विवाहित स्त्रीयांनी बांगड्या घालतांना या गोष्टी विशेष पाळाव्यात; नाहीतर होईल खूप पच्छाताप.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रंग-बिरंगी बांगड्यांचे प्रत्येकाला आकर्षण असते. बांगड्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध होत असतात .काही बांगड्या सोन्याच्या असतात, काही बांगड्या मेटलच्या असतात, काही चांदीच्या असतात, काही बेन्टेक्स च्या असतात व काही काचेच्या असतात त्यांच्या वरील रंग बिरंगी सुबक कला आपल्या डोळ्यांना आकर्षित करत असतात आणि त्यांचे रंगांमध्ये तर आपण अगदी प्रेमात पडत असतो.
लग्न समारंभ मध्ये व अनेक कार्यक्रमांमध्ये मुली व बायका अगदी मॅचिंग च्या बांगड्या घालत असतात काहीजण तर पूर्ण हात भरून बांगड्या घालत असतात. काहीजणांना दोन्ही हातामध्ये बांगड्या घाला आवडतात तर काही जणांना एका हातामध्ये बांगडी एका हातामध्ये घड्याळ घालायला आवडत असते.
प्रत्येक जण आपल्या आवडीनिवडीनुसार बांगड्या हातामध्ये घडत असतात म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण विवाहित स्त्रियांनी कोणत्या बांगड्या परिधान करायला हवेत व बांगड्या घालताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी ह्या बद्दलची महत्त्वाची माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात त्याबद्दल. लग्नाआधी महिला कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालत असतात परंतु लग्नानंतर बांगड्या घालताना त्यांच्यावर काही बंधन येत असतात.
सवाष्ण स्त्रियांनी कोणत्या बांगड्या घालाव्यात व कोणत्या घालू नये याची काही प्रमाणामध्ये नियम व बंधने असतात याचा विचार करूनच त्यांना बांगड्या घालाव्या लागतात. धार्मिक दृष्ट्या सुद्धा स्त्रियांनी कोणत्या बांगड्या घालाव्यात याचासुद्धा विचार केल्या केलेला आहे स्त्रियांनी नेहमी चांगल्या मजबूत व तडा गेलेल्या तुटलेल्या अशा बांगड्या घालू नये. असे म्हटले जाते की जर महिलांनी तुटलेल्या बांगड्या हातामध्ये घातल्या तर त्यांच्या वडिलांवर व भावांवर कर्जाचा डोंगर वाढत जातो.
अनेकदा आपण नवीन बांगड्या भरायला जातो तेव्हा जुन्या बांगड्यांचे काय करायचं हे आपल्याला सांगितले जात नाही अशा वेळी त्या जुन्या बांगड्या आपल्या बोटाला लावून टाकून द्यायचे असतात त्याचबरोबर सवाष्ण महिलेला दोन्ही हातांमध्ये सारख्या बांगड्या घालायला दिले जात नाही. नेहमी उजव्या हातामध्ये दोन बांगड्या जास्त भरायला सांगितले जातात त्याच बरोबर डाव्या हाता मध्ये दोन बांगड्या कमी भरण्यास सांगितले जाते.
उंबरठावर बसुन कधीच बांगड्या घालू नये त्याचबरोबर सूर्यास्त तसेच प्रदोष काळामध्ये बांगड्या घालू नये. आपण रात्री बांगड्या घालू शकतो परंतु भर संध्याकाळी बांगड्या घालू नये. मुलगी माहेरी आल्यावर तिला हातामध्ये बांगड्या भरून सासरी पाठवण्याची पद्धत अजूनही अनेक ठिकाणी पाळली जाते परंतु काही वेळा मुलींना या बांगड्या परिधान करायला आवडत नाही त्यांना आपल्या साडीच्या रंगानुसार मॅचिंग बांगड्या घालायला आवडतात.
माहेरच्या बांगड्या हातामध्ये घेतल्यास आपल्या सौभाग्य मध्ये वाढ होत असते. आपल्या माहेरी वरून मिळालेल्या बांगड्या कोणाला अजिबात देऊ नये त्या नेहमी स्वतःला घालायला हव्यात. आपण घेतलेला बांगड्या जर इतर स्त्रियांना आवडल्या तर त्या बांगड्या त्यांना घालायला देऊ नये तसेच बांगड्या त्यांना विकत घेऊन द्या परंतु आपल्या स्वतःच्या बांगड्या इतरांना घालायला कधीच देऊ नका. विवाहित बायकांनी आपल्या हातामध्ये कधीच चांदीच्या बांगड्या घालू नये. त्यांची चांदीचे कंगन एका हातामध्ये घालू शकतात.
आजकाल लग्नामध्ये वेगवेगळ्या बांगड्या घालण्याची पद्धत आहे प्रत्येक जण आपापल्या साडीच्या रंगानुसार मॅचिंग बांगड्या घालणे पसंत करत असतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक महिला धावपळीचे जीवन जगत असते, अशावेळी दोन्ही हातामध्ये बांगड्या भरणं कधी-कधी शक्य होत नाही त्याचबरोबर काचेच्या बांगड्या घालून आवरणे सुद्धा कठीण होऊन बसते.
अशा वेळी आपण प्लास्टिक किंवा आपला सोयीस्कर नुसार बांगड्या घालू शकतात. त्याचबरोबर अनेक धर्मांमध्ये वेगवेगळ्या बांगड्या सुद्धा परिधान केल्या जातात हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल व हिरव्या बांगड्या सौभाग्याचे प्रतीक मानले जाते तर बौद्ध धर्मामध्ये महिलांना पांढऱ्या रंगाच्या बांगड्या परिधान करणे शुभ मानले जाते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.