अष्टकोनी आरसा तिजोरीत ठेवल्याने काय होते.? खूपच कमी लोकांना आहे हि माहिती.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा तुमच्या घरात पैसा तर भरपूर येतो मात्र तो या ना त्या कारणाने जर बाहेर जात असेल तर आज आम्ही तुम्हाला एक उपाय सांगत आहोत.हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे. हा उपाय फेंगशुई संबधित आहे ,ज्या प्रकारे भारतामध्ये वास्तु शास्त्राची निर्मिती झाली अगदी त्याच प्रकारे या देशांमध्ये फेंगशुईच्या नावाचे शास्त्र निर्माण झालेले आहे.
आपले दैनंदिन जीवन सुकर करण्यासाठी, सुखमय करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय सांगण्यात येतात. अशा प्रकारे भारतीय वास्तूशास्त्र हे अतिशय प्रभावी मानलं जातं अगदी त्याच प्रकारे फेंगशुई उपाय सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आणि परिणामकारक संपूर्ण जगामध्ये मानले जातात, असा एक उपाय आज आपण जाणून घेणार आहोत, त्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा योग्य मार्गाने त्याचा अपव्यय होणार नाही.पैसा योग्य मार्गाने खर्च केला जाईल.
बरेचदा असं होतं की आपल्या घरामध्ये खूप मेहनत करून कष्ट करून पैसा आलेला असतो आणि मग उगीचच आजारपण निर्माण होतात किंवा विनाकारण एखाद्याला नको त्या गोष्टीवर पैसा खर्च होतो किंवा मग एखादा वाढदिवस साजरा करायचा असेल ,लग्न असेल या ना त्या कारणाने हा पैसा घराबाहेर जात राहतो आणि ते घर कधीही प्रगति करू शकत नाही तर त्यासाठीचा हा उपाय आहे.
लक्षात ठेवा हा उपाय धनप्राप्तीचे नाहीये.कसे होते की अनेकदा उपाय सांगत असतो मात्र लोकांना कशाकरता वापर करायचा हे समजत नाही. जर तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल तर हा उपाय आपण करू नका. हा उपाय अशा लोकांसाठी आहे त्यांच्या घरामध्ये पैसा तर येतो मात्र तो टिकत नाही.
यासाठी आपण ज्या ठिकाणी आपले पैसे ठेवत आहे त्या तिजोरीमध्ये म्हणा किंवा बॉक्समध्ये म्हणा किंवा कोणत्याही ठिकाणी कपाटांमध्ये आपण हिरव्या रंगाचे कापड अंथरायचे आहे तर हा हिरवा रंग झाडाच्या पानांना असतो तो हिरवा रंग.बरेच जण यांना हिरवा रंग सांगितला तर लोक पोपटी रंगाचे वस्त्र वापरत असतात आणि मग म्हणतात की या उपायाचा काहीही फायदा झालेला नाही तर हिरव्या रंगाचे कापड आपण हा उपाय करताना वापरायचा आहे आणि या कापडावरती अष्टकोणी आरसा ठेवायचा आहे.
अष्टकोणी म्हणजे काय तर असा आरसा त्याला आठ कोण आहेत. तुमच्या आजूबाजूच्या दुकानांमध्ये हा आरसा मिळून जाईल. जर तो तिथे नसेल तर तुम्ही ऑनलाईन आरसा खरेदी करू शकता. हा आरसा आपण हिरव्या कपडवरती ठेवायचा आहे, त्याला एका चौकोनामध्ये आपण फ्रेम करायचे.एक चौकट तयार करून घ्यायची आहे आणि मग त्यावर तो आरसा ठेवायचा आहे हे केल्यानंतर पैसे ठेवायचे आहे.आणि हे पैसे आपल्या तिजोरी मध्ये ठेवायचे असे केल्याने असलेला पैसा घरात राहील तो लवकर बाहेर जाणार नाही. हा उपाय केल्यानंतर काही दिवसांत तुम्हाला फरक दिसेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.