जीवनात या 2 गोष्टी नक्की करा; गरिबी तुमच्या जवळ पण येणार नाही.!

जीवनात या 2 गोष्टी नक्की करा; गरिबी तुमच्या जवळ पण येणार नाही.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भगवंताने आपल्याला हे शरीर दिलेले आहे आणि आपल्या शरीर, मन व आत्मामध्ये प्रचंड ऊर्जा भरलेली आहे.त्याची मोज माप ही करता येणार नाही.आपण आपल्या मेंदूच्या एक टक्का भाग उपयोगात आणत असतो आपला मेंदू इतकाच ताकदवान आहे की शंभर कॉम्प्युटरचे एकत्रित ज्ञान आपण एकट्या मेंदूमध्ये साठवून ठेवू शकतो परंतु आपण सगळ्यांनी स्वतः त्याला मर्यादा घातलेली आहे.

आपण स्वतःला मर्यादित करून ठेवलेले आहे. आपल्या मध्ये किती शक्ती आहे. किती ऊर्जा आहे हे आपल्याला माहीतच नसते. आपण एखाद्या गोष्टीचा विचार केला आणि ती करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला तर जगातील कोणतीही शक्ती ती गोष्ट पूर्ण करण्यापासून आपल्याला रोखू शकत नाही. त्याला ती मिळू शकत नाही असे होणार नाही. कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी सकारात्मक विचार करावा.

आपण नेहमी सकारात्मक विचार केल्याने आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी सुद्धा सकारात्मकच घडत असतात. आपण अनेकदा अनुभव घेतला असेल आपण काही गोष्टी स्वप्नामध्ये पाहतो ,काही गोष्टींचा विचार करतो. आपल्याला काही गोष्टी मिळायला हवे आणि त्या गोष्टी सत्यात घडताना दिसू लागतात. मनुष्याच्या सर्व स्वप्न आवड प्रत्येक इच्छा पूर्ण होत असतात.

काही स्वप्न पूर्ण होतात तर काही स्वप्न अंशतः पूर्ण होत असतात. परंतु ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपले विचार सकारात्मक आणि उच्च असायला हवेत परंतु आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर केला तर आपण काय करू शकतो याची माहिती आपल्याला नसते. आपण जर आपल्या क्षमतेला मर्यादित नाही केले तर आपल्या मर्यादित विकास होईल.

आपल्या विकासालाही मर्यादा राहणार नाही म्हणून आपले विचार आपले मन यांच्याद्वारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. विचारांची ताकद इतकी प्रगल्भ असते की या विचारांच्या ताकद मधूनच आपण आपल्या इच्छेचा संकल्प तयार करत असतो. भगवंताची कृपा जशी आपल्यावर असतेच परंतु जेव्हा आपण आपले विचार सकारात्मक ठेवतो आणि उच्च दृष्टिकोनातून विचार करत असतो.

अशा वेळीसुद्धा भगवंत त्यांची स्वतःची संपुर्ण ऊर्जा आपल्याला प्रदान करत असतो आणि आपले स्वप्न सत्यामध्ये उतरते म्हणून कोणती गोष्ट करत असताना आपले विचार सकारात्मक असायला हवे कारण सकारात्मक विचार केल्यामुळे आजूबाजूला घटना सुद्धा सकारात्मकच घडत असतात.

जर तुम्ही एखादी गोष्ट करण्यापूर्वी जर नकारात्मक विचार करत असेल तर ती गोष्ट घडताना अनेक संकटे अडचणी येत असतात आणि त्या गोष्टीवर त्या सर्व विचारांचा विपरीत परिणाम होत असतो. अशावेळी तुम्ही स्वतःला मर्यादा घालू नका. मी हे कार्य संपूर्ण करणार, असे या कार्यामध्ये यशस्वी होणारच असा मनोमन अंतकरणातून संकल्प करा मग पहा ते कार्य कसे सफल होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *