या दिशेला बसून जेवण करणे म्हणजे आयुष्य कमी करणे; तुम्ही हि चूक करत असाल तर एकदा नक्की वाचा.!

या दिशेला बसून जेवण करणे म्हणजे आयुष्य कमी करणे; तुम्ही हि चूक करत असाल तर एकदा नक्की वाचा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या विविध धर्म ग्रंथांमध्ये व शास्त्रांमध्ये दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या गोष्टी करायला हव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये याबद्दल अनेक दाखले देण्यात आलेले आहेत. सकाळी किती वाजता उठायला हवे. आपले वर्तन कसे असायला हवे. आपण कशा पद्धतीने कार्य करायला हवे, कोणते कार्य करण्याची कोणती दिशा योग्य आहे या बद्दलची संपूर्ण माहिती अनेक धर्मग्रंथाने सांगण्यात आलेली आहे.

परंतु आजच्या लेखामध्ये आपण जेवण करण्याची योग्य वेळ कोणती आणि कोणत्या दिशेला बसून आपल्याला जेवण करायचे आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया बद्दल..

जेवण करताना कोणत्या दिशेला तोंड करून बसावे. जेवण कसे असावे, कोणते जेवण आपल्या जीवनासाठी हानिकारक आणि कोणते भोजन हे आपल्या जीवनासाठी उत्तम आहे. कोणत्या दिशेला तोंड करून जेवल्यास आपले आयुष्य कमी होते आणि कोणते जेवण आपल्याला सुख समृद्धी प्रदान करते ह्या विषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्राविषयी काही नियम सांगितलेले आहे. जेवण करताना काय करावे व काय करू नये याविषयी सविस्तर वर्णन वास्तुशास्त्रमध्ये सांगण्यात आलेले आहे. चुकीच्या दिशेला जर आपण जेवण केले व जेवण करताना तोंड करून बसलो तर ते जेवण आपल्याला लाभ तर देत नाही पण त्याचबरोबर त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर सुद्धा होत असतो.

जेवण करण्यापूर्वी काही मंत्रांचा जप केल्यास भोजन करताना आपल्याला जास्तीत जास्त सकारात्मक उर्जा प्राप्त होते आणि आपल्या जीवनावर खूप शुभ प्रभाव पडतो. जर आपण जेवण करताना योग्य दिशेला तोंड करून जेवायला बसलो नाही तर घरातील भांडण तंटे, वाद विवाद होत नाही. लक्ष्मी कृपेने आपल्या घरात सुख समृद्धी व आनंद येतो त्याबरोबर घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते.

आपण जेवण करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. दुसऱ्यांच्या वाट्याचे जेवण कधीही आपण स्वतः खाऊ नये. जर आपण इतरांच्या वाटेचे अन्न पण खाल्ले तर आपल्या दारीद्रता येते. इतरांच्या वाटाचे अन्न कधीही चुकूनसुद्धा खाऊ नये. इतरांच्या वाट्याचे अन्नपदार्थ आपण त्यांना वाटून दिल्यावर आपल्यावर माता महालक्ष्मी कृपा वर्षाव करते. वास्तुशास्त्रानुसार आपण तुटलेल्या फुटलेल्या भांड्यामध्ये जेवण केले तर ते अशुभ मानले जाते.

त्यामुळे आता जीवनामध्ये दुर्भाग्य येते. जेवण करताना जेवणाचे ताट नेहमी स्वच्छ असायला हवे जर आपण अस्वच्छ ताटामध्ये जेवण करत असू तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होऊ शकते. एकादशीच्या दिवशी कधीही चुकून तामसी पदार्थांच सेवन अजिबात करू नये. वास्तुशास्त्रानुसार , धर्म शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी चुकूनही मांसाहार व मद्य सेवन करू नये त्या दिवशी नेहमी चांगले व सात्विक भोजन करायला हवे. अन्नाला नावं ठेवणे आणि अन्नाचा दुरुपयोग करणे शास्त्रानुसार अत्यंत चुकीचे मानले गेले आहे.

म्हणून ताटामध्ये उष्टे कधीच सोडू नये यामुळे जर तुम्हाला सुद्धा ताटामध्ये उष्ट सोडण्याची सवय असेल तर त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक अडचणी दुःख भविष्यात येऊ शकतात. जर आपण जेवताना सगळेजण एकत्र जेवत असू आणि आपण मध्येच उठलो तर यामुळे पितृदोष होऊ शकतो म्हणून जेवण एकत्र जेवत असताना सर्वांचे जेवण झाल्याशिवाय उठू नये.

आपल्यापैकी अनेकांना जेवण झाल्यानंतर ताटामध्ये हात धुण्याची सवय असते परंतु हे सुद्धा चुकीचे मानले गेले आहे. असे करणे म्हणजे नीच योनी चे लक्षण मानले जाते. जेवण झाल्यानंतर ताटामध्ये थोडेसे पाणी सोडावे परंतु ताटामध्ये हात अजिबात घेऊ नये. जेवण करण्यापूर्वी सर्व देवी देवता यांचे नामस्मरण करणे किंवा आपले इष्ट देवता यांचे नामस्मरण करणे गरजेचे आहे, असे केल्यामुळे आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जे आपण जेवण करत आहोत त्यामुळे आपल्याला भविष्य सुखशांती सुद्धा मिळते त्याच बरोबर माता अन्नपूर्णा यांचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो.

जेवण करण्यापूर्वी जर आपण अन्नाला नमस्कार करून जेवण केले तर ते अन्न म्हणून न राहता प्रसाद म्हणून आपल्या शरीरात जाते आणि अशा प्रकारचे अन्न आपल्या शरीराला खूपच ऊर्जा प्रदान करत असते. नेहमी अन्नाचा आदर करायला हवा. अन्नाचा कधी चुकून अनादर करू नका.अन्नाचा आदर केल्याने आपल्या जीवनामध्ये नेहमी अन्नाची बरकत राहते त्याचबरोबर बिछान्यावर बसून कधीच अन्न ग्रहण करू नये यामुळे आपल्याला विविध रोगांना सामोरे जाण्याची शक्यता असते.

आपल्याला विविध रोग जडू शकतात. नेहमी जेवण करताना जमिनीवर आसन टाकूनच जेवायला बसावे. जेवण करताना कधीच कुणाला टोकु नये किंवा कुणाशी वाद करू नये. जेवण करताना जर आपण पूर्व दिशेला तोंड करून बसल्याने व्यक्ती पिडा मुक्त होते व त्याचबरोबर त्याला कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर तो आजार दूर होण्यास मदत होते.

म्हणून वृद्ध व्यक्ती व आजारी व्यक्ती यांनी पूर्व दिशेला तोंड करूनच अन्नग्रहण करायला हवे असे केल्याने आपल्या आरोग्यामध्ये नक्कीच सुधारणा होते कारण की पूर्व दिशा ही सुर्यदेवांची दिशा असल्याने पूर्व दिशेकडे तोंड करून जेवल्याने सुर्यदेवांची कृपादृष्टी आपल्यावर होते आणि त्यांच्या तेजामुळे आपल्या शरीरातील रोग हळूहळू कमी होतात.

जर तुम्हाला नोकरी तसेच व्यवसायामध्ये प्रगती व्हावी अशी इच्छा असेल तर अशावेळी व्यक्तीने उत्तर दिशेला तोंड करून जेवायला हवे कारण की उत्तर दिशा ही कुबेरांच्या दिशा मानली जाते आणि कुबेर हे धनाचे धनी आहेत म्हणूनच अशा वेळी तुम्हाला जीवनामध्ये यश प्राप्त करायचे असेल तर उत्तर दिशेला तोंड करून जेवायला बसायला हवे. त्याचबरोबर जेवण करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की जेवण करताना कधीही दक्षिण दिशेला तोंड करून घेऊ नये कारण की दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते म्हणून जेवण करताना आपल्याला विशिष्ट काळजी घेणे गरजेचे आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *