व्हिटॅमिन इ कॅप्सूल खात असाल तर त्याच्या या फायदे आणि तोट्याविषयी एकदा नक्कीच जाणून घ्या.!

व्हिटॅमिन इ कॅप्सूल खात असाल तर त्याच्या या फायदे आणि तोट्याविषयी एकदा नक्कीच जाणून घ्या.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या कॅप्सूल चे सेवन करत असतो आणि अशावेळी या कॅप्सूल चा आपल्या शरीराला नेमका काय फायदा होतो हे जाणून घेऊन सुद्धा गरजेचे आहे. आजच्या लेखामध्ये आपण विटामिन इ कॅप्सुल्स चे नेमके काय फायदे आहेत ते कॅप्सूल घेतल्याने शरीराला काय फायदा होतो.हे कधी किंवा घ्यायला हवे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

आपल्या शरीराला विशिष्ट मात्रांमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, मिनरल्स, वेगवेगळे विटामिन यांची आवश्यकता असते. या सर्व गोष्टींमध्ये विटामिन इ सुद्धा समावेश होतो, यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटिऑक्सिडंट घटक उपलब्ध असतात. यामुळे आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्स यांच्या द्वारे हानिकारक घटक पासून संरक्षण करण्याचे बळ मिळते.

आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात त्यामुळेच आपल्या चेहऱ्यावर काळे डाग येणे, पिंपल्स येणे, चेहरा वर वारंवार लालसर पणा येणे, केस गळणे केसांमध्ये कोंडा निर्माण होणे यासारखे असंख्य समस्या या फ्री रॅडिकल्स मुळे निर्माण होतात आणि म्हणूनच अनेकदा जर आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स प्रमाण जास्त झाले तर तरुण वयामध्ये सुद्धा आपण म्हातारे दिसू लागतो आणि ज्या व्यक्ती विटामिन ई चा भरपूर प्रमाणामध्ये समावेश करतात त्यांचे वय तरुण दिसते.

विटामिन इ जे रॅडिकल्स मुळे आपल्या शरीरातील बॉडी सेल डॅमेज होण्याची शक्यता असते ते वाचवण्याची कार्य करते. विटामिन इ हे आपल्या शरीरासाठी अँटी एजिंग म्हणून काम करते. जर आपण याचा सर्वांत जास्त प्रमाणात वापर केले तर आपली त्वचा जास्त गोरी बनते. जेव्हा आपण विटामिन ई ची मात्रा जास्त प्रमाणात घेत होतो तेव्हा आपल्या शरीराला आवश्यक असेल तेवढी मात्र आपल्या शरीर स्वीकारते आणि त्यानंतर अतिरिक्त असलेले प्रमाण आपल्या शरीरामध्ये कुठेतरी साठवून ठेवण्याचे कार्य सुद्धा करते आणि म्हणूनच बहुतेक वेळा त्याचा दुष्परिणाम सुद्धा आपल्या शरीरावर होत असतो.

सर्वसामान्य माणसाला दिवसभरामध्ये 15 ग्रॅम विटामिन इ ची आवश्यकता असते यासाठी आपल्याला कोणतेही कॅप्सूल घेण्याची आवश्यकता नाही कारण की आपण दैनंदिन जीवनामध्ये जो आहार सेवन करत असतो त्या आहारामध्ये सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन-इ भरपूर प्रमाणामध्ये प्राप्त होत असते आणि यामुळेच आपल्या शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक सुद्धा प्राप्त होतात.

विटामिन इ हे अंडी,मांस, काजू, बदाम, पिस्ता व सर्व प्रकारच्या कडधान्य यामध्ये उपलब्ध असतात. आपल्याला मेडिकल च्या दुकानावर सुद्धा विटामिन ई ची कॅप्सूल सहज उपलब्ध असतात. या विटामिन इ कॅप्सूल वेगवेगळ्या कंपनीद्वारे बनवलेल्या असतात. काही विटामिन कॅप्सूल लाल रंगाचे असतात तर काही हिरव्या रंगाच्या असतात आता यांना जो रंग असतो तो आर्टिफिशियल रंग देण्यात आलेला असतो आणि यामुळे त्यांच्यातील वेगळेपण हे प्रामुख्याने दिसून येतो.

तसे पाहायला गेले तर विटामिन इ हे प्रामुख्याने जेल विटामिन कॅप्सूल असतात.लाल रंगाच्या ज्या विटामिन असतात त्या व्हेजिटेरियन( शाकाहारी) व्यक्तींना देऊ शकत नाही. विटामिन गोळीचा उपयोग काही वेळा अंतर्गत सेवनासाठी केला तर काही वेळा चेहऱ्यावरील बाह्य भागावर लावण्यासाठी केला जातो. सर्वप्रथम आपण बाह्य भागात बद्दल जाणून घेणार आहोत.

विटामिन इ चा उपयोग प्रामुख्याने केसांना, त्वचेवर लावण्यासाठी केला जातो. ही कॅप्सुल खोबरेल तेल आणि बदामाचे तेल सोबत टाकून आपण केसांना लावले तर यामुळे आपले तुटलेले केस,केसात कोंडा झाला असेल, केस गळतीचे प्रमाण बंद करण्याचे कार्य करते व या सगळ्या समस्या विटामिन इ मुळे दूर होतात. जेव्हापण विटामिन ई ची कॅप्सूल शरीरावरील कोणत्याही भागावर लावणारच सर्वप्रथम आपल्याला चेहऱ्यावर लावताना जर कोणत्याही प्रकारचा लालसरपणा निर्माण झाला तर डॉक्टरांच्या सहाय्याने याचे पुढील उपचार व वापर करणे गरजेचे ठरते.

साधारणतः अशा प्रकारचा लालसरपणा व कोणत्याही प्रकारची ऍलर्जी सहसा आढळत नाही जेव्हा आपण विटामिन ई च्या अंतर्गत सेवन याबद्दल चर्चा करतो तेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्ती शरीरामध्ये विटामिन ई ची कमतरता निर्माण होते तेव्हा डॉक्टरांनी द्वारे किंवा तज्ञ मंडळी द्वारे व्यक्तीला विटामिन सेवन करण्याचा सल्ला दिला जातो किंवा अन्य काही करण्याचे सांगितले जातात की ज्यामध्ये व्हिटॅमिन-इ भरपूर प्रमाणात असते.

या विटामिन ई ची कॅप्सूल आपण अधिक प्रमाणात सेवन केली तर आपल्या शरीराला अनेक साईड इफेक्ट व दुष्परिणाम होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्या डोळ्यांसमोर अंधारी येणे, डोळ्यांसमोर कोणते चित्र स्पष्ट न दिसणे, डोकेदुखी, उलटी, मळमळ, लिव्हर त्रास होणे यासारखे अनेक समस्या उद्भवत असतात म्हणून जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला स्वतःच्या स्वतःच्या इच्छेनुसार विटामिन इ ची कॅप्सूल कधीच खाऊ नका.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *