बायकांनी पर्स मध्ये नेहमी ठेवा या 5 खास वस्तू; कधीही पर्स रिकामी होणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. स्त्रियांना पर्स खूप आवडते आणि सध्याच्या काळामध्ये पर्स उपयोगी सुद्धा आहे परंतु अनेक स्त्रियांना पर्समध्ये काय ठेवावे हे माहिती नसते. अनेक स्त्रिया पर्समध्ये अनेक वस्तू कोंबून ठेवतात पण या सर्व वस्तू ठेवल्या मुळे अनेकदा आपल्याला वेगवेगळे परिणाम सुद्धा भोगावे लागतात आणि या सगळ्यांमध्येच आपण आपल्या पैशाचे पाकीट सुद्धा ठेवत असतो. पर्समध्ये कोणत्याही वस्तू ठेवल्या तर त्याचा विपरीत परिणाम कदाचित भोगावा लागु शकतो.
पर्स खरेदी करताना पर्सचा रंग सुद्धा महत्त्वाचे ठरत असतो.आपल्यापैकी अनेक जण निळा व काळया रंगाचे पर्स विकत घेत असतात म्हणून परंतु पैशाचे पाकीट कधीही काळया रंगाचे किंवा निळ्या रंगाच्या पर्समध्ये असू नये. काळे व निळ्या रंगाचे पाकीट असेल तर त्यावर राहू ग्रहाची व’क्रदृ’ष्टी पडते आणि खर्च भरपूर प्रमाणामध्ये होत असतो. अशा प्रकारच्या पाकिटामध्ये पैसे टिकत नाही म्हणून या रंगा व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही रंगाचे पाकीट वापरू शकतात.
परंतु काळी व निळी पर्स पैशांसाठी अजिबात वापरू नये. शुक्रदेव पैसे प्राप्ती साठी महत्वाचे ठरत असते व त्यांचा आवडता रंग गुलाबी व हिरवा असतो. म्हणूनच आज आपण या लेखांमध्ये अशा काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत या गोष्टींमुळे आपले पाकीट नेहमी भरलेले असेल व त्याचबरोबर पाकीट मध्ये नेमक्या कोणत्या वस्तू आपल्याला ठेवायला पाहिजेत ज्यामुळे आपल्या पैशाची आवक नेहमी वाढणार आहे व आपले पाकीट कधीच भविष्यामध्ये रिकामे होणार नाही, चला तर मग जाणून घेऊया बद्दल..
या अशा काही पाच वस्तू आहेत त्या पाच वस्तू पैकी एक वस्तू तुम्ही तुमच्या पाकीटा मध्ये ठेवा यामुळे तुमचे पाकीट नेहमी भरलेले असेल. कितीही खर्च केला तरी तुमचे पाकीट कधीच रिकामी होणार नाही त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे कवडी. कवडीला माता महालक्ष्मी चे प्रतिरूप मानले गेलेले आहे. कवडीची समुद्रामध्ये मिळते आणि माता महालक्ष्मी चा उगम सुद्धा समुद्रातून झालेला आहे.
म्हणून माता महालक्ष्मी ला कवडी अतिशय प्रिय आहे. पूर्वीच्या काळी चलन म्हणून कवडीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे म्हणूनच कवडी म्हणजे प्रत्यक्ष पैसा आहे म्हणून पाच कवडी आपल्याला आपल्या पाकिटामध्ये ठेवायचा आहे आणि त्या मध्ये थोडेसे कुंकू टाकून एका कागदामध्ये बांधून लाल रंगाच्या धाग्याने व्यवस्थित बांधायचे आहे आणि हे आपल्या पाकिटामध्ये ठेवायचे आहे.
त्यामुळे लक्ष्मी आपल्या पाकिटामध्ये सदैव राहील त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे गणपती बाप्पा माता महालक्ष्मी यांचा एकत्रित असलेला फोटो चे पूजन करून तो फोटो आपल्या पाकिटामध्ये ठेवावा परंतु जेव्हा आपण देवांचे फोटो आपल्या पाकीटा मध्ये ठेवतो तेव्हा त्यांचे पावित्र्य जपले जाईल याची सुद्धा काळजी आपल्याला घ्यायला हवी यामुळेसुद्धा तुमच्या पाकिटामध्ये पैशाची वाढ होईल त्यानंतर ची तिसरी गोष्ट म्हणजे दक्षिणमुखी शंख पूजा. सामग्री च्या दुकानामध्ये दक्षिणमुखी शंख व आपल्याला सहज उपलब्ध होत असतो.
दुकानामधून लहान आकाराचा दक्षिणमुखी शंख आपल्याला आणायचा आहे आणि तो शंख रात्रभर आपल्याला देवपुजे च्या जागेवर म्हणजेच देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो शंख आपल्याला आपल्या पाकिटामध्ये ठेवायचा आहे असे केल्याने सुद्धा तुम्हाला लाभ होईल. शंख हे श्री विष्णू यांचे प्रतीक मानले जाते आणि श्रीविष्णु आणि माता महालक्ष्मी यांचे पती पत्नी संबंध अतिशय चांगले असल्यामुळे जेव्हा आपण श्री विष्णू यांची आराधना करतो अशावेळी माता महालक्ष्मी आपोआप आपल्याकडे येत असते.
चौथी गोष्ट म्हणजे एक मुखी असलेला नारळ. हा नारळ सुपारी सारखा असतो, या सुपारीचे प्रमाणे असणाऱ्या नारळाचे पूजन करून आपल्या पाकिटामध्ये हा छोटासा नारळ जरूर ठेवावा यामुळे सुद्धा तुमच्या पाकिटामध्ये पैशाची कमतरता कधीच निर्माण होणार नाही यापुढील पाचवी गोष्ट अशी आहे ज्यामुळे चोरांपासून तुमचं पाकिटाचे संरक्षण होणार आहे. यासाठी आपल्याला चांदीचे छोटी छोटी तलवार व त्रिशूल बनवून त्यांची पुजा अर्चना करून महादेवाच्या मंदिरा मध्ये काही काळ ठेवायचे आहे आणि त्यानंतर हे त्रिशूल आपल्याला आपल्या पाकीटा मध्ये ठेवायचे आहे. यामुळे तुमच्या पर्समधील वस्तूंचे चोरांपासून संरक्षण होईल.
त्यानंतर अत्यंत महत्त्वाची वस्तू मध्ये गुलाब जलाची छोटीशी बॉटल. जर तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये गुलाब जलाची परफ्यूम बॉटल ठेवली तर यामुळे तुमचा शुक्र ग्रह मजबूत होतो. थोडेसे परफ्युम पाकिटामध्ये शिंपडावे यामुळेसुद्धा शुक्र ग्रह मजबूत होतो. तुम्हाला या पाच वस्तू पैकी कोणती एक वस्तू तुम्हाला तुमच्या पाकिटामध्ये ठेवायचे आहे असे केले तर तुमच्या पाकिटामध्ये नेहमी पैशाची आवक येईल, तुमचे पाकीट भविष्यात कधीच रिकामे होणार नाही.माता महालक्ष्मी तुमच्यावर सदैव कृपा करेल आणि माता महालक्ष्मी च्या आशीर्वादाने तुमचे पाकीट नेहमी भरलेले राहील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.