संपूर्ण व्यसन मुक्तीसाठी याच्या पंचांगाचा काढा पाजा; काही दिवसातच तुमचं व्यसन पूर्णपणे सुटून जाईल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या वनस्पती उपलब्ध असतात परंतु आपल्याला त्या वनस्पती बद्दल फारशी माहिती नसल्याने अनेकदा आपण अनेक वनस्पती कडे दुर्लक्ष करत असतो अशाच एका दुर्लक्षित असलेल्या वनस्पती बद्दल आज आपण आपल्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. ही वनस्पती जरी दुर्लक्षित असली तरी त्याचे औषधी गुणधर्म अतिशय महत्त्वाचे आहे.
आयुर्वेदिक शास्त्रामध्ये ही वनस्पती अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे. ही वनस्पती म्हणजेच एक प्रकारचे उंच झाड आहे. या झाडाचे नाव आहे भेंडी. हे झाड जरी आपल्याला पिंपळा प्रमाणे दिसायला असले तरी या झाडाला जी फुले येतात ती पिवळसर रंगाची टोपी दार आकाराची असतात की वर्षभर फुले बहरत असतात.या झाडाच्या पानांचा आकार अगदी पिंपळा सारखा असतो. या झाडाला पिवळसर रंगाची फुले असतात त्याच बरोबर या फुलांमध्ये काळी तपकीरी रंगाचे बिया सुद्धा असतात.
ही फुले अतिशय महत्त्वाचे मानले गेलेले आहेत. हे झाड फक्त होड्या व कागद निर्मितीसाठी वापरले जात नाही तर त्याचे अन्य आयुर्वेदिक गुणधर्म सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहेत. चला तर मग जाणून घेऊया या भेंडी च्या झाडा बद्दल आणि असे कोणते औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहेत.
आयुर्वेदिक शास्त्रानुसार भेंडीचे झाड हे मधुर शितल वीर्यवर्धक वर्धक असे मानले गेले आहे. हे झाड केस वाढवण्यासाठी ,हृदयरोग नष्ट करण्यासाठी, कशा संबंधित आजारांवर हे झाड अतिशय उपयुक्त आहे. या झाडाची फळे खाज ऍलर्जी व श्वासाना संदर्भात जे काही आजार असतात तेच दूर करतात त्याशिवाय याच गर्भ दोषाचे आजार सुद्धा ही वनस्पती दूर करते.
भेंडीची साल बारीक वाटून नारळाच्या तेला सोबत आपल्या त्वचेवर लावल्यास जर कोणत्याही प्रकारचा त्वचाविकार असेल तर तो पूर्णपणे नाहीसा होऊन जातो. हा उपाय आपण सात दिवस केल्याने आपल्या शरीरावर खाज खरूज नायटा व इत्यादी त्वचा विकार असल्यास ते पूर्णपणे दूर होऊन जातात.
या झाडाची फुले बारीक वाटून त्याची पेस्ट बनवावी. ही पेस्ट ओल्या खाजेवर लावल्यावर लगेच आराम पडतो. या फुलांच्या रसामध्ये काळी मिरची पावडर टाकून म्हणजे चूर्ण टाकून लहान गोळ्या बनवा. या गोळ्या सकाळी नियमितपणे खाल्ल्याने आपल्या छातीमध्ये साचलेला क पूर्णपणे बाहेर निघण्यास मदत होतो.
औषधी वनस्पती आपल्या केसांसाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. जर आपले केसांमध्ये कोंडा केस तुटत असतील केस विरळ झालेले आहे अशा प्रकारच्या समस्या साठी औषध व हे झाड अतिशय महत्त्वाचे ठरते.केस संदर्भातील समस्या वर उपाय करण्यासाठी आपल्याला या झाडाची फळे वाळवून त्याची पेस्ट बनवून जर आपण खोबरेल तेल टाकून नियमितपणे केसांची मालिश केल्याने आपले केस गळण्याची समस्या पूर्णपणे बंद होऊन जाते.
हे झाड पिता विकारांवर सुद्धा अतिशय महत्त्वाचे ठरते. पंचांगाचे काढा प्यायला ने आपल्या शरीरातील पित्त पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्या शरीरातील रक्त शुद्धीकरण सुद्धा केले जाते नशा मुक्ती साठी या फुलांच्या पंचांगाचा काढा प्यायल्याने तुमची कोणत्याही प्रकारची नशा पूर्णपणे लवकर बरी होऊन जाते आणि तुम्ही नशा मुक्त होतात.
मोहरीच्या तेलामध्ये या झाडाच्या बिया चांगल्या पद्धतीने कळवल्यानंतर जर आपण अंगाला लावली तर डास मच्छर व अन्य कीटक सुद्धा आजूबाजूला फिरकणार नाही. भेंडीच्या झाडाच्या मुळाची पावडर जर आपण मुळव्याध असलेल्या ठिकाणी लावली तर आपल्या मुळव्याध पूर्णपणे बरा होऊन जातो त्याच बरोबर या मुळांचा काढा अतिसार जुलाब यासारख्या आजारांना सुद्धा प्रभावी ठरतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.