घरामध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्यावर काय होते..? परिणाम जाणून हैराण व्हाल..!

घरामध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्यावर काय होते..? परिणाम जाणून हैराण व्हाल..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हत्तीला आपल्या हिंदू संस्कृतीत खूप शक्तिशाली व पवित्र प्राणी मानले जाते, हत्तीला दिर्घआयुष्याचे प्रतीकही मानतात. वास्तुशास्त्रानुसार घरात हत्तीची मूर्ती बसविल्याने खूप फायदे होतात. वास्तुशास्त्रात घर असो, दुकान असो कि फॅक्टरी असो हत्ती हत्तीची मूर्ती किंवा सिम्बॉल ठेवणे खूपच लाभदायक ठरते.

घरात किंवा दुकानात उत्तरेकडे वरती सोंड केलेला हत्ती ठेवल्याने त्याचा सकारत्मक परिणाम घरामध्ये होतो. प्राचीन धर्मग्रंथानुसार चांदीचा भरीव हत्ती बनवून घरात ठेवल्यास घरातील ग्रहांचा वाईट प्रभाव कमी होऊन चांगल्या प्रभावात रूपांतर होते. तसे तर हत्तीकडे गणपतीचे रूप म्हणूनही पाहिले जाते.

घराच्या मुख्य दारावर वरती सोंड केलेले २ हत्ती दोन्ही बाजूंना लावल्यास घरात प्रेमळ व आनंदी वातावरण निर्माण होते व कोणत्याही प्रकारचा नजर दोषही लागत नाही. ड्रॉईंग रूममध्ये जर हत्तीच्या कळपाचे चित्र लावल्यास ते कौटुंबिक सुख शांतीचे द्यूतक मानले जाते. घरात कोणत्याही प्रकारचे वादविवाद भांडण तंटे होत नाहीत.

कुटुंबातील भांडणे मिटवण्यासाठी ३ हत्ती पूर्व दिशेला ठेवणेही शुभ मानले जाते. परंतु असे हत्तीचे कळप घरात ठेवताना या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे कि घरात सर्वात मोठा हत्ती ठेवताना पुढे असायला हवा व त्याच्यामागे उतरत्या क्रमाने हत्ती ठेवावेत. म्हणजे सर्वात शेवटी जो हत्ती असेल तो सर्वात लहान असावा. असा हत्तीचं कळप घरात ठेवणे खूपच फायदेशीर आहे.

आपल्या बेडरूममध्ये पांढऱ्या रंगाच्या हत्तीची मूर्ती ठेवल्यास पतिपत्नीतील प्रेम वाढते. आपले पूर्वज असे सांगायचे कि कर्जापासून मुक्तता मिळवायची असेल तर असली हत्तीच्या खालून निघावे व त्याच्या पायाखालची थोडीशी माती उचलून ती विहिरीत टाकावी. त्यामुळे आपल्यावर जर कर्ज असेल तर ते लवकरच फिटेल.

आपल्याला शत्रू त्रास देत असतील किंवा शत्रूंचे भय वाटत असेल तर शनिवारी एक अंकुश हत्तीच्या महुंताला दान करावे. यामुळे आपल्या शत्रूंचा नाश होईल व शत्रूंचा त्रास कमी होईल.

लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी, घरात पैशांची आवक वाढावी, धनलाभ व्हावा यासाठी चांदीचा एक भरीव हत्ती, तो छोटा असला तरी चालेल पण भरीवच असावा असा हत्ती आपल्या पैशांच्या तिजोरीत ठेवावा. पण लक्षात ठेवा हा हत्तीही वरती सोंड केलेलाच असावा. असे केल्याने आपल्या पैशांची आवक वाढेल व माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल. आपल्या आर्थिक स्थितीत खूप फरक पडलेला आपल्याला जाणवेल.

जर उंच सोंडेचा हत्ती आपण आपल्या ऑफिसच्या टेबलवर ठेवला तर आपल्या कार्यक्षमतेत वाढ होते त्याबरोबरच निर्णयक्षमतेत प्रभावी बदल पाहायला मिळतात व इतरांनाही आपल्यात बदल जाणवू लागते. जर तुम्ही चांदीचा हत्ती बनवून ठेवू शकता तर खूपच चांगले आहे पण जर तुम्हाला चांदीचा भरीव हत्ती बनवून ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही पांढऱ्या मार्बलचा देखील हत्ती ठेऊ शकता.

परंतु २ हत्तीच्या मध्ये माता लक्ष्मीची स्थापना केलेली असेल तर असे हत्ती तुम्ही अगदी दारासमोर ठेऊ शकत नाहीत. कारण माता लक्ष्मीची नजर बाहेर पडायला नको व बाहेरची कोणी व्यक्ती घरात आल्यास त्यांची नजर माता लक्ष्मीवर पडायला नको. माता लक्ष्मी नेहमी इतरांना दिसणार नाही अशा ठिकाणीच ठेवावी म्हणजे घरात लक्ष्मी टिकते. तिला धनलाभाचे व दीर्घायुष्याचे प्रतीक मानतात म्हणून आपण जर उंच सोंडेच्या हत्तीचा योग्य ठिकाणी वापर केल्यास कितीतरी प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात.

तर मित्रांनो आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना हि माहिती शेअर करायला जरूर विसरू नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *