बायकांनी कधीही घालू नये अशाप्रकारची पैंजण; नाहीतर आयुष्यभर या गोष्टींना जावे लागते सामोरे.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपली भारतीय संस्कृती ही सर्वांपेक्षा वेगळी आहे. या इतरांपेक्षा खूप भिन्न संस्कृतीत वेशभूषेत दागिन्यांचा वापर मोठ्या प्रमाणत केला जातो तसेच महिला आपल्याकडे नखशिकांत दागदागिने वापरत असतात. आपल्याकडे स्त्रिया केसांच्या गजरा पासून ते पायापर्यंत वेगवेगळ्या अलंकाराने सजलेले असतात आणि भारतीय संस्कृतीमध्ये दागदागिने घालने अतिशय चांगले मानले जाते. पायात पैजण घालणं याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.
पायात पैजण घातल्याने त्याचा परिणाम आपल्यावर सकारात्मक होतो परंतु जर पायामध्ये चुकीच्या पद्धतीने पैंजण घातले तर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा आपल्या जीवनावर होऊ शकतो. यामुळे आपण आपले जीवनाचे स्वतःचे नुकसान करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया पायात पैंजण घालण्याचे फायदे व तोटे नेमके काय आहेत त्याबद्दल..
कोणत्याही विवाहित स्त्रियांनी आपल्या पायातील पैजण दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला घालायला अजिबात देऊ नये यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन धोक्यामध्ये येऊ शकते. पैजण मधील ध्वनी नादामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते म्हणून पैंजण घालताना त्यामध्ये घुंगरू सुद्धा असायला हवेत. जर पैंजण तुटलेली असेल, पैंजण मधील घुंगरू दाबले गेले असतील,पैंजण तुटलेली असतील तर अशा प्रकारचे पैंजण पायामध्ये घालू नका.
जर तुम्हाला बाहेर कुठे रस्त्यामध्ये व अन्य ठिकाणी पैंजण सापडली तर ती पैंजण अजिबात घरात आणू नका अशी पैंजण घरांमध्ये आणल्याने नकारात्मक उर्जा प्रवेश करत असते. अशी पैंजण जर आपण आपल्या घरामध्ये आणले तर त्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या घरातील सदस्यांवर होऊ शकतो आणि आपले जीवन सुद्धा नकारात्मक बनू शकते त्याच बरोबर कधीही पायामध्ये सोन्याची पैंजण अजिबात घालू नका कारण की सोने हा धातू याचे मुख्य देवता कुबेर देव आहे आणि जर अशा वेळी आपण सोन्याचे पैंजण पायामध्ये घातले तर साक्षात कुबेर देव यांचा अपमान केल्यासारखे होते आणि असे केल्याने आपल्या जीवनातून व घरातून धन हळूहळू कमी होऊन जाते.
ती होती पैंजण बाबतीत काही तोटे आता आपण पैंजण घातले नाही आपल्याला काय काय फायदे होतात याबद्दल जाणून घेऊया. पायात पैंजण घेतल्याने स्त्रीच्या अलंकार आभूषण मध्ये वाढ होते त्याचबरोबर पायामध्ये पैंजण घातले तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. पैंजण मधील घुंगराच्या आवाजाने पत्नी आपल्या पतीला आकर्षित करू शकतात. पैंजणात घुंगरू च्या आवाजा मुळे आपल्याला लगेच कळते की आपली पत्नी रागा मध्ये आहे की प्रेमामध्ये आहे त्याचबरोबर पायामध्ये पैंजण घातले नाही आपल्या पायाचे हाड मजबूत बनते.
पैंजण घातल्याने त्याचे शरीराला अनेक असे फायदे आहेत.जेव्हा स्त्रिया पैंजण घालतात तेव्हा चांदीचा धातू पायाला घासत असतात आणि यामुळेच चांदीचे गुणधर्म आपल्या शरीरामध्ये उतरतात. यामुळे महिलांच्या आरोग्याला असे अनेक गुणधर्म प्राप्त होत असतात. चांदी हा धातू शीत प्रवृत्तीचा आहे म्हणून पायामध्ये पैंजण घातल्याने आपल्या शरीराचे तापमान सुद्धा नियंत्रण राहते तर हे होते पायामध्ये पैंजण घालण्याचे काही फायदे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.