घरात गोमूत्र का शिंपडावे..? गोमूत्र शिंपडल्याने घरात नेमके काय घडते..?

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांच स्वागत आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत गोमूत्राला महत्वाचे स्थान आहे. शुभ कार्यात अशुभ काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते. त्यामुळे पूजा, लग्न किंवा अन्य कोणताही समारंभ असो त्यावेळी गोमूत्र शिंपडले जाते. तुमच्या कुंडलीतील ग्रहात दोष असल्यास किंवा वास्तू दोष असल्यास तुम्ही दार सोमवारी आणि शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्रास कमी होतो अशी धारणा आहे.

सगळ्या परंपरांच्या मागे मनोवैज्ञानिक किंवा वैज्ञानिक कारणे आहेत आणि त्यांचा संबंध धर्माशीही आहे. घर परिवारातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ऋषीमुनींनी गोमूत्र शिंपडण्याचा अचूक उपाय सांगितला आहे. जुन्या काळापासून गोमूत्र शिंपडण्याची परंपरा चालत आली आहे. शास्त्रात गायीला पुज्यनीय आणि पवित्र मानले आहे. गायीला माता असे संबोधले जाते.

त्यामुळे गायीपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट पवित्र आहे. हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे. वास्तुनुसार गायीचे गोमूत्र घरातील सगळे वास्तुदोष समाप्त करण्यास उपयुक्त ठरते. गायीची पूजा केल्याने आपले पाप नष्ट होते अशीही धारणा आहे. काही बाबतीत तुम्हाला त्रास होत असेल घरातील सदस्यांमुळे मानसिक ताण आणि क्लेश सहन करावा लागत असेल तर त्यापासुन मुक्त होण्यासाठी अनेक परंपरा आहेत.

mid-day.com

वैदिक काळापासून अशा काही परंपरा आहेत ज्या घराला समृद्ध ठेवतात. त्यापैकी एक म्हणजे गोमूत्र शिंपडावे. गोमूत्र प्राशन केल्याने मूत्रपिंडाचे आजार व मूत्रविकार बरे करता येतात. अन्नातून युरिया, कीटकनाशके शरीरात जातात. पाणी आणि हवेतूनही दूषित घटक शरीरात जातात. त्याचा ताण मूत्रपिंडावर येतो आणि मूत्रपिंडाचे विकार वाढतात.

गोमूत्र त्यावर प्रभावी औषध आहे. घरातील वास्तू दोष मिटण्यासाठी रोज घरात गोमूत्र शिंपडावे. गोमूत्रामुळे वातावरणातील सुष्म किटाणू नष्ट होण्यास मदत होते. तर ज्या घरात गोमूत्र रोज शिंपडले जाते तिथे सर्व देवीदेवतांची कृपा दृष्टी प्राप्त होते अशी समजूत आहे. गोमूत्र शिंपडल्याने धान्य आणि धनाची कधीच कमतरता भासत नाही.

तर मित्रांनो तुम्हीही घरात दररोज गोमूत्र शिंपडा आणि आपले घर वास्तुदोषापासून मुक्त करा. हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला नक्की विसरू नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *