्याला रात्री झोपताना एक मूठभर मेथीचे दाणे कोमट पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि सकाळी उठल्यावर आपल्याला सेवन करायचे आहे आणि उरलेल्या मेथीच्या दाण्याची तुम्ही बारीक पावडर बनवून चेहऱ्यावर लावू शकता. ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील काळे डाग, मुरूम, पिंपल्स आले आहेत अशा व्यक्तींनी ही पावडर आपल्या चेहऱ्यावर लावल्यास चेहरा नैसर्गिक रित्या चमकण्यासाठी मदत होत असतो म्हणून हा उपाय आपल्याला महिनाभर सतत करायचा आहे त्यामुळे आपल्या शरीरातील असंख्य समस्या लवकरच नष्ट होतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.