फक्त 10 मिनिट केळी सोबत लावा हा पदार्थ; चेहऱ्याच्या सर्व प्रकारच्या समस्या होतील कायमच्या दूर.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फक्त हा उपाय करा आणि घरच्या घरी चेहरा अगदी गोरा बनवा. प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे अशी मनामध्ये इच्छा असते आणि चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक जण वेगवेगळे उत्पादनसुद्धा वापरत असतो. काही घरगुती उपाय करत असतो तर काही रासायनिक पप्रॉडक्ट सुद्धा चेहऱ्याला वापरत असतो परंतु अनेक वेळा रासायनिक क्रीम वापरल्याने आपल्या चेहऱ्यावर तेज येण्या ऐवजी आपली त्वचा काळी बनू लागते.
त्वचेवर वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ लागतात आणि या सर्वांमुळे आपला चेहरा कुरूप बनू लागतो. आपल्यापैकी अनेकांना चेहऱ्यावर काळे डाग व पिंपल्स येण्याची समस्या असते. ही समस्या सध्याच्या काळामध्ये प्रत्येक तरुणाला सतावत आहे आणि यासाठी आपण एक उपाय करणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जे पदार्थ लागणार आहेत, ते पदार्थ आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतात आणि त्याचा उपयोग सुद्धा अगदी सोपा आहे. चला तर मग जाणून घेऊया उपाय कशा पद्धतीने बनवायचा आहे त्याबद्दल..
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पिकलेली केळी घ्यायची आहे.केळी आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगले मानले जाते त्याचबरोबर आपली त्वचा चमकण्यासाठी सुद्धा एक नैसर्गिक घटक म्हणून पाहिले जाते. केळीमध्ये व्हिटॅमिन बी 6 व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते आणि यामुळे आपली त्वचा चमकण्यासाठी सुद्धा मदत होते. केळांमध्ये सिलिका नावाचे घटक उपलब्ध असते यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या व काळे डाग पूर्णपणे दूर होऊन जाते.
त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी दुसरा पदार्थ वापरायचा आहे, तो म्हणजे ग्लिसरिन. ग्लिसरीन वापरल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर चमक येऊ लागते त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर ज्या काही मृत पेशी असतात त्या मृतपेशी जिवंत करण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरते व चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी आपल्याला लाभदायक ठरतात दोन ते तीन थेंब हे आपल्या लागणार आहे.
आपल्याला केळीचे बारीक बारीक तुकडे करून त्याचे काप करायचे आहे आणि त्यानंतर ग्लिसरीन चे दोन ते तीन थेंब टाकायचे आहे. हे सर्व मिश्रण एकत्र करून आपल्याला चांगली पेस्ट तयार करायची आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर लावता येईल. जर तुम्हाला ॲलर्जी असेल तर तुम्ही फक्त केळ्याचे काप याची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावू शकता आणि हा उपाय जर आपण दहा दिवस सातत्याने केला तर तुमचा चेहरा अगदी उजळून जाईल.
चेहऱ्यावरचे काळे डाग निर्माण झालेले आहे ते निघून जातील. चेहऱ्यावरचे पिंपल्स सुद्धा भविष्यात लवकर येणार नाही, अशा प्रकारे अगदी साधा सोपा व घरगुती उपाय करून आपल्या चेहऱ्यावर तेज अवश्य आणा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.