कडधान्याला किड लागू नये यासाठी कधीही न ऐकलेल्या 2 सोप्या ट्रिक्सचा वापर जरूर करा.!

कडधान्याला किड लागू नये यासाठी कधीही न ऐकलेल्या 2 सोप्या ट्रिक्सचा वापर जरूर करा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या जीवनामध्ये प्रत्येक जण व्यस्त झालेले आहे आणि म्हणून अशा वेळी बाजारात वारंवार जाण्यापेक्षा आपल्यापैकी अनेक जण महिन्याभराचा सामान, किराणामाल घरामध्ये भरून ठेवतात परंतु जास्त प्रमाणामध्ये किराणामाल घरांमध्ये भरून ठेवल्याने आणि जास्त वापर न झाल्यामुळे सुद्धा अनेकदा धान्यांमध्ये कीड झालेली आपल्याला पाहायला मिळते.

अशा वेळी आपण चिंता व्यक्त करत असतो आणि वेगवेगळे उपाय करत असतो परंतु त्याचा काही फारसा परिणाम होत नाही. अनेकदा आपण रासायनिक पदार्थांचा वापर करत असतो परंतु हे कडधान्य आपण सेवन करत असल्याने त्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो म्हणूनच तुमची चिंता दूर करण्यासाठी आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय आणि अशा काही सोप्या सोप्या ट्रिक्स घेऊन आलेलो आहोत, ज्यामुळे तुमचे धान्य वर्षानुवर्षे तुमच्या घरामध्ये सुरक्षित राहील. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

आपण जे धान्य घरामध्ये भरत असतो ते धान्य जास्तीत जास्त काळ कसे टिकवावे याचा विचार करत असतो. सर्वसाधारणप्रमाणे तूर डाळ,मूग डाळ व जे काही डाळीचे पदार्थ असा त्यांना लवकरच बुरशी व कीड लागण्याची शक्यता असते आणि म्हणूनच अशा वेळी हे पदार्थ जर आपण प्लास्टिकच्या बॉटल मध्ये व्यवस्थित रित्या भरले तर यातील धान्य वर्षानुवर्षे टिकते कारण की प्लास्टिकच्या बॉटल मध्ये कोणत्याही प्रकारची आद्रता नसते आणि जर धान्यांना आद्रता मिळाली नाही तर ते धान्य सुरक्षित राहते.

बहुतेक वेळा आपण किरणाचा माल भरलेला असतो. वातावरणातील बदलानुसार सुद्धा धान्यावर परिणाम होत असतो. या प्लास्टिकच्या बॉटल म्हणजे आपण आपल्या घरामध्ये ज्या पाण्याच्या बॉटल आणत असतो पाणी वापरल्यानंतर पायल्यानंतर फेकून देत असतो परंतु धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपण या बाटलीचा वापर करू शकतो.

त्यानंतर दुसरा उपयोग म्हणजे जेव्हा आपण धान्य डब्यामध्ये भरतो तेव्हा अशावेळी कागदाचे बारीक बारीक तुकडे करून त्याच्यामध्ये ठेवा कारण की बहुतेक वेळा वातावरणातील बदलांमुळे आद्रता बदलत असते आणि त्याचा थेट परिणाम कडधान्यावर होत असतो.

जर धान्यांमध्ये ओलावा निर्माण झाला तर हा ओलावा शोषून घेण्याचे कार्य कागदाचे तुकडे करत असतात आणि म्हणूनच प्लास्टिकच्या डब्या मध्ये जेव्हा आपण धान्य ठेवू अशा वेळी काही कागदाचे तुकडे सुद्धा आपल्याला ठेवायचे आहे जेणेकरून धान्यात ओलावा निर्माण झाला तर तो ओलावा शोषून घेतला जाईल यामुळे आपले धान्य सुरक्षित राहील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *