वाफ घेतांना घरातील या 7 पैकी 1 पदार्थ टाका; इतके फायदे होतील कि तुमचा विश्वासच बसणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण संसर्गापासून आपला बचाव करण्यासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी घरच्या घरी करता येणारा आणि सर्दी ,ताप, खोकला ,घसा दुखणे, घशातील इन्फेक्शन, घशात आणि छाती जमा झालेला कफ देखील मोकळा करण्यासाठी चा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
या वाढलेल्या संसर्गामुळे प्रत्येक जण त्रस्त आहे. को”रो”ना पासून दूर राहण्यासाठी प्रत्येक जण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करताना दिसत आहे.को”रो”ना पासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आपल्याला आपल्या आहारामध्ये फळे आणि पौष्टिक आहार यांचा समावेश नक्कीच करायला हवा या सोबतच को”रो”ना पासून दूर राहण्यासाठी वाफ घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
को”रो”ना विरुद्धच्या लढाईमध्ये वाफ घेणे महत्त्वाचे आहे, असे डॉक्टर देखील सांगत आहे. को”रो”ना रुग्ण व्यतिरिक्त इतर व्यक्ती सुद्धा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने दिवसातून दोन वेळा तरी वाफ घेतली पाहिजे. जी व्यक्ती घराच्या बाहेर पडतच नाही अशा व्यक्तीने एक वेळेस वाफ घेतली तरीही चालेल. जी व्यक्ती एखाद्या तासासाठी बाहेर पडते तिने दोन वेळेस वाफ घ्यावी आणि जी व्यक्ती दिवसभर बाहेर कामासाठी जाते अशा व्यक्तींनी दिवसभरात तीन वेळेस नक्कीच घ्यावी तर आज आपण जाणून घेणार आहोत वाफ घेण्याचे फायदे. वाफ घेण्याची योग्य पद्धत आणि वाफ घेत असताना कोणत्या घटकांचा उपयोग आपण त्यामध्ये केला पाहिजे.
सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत की, वाफ घेताना कोणत्या गोष्टींचा समावेश या पाण्यामध्ये आपण करावा. वाफ घेताना निलगिरीचे तेल वापरणे चांगले आहे. सर्दी आणि फुफ्फुसांच्या समस्यांसाठी हे अतिशय प्रभावी मानले जाते यासाठी निलगिरी तेलाचे काही थेंब पाण्यात टाकून वाफ येऊ शकतो.
जर निलगिरीचे तेल नसेल तर आपण लिंबू किंवा संत्र्याची साल, आले ,दालचिनी तेल किंवा कडुलिंबाची, पुदिन्याची पाने देखील या पाण्यामध्ये वापर करू शकतो त्यामुळे काय फायदे होतात ते देखील आपण जाणून घेणार आहोत तर वाफ घेतल्याने नाक आणि घसा मोकळा होतो याशिवाय वाफ घेताना पाण्यात टाकलेले तेल आणि औषधी वनस्पतींमध्ये अँटीमायक्रोबियल घटक असतात जे शरीरातील जीवाणू आणि विषाणू नष्ट करण्यास प्रभावी मानले जाते या बरोबरच श्वास संदर्भात असलेली समस्या दूर करण्यासाठी किंवा नाक पटकन मोकळे करण्यासाठी देखील या औषधी गोष्टींचा उपयोग आपल्याला चांगल्या प्रकारे होतो.
आता आपण जाणून घेऊया वाफ दिवसभरात किती वेळेस द्यावी तर तज्ञांचा असा विश्वास आहे की, झोपण्याच्या वेळी आणि सकाळी उठल्यानंतर वाफ घेणे आवश्यक आहे त्यामुळे शरीरात अधिक प्रादुर्भाव होतो अशा परिस्थितीत वाफ घेतल्याने घशात आणि फुप्फुसात जमा होणारे विषाणू सहज बाहेर पडतील. दिवसातून एक दोन किंवा तीन वेळेस आपण वाफ घेऊ शकतो परंतु ही वाफ घेत असताना साधारणपणे दहा ते पंधरा मिनिट आधी हे पाणी चांगले गरम करून घ्यावे तसेच वाफ घेत असताना कोणाशीही बोलू नये आणि महत्त्वाचे म्हणजे तोंड बंद ठेवून नाकाने काही वेळा वाफ घ्यावी.
काही वेळेस नाक बंद करुन तोंडाने वाफ घ्यावी तर काही वेळेस तोंड आणि नाक दोन्ही बाजूंनी वाफ घ्या. वाफ घेण्याची योग्य पद्धत घेण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये साधारणपणे दोन ते चार लिटरपर्यंत पाणी घ्यावे ते पाणी चांगल्या प्रकारे उकळावे आणि हे पाणी उकळत असतानाच औषधी वनस्पती आणि सांगितल्या प्रमाणे आपल्या घरात जे पदार्थ उपलब्ध आहेत ते पाण्यामध्ये टाकून पाणी चांगल्या प्रकारे उकळून घ्यावे किंवा निलगिरीचे तेल टाकून पाणी चांगल्या प्रकारे उकळून घ्यावे आणि त्यानंतर डोक्यावर टावेल घेऊन वाफ घ्यावी.
जर तुमच्याकडे वाफ घेण्याचे मशीन किंवा स्टीमर असेल तर त्याने देखील तुम्ही वाफ घेऊ शकता.वाफ घेत असताना चेहरा आणि भांडे यामध्ये अंतर असावे तसेच वाफ घेत असताना एकाच वेळी जास्त वेळ वाफ घेऊ नये. वाफ घेत असताना इतरांशी बोलू नये अशा प्रकारे वाफ घेण्याचे फायदे आहेत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.