कोणता लाफिंग बुद्धा कोणती इच्छा पूर्ण करतो.? जाणून घेऊया यामागील खरे कारण.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपले हिंदू धर्मशास्त्रामध्ये व वास्तुशास्त्र मध्ये अनेक अशा काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेले आहेत त्यांच्या आधारे आपण आपले जीवन समृद्ध करू शकतो. जेव्हा आपण एखादे घर बांधत असतो. घराची रचना करत असतो, अशावेळी वास्तुशास्त्राचा अनेकदा उल्लेख आपण करतो तसेच वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्ट कशी व्यवस्थित रित्या बांधली जाईल याची काळजी देखील करतो. वास्तुशास्त्र हे एक शास्त्र आहे आणि या शास्त्रामध्ये आपल्या घरातील वातावरण कसे आनंदी राहील याबद्दल अनेक मार्गदर्शक तत्त्व सांगण्यात आलेले आहेत.
आपल्यापैकी अनेक लोकांना घरामध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवण्याचा छंद असतो. त्या वस्तू मागे अनेकदा काही अध्यात्मिक दृष्ट्या कारण असते किंवा काही वस्तूंच्या मागे वास्तुशास्त्रानुसार काही महत्त्वाचे उद्देश असते. आपल्या आजूबाजूला असे अनेक स्वच्छंदी लोक आहेत, ज्यांना घरामध्ये वेगवेगळ्या वस्तू जतन करून ठेवण्याचा छंद असतो. या वस्तूंमध्ये कासव, लाफिंग बुद्धा,देवी-देवतांचा मुर्त्या ,पेंटिंग इत्यादी गोष्टींचा आवर्जून समावेश दिसून येतो. तुम्हाला सुद्धा या सगळ्या वस्तू जमा करून ठेवायचा छंद असेल तर आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..
आपल्यापैकी अनेकांना घरामध्ये लाफिंग बुद्धा ठेवण्याची सवय व छंद असते. अनेकदा आपण एकमेकांच्या घरी गेल्यावर लाफिंग बुद्धा पाहत असतो परंतु हा लाफिंग बुद्धा आपल्या घरामध्ये ठेवण्यामागे नेमके कारण काय असते? कोणता लाफिंग बुद्धा आपल्या घरासाठी सकारात्मक ठरतो याबद्दल आणि त्यांना फारशी माहिती नसते. हीच माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
भारतामध्ये धनाची देवता कुबेर यांना प्रमुख मानले जाते त्याचप्रमाणे चीनमध्ये लाफिंग बुद्ध हा धनाचा देवता मानला गेलेला आहे. बहुतेक वेळा धनाचे प्रतीक म्हणून लाफिंग बुद्धाकडे पाहिलं जातं म्हणूनच अनेकदा लोकांच्या घरी लाफिंग बुद्धा प्रामुख्याने दिसून येतो.असे म्हटले जाते की, ज्या व्यक्तींच्या घरी लाफिंग बुद्धा पाहायला मिळतो त्या व्यक्तीच्या घरात धनसंपत्ती वैभव यांची आवक वाढते. जर तुम्ही लाफिंग बुद्धा घरामध्ये आणणार असाल तर अशा वेळी त्या लाफिंग बुद्धा ची दिशा योग्य असायला हवी परंतु अनेकांना दिशेने बद्दल माहिती नसते आणि म्हणूनच आपल्याला अनेक गोष्टींचे फळेदेखील प्राप्त होत नाही.
वास्तुशास्त्र व हिंदू धर्मशास्त्रामध्ये पूर्व दिशा शुभ दिशा मानली जाते. पूर्व दिशेला अनेक सकारात्मक कार्य केले जातात. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख शांती वैभव नांदावी असे वाटत असेल तर तुमच्या घरामध्ये लाफिंग बुद्धा हा पूर्व दिशेला ठेवायला हवा. फेंगशुईनुसार जर आपण लाफिंग बुद्धा अग्नेय दिशेला ठेवल्यास त्यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि ही सकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनाला सकारात्मक वळण देण्यास कारणीभूत ठरते. जर एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर अशावेळी शत्रूपासून सुटका मिळविण्यासाठी सुद्धा लाफिंग बुद्ध अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
जर तुम्ही घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये लाफिंग बुद्धा ची मूर्ती ठेवत असाल तर ती मूर्ती तुमच्या नजरेसमोर राहील याची काळजी आवश्यक घ्यायला हवी. लाफिंग बुद्धा चे तोंड आपल्या घराच्या बाहेरील दिशेला असायला हवे म्हणजे घरामध्ये कोणतीही व्यक्ती आत प्रवेश करेल तेव्हा त्याचे आधी लक्ष लाफिंग बुद्धा वर जाईल असे ठेवावा, त्याचबरोबर लाफिंग बुद्धा हा कोणत्याही धातूचा बनवलेल्या नसावा तो फक्त सिरामिक असायला हवा.
लाफिंग बुद्धा हा आनंदी वातावरणाचे प्रतीक मानले जाते, त्याचबरोबर चिनी वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्धा हा कधीच बेडरूम मध्ये ठेवू नये व त्यांची पुजा देखील करू नये. हा लाफिंग बुद्धा शोभेची वस्तू म्हणूनच घरामध्ये ठेवायला पाहिजे या लाफिंग बुद्धा चे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. हसणारा, हातामध्ये फळ घेतलेले किंवा हातामध्ये कमंडलू घेतलेले किंवा कमंडलू मध्ये बसलेले असे वेगवेगळे प्रकारचे लाफिंग बुद्ध आपल्याला पाहायला मिळतात.
या प्रत्येक प्रकारानुसार त्याचे अर्थ सुद्धा वेगवेगळे असतात. जर आपल्या घरामध्ये हसणारा लाफिंग बुद्धा असेल तर याचा अर्थ आपल्या घरामध्ये नेहमी आनंदाचे वातावरण निर्माण राहील व घरातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर आनंदी व प्रसन्न त्याचे हावभाव पाहायला मिळतील. दोन्ही हात वर केलेला लाफिंग बुद्धा अशा प्रकारचा बुद्धा आपल्या घरामध्ये दोन ते तीन फूट उंचावर व लाकडी किंवा धातूच्या स्टॉलवर ठेवावा असे केल्याने आपल्याला लाभ मिळतो.
ज्या व्यक्तींच्या घरांमध्ये व ऑफिसमध्ये वारंवार भांडणे होत असतील तर अशा ठिकाणी दोन्ही हात वर केलेल्या लाफिंग बुद्धाची मूर्ती आजिबात ठेवू नये शक्यतो ऑफिसमध्ये आणि घरामध्ये बसलेला लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवायला हवी. खांद्यावर गाठोडी घेतलेला लाफिंग बुद्धा. अशा प्रकारची मूर्ती विकत घेत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की ती गाठोडी नेहमी धनाने भरलेली असावी.
रिकामी गाठोडी कधीच असलेली मूर्ती विकत घेऊ नये. गाठोळे मधून नेहमी धन बाहेर पडणारे असावे अशा प्रकारची मूर्ती ज्या ठिकाणी असते त्याठिकाणी आर्थिक चक्र वेगाने फिरत असतात आणि म्हणूनच अशा प्रकारची मूर्ती आपल्याला व्यवसायाच्या ठिकाणी,दुकानाच्या ठिकाणी नेहमी ठेवायला हव्यात यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये नेहमी प्रगती होईल आणि तुमच्या आर्थिक धनामध्ये देखील वाढच होत जाईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.