आयुष्यात केसांना रंग द्यायची गरज पडणार नाही; फक्त करा हा उपाय एकही केस गळणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा व्यक्तींचे केस विशिष्ट वय झाल्यानंतर काळे होत असतात परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये लहान मुलांपासून ते तरुण वयामध्ये सुद्धा अकाली पांढरे केस होण्याची समस्या दिवसेंदिवस वाढलेली आहे, यामागे वेगवेगळी कारणे सुद्धा आहेत. बहुतेक जण सध्याच्या जीवनशैलीमध्ये आपले सौंदर्य टिकवण्यासाठी केसांना वेगवेगळे रासायनिक पदार्थ सुद्धा लावत असतात आणि कलर सुद्धा करत असतात, अशा वेळी केसांचा नैसर्गिक रंग आहे तो अनेकदा उडून जाण्याची शक्यता असते परंतु आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये असे काही घरगुती उपचार सांगण्यात आलेली आहेत.
या उपायांच्या माध्यमातून आपल्या केसांच्या ज्या काही समस्या आहेत त्या पूर्णपणे दूर होण्यासाठी मदत होणार आहे. आपल्यापैकी अनेकांना केस गळती, केसांमध्ये कोंडा निर्माण होणे, केस पांढरे होणे, केस विरळ होणे, केस नसल्यामुळे टक्कल पडणे यासारख्या वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात. या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आजच्या लेखामध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घ्यावेत याबद्दल..
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वनस्पतीचा उपयोग करायचा आहे. ही वनस्पती आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होऊन जाते. या वनस्पतीचे नाव आहे कडीपत्ता. आपल्याला हा उपाय करण्यासाठी कडीपत्ता चे पान वापरायचे आहे. कडीपत्तामध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असल्याने आपल्या केसांना चमक निर्माण करण्याचे कार्य या पानांद्वारे होत असते.
हा उपाय करण्यासाठी आपण कडीपत्त्याचे काही पाने आपण घेणार आहोत. ही पाने आपण सुकवून त्याची पावडर सुद्धा बनू शकतो किंवा जर तुमच्याकडे फ्रेश पान असेल तर तुम्ही त्याची पेस्ट सुद्धा बनवू शकता. या कडीपत्त्याची पेस्ट बनवतांना आपल्याला त्याचे प्रमाण सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे. जास्त प्रमाणामध्ये न बनवता मर्यादित स्वरूपामुळे आपल्याला ही पेस्ट बनवायची आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे मेहंदी. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही रंगाची मेहंदी घ्यायची नाही.
आपल्याला फक्त साधी मेहंदी घ्यायची आहे आणि एक चमचा ही मेहंदी आपल्याला पेस्टमध्ये टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला तिसरा घटक पदार्थ लागणार आहे तो म्हणजे दही. दही मध्ये अनेक असे काही औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील असंख्य समस्या पूर्णपणे दूर होऊन जातात व त्याचबरोबर आपल्या केसांच्या मुळ यांना मजबुती देण्याचे कार्य सुद्धा दही द्वारे केले जाते म्हणून हा उपाय करताना आपल्याला एक चमचा दही घ्यायची आहे त्यानंतर हे सगळे पदार्थ एकत्र मिक्स करून त्यामध्ये दोन ते तीन थेंब एरंडेल तेल टाकायचे आहे.
हे सगळे पदार्थ आता आपल्याला व्यवस्थित एकजीव केल्यानंतर आपल्या केसांना लावायचे आहे. केसांना लावल्यानंतर अर्धा ते एक तास आपल्याला तसेच ठेवायचे आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने केस धुवून टाकायचे आहे.
हा उपाय जर आपण पंधरा दिवस सातत्याने केला किंवा आठवड्यातून दोन वेळा जरी केला तरी तुमच्या केसांच्या मुळाशी जे काही पांढरे केस असतात ते पूर्णपणे काढून घेऊन जाण्यास मदत होणार आहे व त्याचबरोबर केसांच्या मुळांशी नवीन येणारे केस आहेत ते सुद्धा काळेच उगवणार आहेत म्हणून हा उपाय अतिशय साधा सोपा व घरगुती असल्याने या उपायाचे कोणते दुष्परिणाम नाही. आपल्या केसांचे आरोग्य जपण्यासाठी व केसातील कोंडा दूर करण्यासाठी, अकाली केस पांढरेपण आलेले आहे ते नष्ट करण्यासाठी हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.