रात्री झोपतांना एक वेलची आणि कोमट पाणी पिल्याने शरीराला जे फायदे झालेत ते लाखो रुपयांची औषध पण करू शकत नाहीत असे जबरदस्त चमत्कारिक फायदे …!
मित्रांनो, विलायची, वेलदोडा, वेलची अशी नावे असलेला सुगंधी मसाला सर्वांच्याच घरात असतो. वेलची स्वादाने स्फूर्ती येते. वेलचीचा उपयोग लाडू, गुलाबजाम, बासुंदी तसेच जवळपास सर्व प्रकारच्या मिठाईत वापरला जातो. एवढेच काय चहा कॉफी मसाला दूध यात देखील वेलदोडा वापरला जातो. तसेच माऊथ फ्रेशनर म्हणून वेलचीचा उपयोग केला जातो. वेलचीमध्ये लोह व्हिटॅमिन सी जीवनसत्व ब गटातील एक महत्वाचा घटक आहे. लाल रक्त पेशी निर्मितीत एक महत्वाची भूमिका वेलची बजावते. वेलची खाण्याचे अनेक फायदे आहेत.
मित्रांनो अपचन, गॅसेस, मळमळ, उलटी, पोट साफ न होणे ,लठ्ठपणा, पित्ताचे आजार, संधिवात यांसारख्या अनेक समस्यांवर वेलची वापरली जाते. मित्रांनो पोट फुगणे, पोट साफ न होणे, बद्धकोष्ठता असे त्रास असतील तर दोन वेलदोडे, थोडीशी कोथंबीर, लवंग व आले एकत्र कुटून एक चमचा पेस्ट एक ग्लास कोमट पाण्यामध्ये टाका.हे मिश्रण रात्री झोपताना प्या. जेव्हा सकाळी उठाल तेव्हा तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल.
मित्रांनो तुमची सेक्स लाईफ एन्जॉय करायच असेल किंवा काही अंतर्गत समस्या असेल तर रात्री झोपण्याअगोदर एक ग्लास गरम दुधात तीन विलायची पावडर आणि एक चमचा मध टाकून प्या. एक महिना रोज रात्री असे दुध प्यायल्यास फायदा होईल.
मित्रांनो पोट साफ नसेल तर तोंडाचा वास दुर्गंध येतो तर यासाठी जेवणानंतर अर्ध्या तासाने एक वेलदोडा चावून चावून खा तोंडाचा वास जातो. शिवाय यातील अंतीबॅक्टरियल गुणधर्मामुळे पोटात व तोंडात कुठलाही संसर्ग होऊ देत नाही. मित्रांनो, सर्दी असेल, छातीत कफ झाला असेल तर उकळलेल्या पाण्यात दोन-तीन विलायची चोळून टाकावेत आणि दहा मिनिट वाफ घ्यावी. यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे दमा, सर्दी, खोकला यासाठी हा उपाय उपयुक्त आहे.
विलायची उष्ण गुणधर्मी आहे. त्यामुळे शरीर आतून गरम होऊन कफ, सर्दी बाहेर पडते. श्वसन व्यवस्थित होते. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांसाठी वेलची खूपच उपयोगी आहे. वेलची पावडर आणि हळद दुधात घालून घ्यावी. त्यात चवीसाठी तुम्ही गुळ किंवा खडीसाखर सुद्धा टाकू शकता.
वेलचीमुळे रक्तातील लाल पेशींचे प्रमाण वाढते. लाल रक्त पेशी शरीरातील सर्व प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी खूपच आवश्यक असतात. शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यात वेलची उपयुक्त आहे. विषारी घटक बाहेर पडतात. त्यामुळेच विविध प्रकारचे कॅन्सर होण्याचा धोका खूप कमी होतो. जर तुम्हाला थकवा अशक्यपणा येत असेल तर दुधात खडीसाखर विलायची पावडर टाकून पिल्याने शरीर सुदृढ व बलवान होते. कारण यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते.
पोटाची चरबी, लठ्ठपणा घालवण्यासाठी विलायची सर्वोत्तम आहे. यासाठी सकाळी उपाशीपोटी दोन विलायची एक ग्लास पाण्यात उकळून चहा सारखे घोट घोट करून प्यायलात तर वजन कमी होण्यास मदत होते. वेगळ्या प्रकारची चपळता तुमच्या येईल. मधुमेह होऊ नये असे वाटत असेल तर रोज एक वेलची खा.
कोणत्याही कारणाविना भीती वाटत असेल तुमच्या मनामध्ये घुसमट होत असेल, तर रोज दोन ते तीन विलायची खा. त्वचारोगांमध्ये सुद्धा विलायची अतिशय उपयुक्त आहे. त्वचेवर काळे डाग आले असतील तर वेलदोड्याची पेस्ट लावा. तर त्वचारोग बरा होतो लघवी मध्ये जळजळ होत असेल तर विलायची पाण्यात उकळून ते पाणी तुम्ही कोमट असताना प्यायल्यास त्वचेवरील इन्फेक्शन बरे होते.
बुद्धी तल्लख करण्यासाठी आणि उत्तम दृष्टीसाठी एका वेलचीचे दाणे, दोन ते तीन बदाम, दोन-तीन पिस्ता, दोन तीन चमचे दूध हे सर्व मिक्सर मध्ये घेऊन बारीक पेस्ट बनवा. यानंतर एक ग्लास दुधात टाकून उकळायला ठेवा दुधाचे प्रमाण अर्धे झाल्यावर यामध्ये खडी साखर घाला. याने बुद्धी तल्लख बनवते आणि स्मरणशक्ती वाढते.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.