या 4 लोकांना कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नये; नशीब कायमचे साथ सोडून जाते.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या चार लोकांना कधीही रिकाम्या हाताने पाठवू नये. आपल्यापैकी अनेक जण मेहनत करत असतात ,कष्ट करत असतात, त्यांच्या कष्टातून आज पैसे कमवत आहोत. आपण जे सारे काम करतो त्यातून आपल्याला योग्य तो मोबदला मिळत असतो आणि हे सगळे आपल्या नशिबामध्ये किंवा आपण जे काही कर्म करतो या सगळ्या गोष्टींमुळे घडत असते.
जे काही कार्य आपण करत असतो ते कुठे ना कुठे परमेश्वराच्या कृपेमुळे सुद्धा आपल्याला मिळत असते म्हणून आपण जे काही कष्ट केले असेल त्यातील थोडासा भाग आपण दान करायला हवा. हिंदू धर्मशास्त्रामध्ये दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. या धर्मशास्त्रामध्ये वेगळ्या प्रकारचे दान शुभ मानण्यात आलेले आहे.आपल्या इच्छेनुसार व आपल्या कुवतीप्रमाणे प्रत्येकाने शक्य होईल त्या पद्धतीने दान करणे गरजेचे आहे.
दानधर्म केल्याने आपल्या जीवनात अनेक संकटे कष्ट दूर होतात व आपल्याला भविष्यात पुण्य लाभते. जर तुम्हाला जीवनामध्ये ह्या चार व्यक्ती भेटल्या तर त्यांना कधीच माघारी रिकाम्या हाताने पाठवू नका. तुमच्या ऐपती प्रमाणे व तुम्हाला जेवढे शक्य होईल त्या शक्यतेनुसार तुम्ही या व्यक्तींना दान करायला हवे. यातील पहिली व्यक्ती म्हणजे भिकारी.
रस्त्यावर आपल्याला अनेक भिकारी दिसत असतात.जर तुम्हाला सुद्धा भिकारी काही दिसले जर त्यांनी तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे भिक्षा मागितली तर त्यांना नाराज करू नका. त्यांना रिकाम्या हाताने कधी पाठवू नका. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा नर सेवा हीच नारायण सेवा असते. म्हणूनच जर तुमच्या दारासमोर किंवा तुमच्या आजूबाजूला एखादा भिकारी आला तर तुमच्या आवश्यकतेनुसार व इच्छेनुसार त्याला काही ना काही वस्तू द्या परंतु त्याचा अपमान करून त्याची मस्करी अजिबात करू नका, अन्यथा तुम्हाला त्यांच्या क्रोधाला किंवा शापाला सामोरे जावे लागेल.
त्यानंतर दुसरी व्यक्ती आहे किन्नर. आपल्या आजूबाजूला अनेक अशा काही व्यक्ती आहेत ज्या उदरनिर्वाहासाठी आपल्याकडे पैसे मागत असतात परंतु जर तुमच्याकडे पैसे नसतील तर अशा व्यक्तींचा म्हणजेच किन्नरांचा उगाच अपमान करू नका. किन्नर सुद्धा मनुष्य आहे, त्यांना सुद्धा समाजामध्ये माणूस म्हणून जगण्याची मुभा आहे. आपण जर काही मदत करणार नसणार तर आपण त्यांचा अपमान सुद्धा करायचा नाही.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की किन्नर हे शिवशक्ती यांचे स्वरूप असल्याने यांच्यामध्ये साक्ष शिवशक्ती यांचे वास्तव्य असते आणि यांचा अपमान म्हणजे साक्षात शिवशक्ती यांचा अपमान आहे म्हणून यांचा अपमान करण्याऐवजी यांचा आशीर्वाद खूप चांगला ठरतो. ज्या व्यक्तींना किन्नर यांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नेहमी प्राप्त होत असते त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची संकटे अडथळे येत नाही.
त्यानंतर ती तिसरी व्यक्ती म्हणजे दिव्यांग व्यक्ती. आपल्या आजुबाजूला जीवनामध्ये अनेक व्यक्ती पाहतो रस्त्यावर सुद्द्धा भिक्षा मागण्यासाठी दिव्यांग व्यक्ती आपल्याकडे कधी कधी येत असतात परंतु आपण त्यांना काही वस्तू किंवा पैसे न देता परत करत असतो. हे सुद्धा अत्यंत चुकीचे आहे. जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही त्यांना काहीतरी खायला देऊ शकता परंतु कोणत्याही चुकीच्या मार्गाने त्यांचा अपमान करू नका त्यांच्या शरीरावर हसू नका अन्यथा तुम्हाला त्यांच्या शापाला सामोरे जावे लागू शकते.
जेव्हा आपण दिव्यांग व्यक्ती यांना कोणतेही दानधर्म करत असतो अशावेळी आपल्या कुंडलीतील शनी ग्रह व राहु ग्रह यांचा जो वाईट प्रभाव असतो तो दूर होऊन जातो आणि म्हणूनच आपल्या जीवनातील आणि संकटे दूर करायचे असतील तर आपल्याला दिव्यांग व्यक्ती यांना दानधर्म करणे अत्यंत गरजेचे आहे.
पुढील चौथी व्यक्ती म्हणजे वृद्ध व्यक्ती. आपल्या जीवनामध्ये अनेकदा आपण वृद्ध व्यक्ती पाहत असतो अशा व्यक्ती नेहमी मदत करायला हवी कारण की त्यांचे आशीर्वाद आपल्या मागे नेहमी उभे राहतात. आपल्या घरातील जे वृद्ध व्यक्ती आहेत आजी-आजोबा हे त्यांना नेहमी मदत करायला हवे व त्याचबरोबर त्यांना आवश्यकतेनुसार मदत करणे सुद्धा शुभ मानले जाते म्हणून या चार व्यक्तींचा नेहमी सन्मान करा त्याचा अपमान कधीच करू नका.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.