नाश्त्याला चहासोबत चपाती खाणं आरोग्याला किती त्रासदायक ठरू शकतं हे एकदा नक्की पहा..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो दिवसाची सुरुवात आपण भरपेट नाश्ता, त्यानंतर जेवण आणि त्याहून रात्रीचे हलके जेवण अशी ठेवल्यास तुमचं आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. आजकाल सर्वच लोक घाईमध्ये असतात अशावेळी सकाळी उठून नाश्ता करणं प्रत्येकाला जमत नाही.
काही जण तर घाईघाईत बाहेर पडताना रेडी टू ईट चे काही पदार्थ खाणे पसंत करतात. परंतु अजूनही काही घरात सकाळी बनणारी गरम चपाती आणि चहा हा नाश्त्याचा पदार्थ आहे. पण चहा आणि चपाती खाऊन बाहेर पडणं खर्च हेल्दी आहे का..?
आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नाश्त्याला चहा चपाती हा खाणे फारसं शरीराला आरोग्यदायी नाही. चहा चपाती सोबत खाल्ल्याने त्यामधून मिळणारे पोषक द्रव्ये तर फारच कमी असतात. सकाळी उठल्यानांतर शरीराला दिवसभर लागणारी ऊर्जा सकाळच्या नाष्ट्यामधून मुबलक मिळणे गरजेचे आहे.
सकाळच्या नाष्ट्यामधून कार्बो हायड्रेट आणि प्रोटीन घटक मुबलक मिळणे गरजेचे आहे. चहा चपातीमधून हि गरज पूर्ण होत नाही. चहा चपाती हा पर्याय आवश्यक असणारी कार्बोहायड्रेट , आर्यन आणि कॅल्शियमची गरज पूर्ण करत नाही.
चहा हे कॅफीनयुक्त असल्याने दिवसाची सुरुवात त्यापासून करणे आरोग्यासाठी एवढे चांगले नाही. कोणताही अन्नपदार्थ चहा सोबत घेणे त्रासदायक आहे. तसेच चपाती या कॉम्बिनेशन मधून आर्यन आणि कॅल्शियम शरीरात मुबलक प्रमाणात शोषले जात नाही.
परिणामी या नाश्ताच्या पर्यायांमधून शरीराला ऊर्जा आणि पोषक द्रव्ये यापैकी काहीच मिळत नाही. तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि सकाळच्या नाश्त्याला नेमके हेल्थी पदार्थ आहेत तरी कोणते..?
चहा चपाती हा झटपट बनणारा पदार्थ वाटत असला तरीही जास्त उपयोगी नाही. म्हणून त्याच्याऐवजी भाजी चपाती किंवा दही-चपाती , अंडी, दूध, पनीर यांसारख्या पदार्थाचा समावेश करा. त्यासोबतच कार्बोहायड्रेट्स मिळवण्यासाठी रव्यापासून बनवलेले पदार्थ म्हणजेच उपमा , अप्पम यांचा समावेश जास्त करा. इडली संभार हा सकाळच्या नाश्त्याला एक उत्तम आणि परिपूर्ण पर्याय आहे.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.