आजच तुळशी जवळ ठेवा या तीन वस्तू ; घरामध्ये सर्व मार्गांनी येऊ लागेल पैसा, घरामध्ये लक्ष्मी मातेच होईल आगमन …..!!

आजच तुळशी जवळ ठेवा या तीन वस्तू ; घरामध्ये सर्व मार्गांनी येऊ लागेल पैसा, घरामध्ये लक्ष्मी मातेच होईल आगमन …..!!

मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरी तुळशी वृंदावन हे असतेच. तुळशीला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. तुळशीला खूपच शुभ मानले जाते. अनेक आयुर्वेदिक उपायांमध्ये देखील तुळशीचा वापर केला जातो. अनेकजण तुळशीची पाने खातात कारण तुळस ही अनेक रोगांपासून मुक्तता देते. सुटका करून देते. आपल्या घरामध्ये प्रवेश करणाऱ्या नकारात्मक गोष्टींना बाहेर काढण्याचे काम तुळस ही करत असते. तुळशीला विष्णू प्रिय मांनले जाते. अशी ही विष्णुप्रिय तुळस आपणाला विविध उपयोगी आहे. मित्रांनो तुळशी वृंदावन ज्यांच्या घरी आहे त्यांच्या घरी कायम आनंद, शांतता आणि समृद्धी नांदत असते.

तर मित्रांनो तुळशीपाशी अशा काही गोष्टी, वस्तू ठेवल्याने त्या तुळशीचा प्रभाव अधिक जास्त आपल्या कुटुंबावर होऊ शकतो. त्याचे अनेक लाभ फायदे आपल्याला होतात. तर मित्रांनो अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या तुळशीजवळ आपनाला ठेवायच्या आहेत याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. पहिली वस्तू आहे ते म्हणजे स्वस्तिक. आपले हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक ला खूपच शुभ मानले जाते. अनेक देवी देवता स्वस्तिक मुळे आकर्षित होतात.

मित्रांनो आपल्या अंगणातील तुळस वाळली किंवा सूकली तर त्या वेळेस तुम्ही समजुन जा की, आपल्या घरांमध्ये नकारात्मक शक्तींचा वास झालेला आहे आणि हा या नकारात्मक शक्तींचा जेव्हा प्रभाव जास्त होतो त्या वेळेस आपल्या अंगणातील तुळस ही वाळते किंवा सुखत असते किंवा आपल्या घराला वाईट शक्तींची नजर लागली असेल तरीदेखील आपल्या अंगणातील तुळशी सुखते.

तर मित्रांनो हे जे स्वस्तिक आहे या स्वस्तिका मध्ये सकारात्मक गोष्टींना खेचून आणण्याची ताकद असते. त्यामुळे मित्रांनो हे स्वस्तिक तुम्हाला तुळशीजवळ ठेवायचे आहे किंवा तुळशीचे वृंदावन आहे त्यावर तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढला तरीही चालते. मित्रांनो आपल्या घरावर वाईट नजर लागलेली आणि नकारात्मक गोष्टी आहेत हे सर्व दूर करण्यासाठी स्वस्तिक खूपच महत्त्वाचे आहे. तर हे स्वस्तिक चे चित्र रेखाटत असतात त्या वेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा विष्णू प्रिय मंत्र म्हणायचा आहे.

तसेच मित्रांनो काही स्त्रियांना खूप दिवसांपासून मुल होत नाही त्यांना संतान प्राप्ती व्हावी असे वाटत असते किंवा गर्भवती महिला आहे त्यांना आपले मूल हे तेजस्वी, चांगले व्हावे असे वाटत असेल तर अशा वेळी महिलांनी तुळशीजवळ बसून भगवत गीतेचे पाठ करावे. आणि मनोभावे तुळशीला आपली इच्छा बोलून दाखवावे. संतान प्राप्ति ची तसेच आपले बाळ तेजस्वी व्हावे अशी प्रार्थना करायची आहे. तुळशी माता ही इच्छा पूर्ण करते.

मित्रांनो अनेक वेळा अनेक जण असे म्हणतात की, आम्ही तुळशीचे रोप लावतो परंतु ते जगत नाही. तर मित्रांनो तुम्ही जेव्हा तुळशीचे रोप आणता त्यावेळेस तुम्ही ते रोप आणल्यानंतर त्या तुळशीला मनोभावे प्रार्थना करायची आहे की हे तुळशी माते मी तुम्हाला आमच्या घरी आमंत्रित करतो आणि तुम्ही आमच्या घरामध्ये स्थापित व्हावे आणि मनोभावे प्रार्थना करून झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केल्या नंतरच तुम्हाला तुळशी वृंदावनमध्ये तुळशीचे रोपटे लावायचे आहे. मित्रांनो आपल्याला तुळशीचा प्रभाव अधिक करण्यासाठी दुसरी जी वस्तू ठेवायचे आहे ती म्हणजे शालीग्राम.

शालिग्राम म्हणजे एक काळा दगड असतो. शालिग्राम म्हणजे माता तुळशीचे ते पती असतात. त्यामुळे मित्रांनो शालिग्राम हे तुळशीपाशी ठेवणे अवश्य आहे. मित्रांनो तुळशी विवाहाच्या दिवशी तुम्ही हे शालिग्राम अवश्य तुळशीपाशी ठेवावे आणि विवाह संपन्न करावा. परंतु मित्रांनो विवाह झालेल्या तुळशीपाशी तुम्ही हा शालीग्राम म्हणजे काळा दगड ठेवू शकता. विवाह न झालेल्या तुळशीपाशी तुम्ही हा शालीग्राम ठेवायचा नाही. हा शालिग्राम तुम्ही जेव्हा तुळशीपाशी ठेवाल त्यावेळेस त्यांच्या घरांमध्ये आनंद, शांतता तसेच सुख-समृद्धी नांदायला सुरुवात होईल.

मित्रांनो अनेक लोकांना रात्रीची झोप व्यवस्थित लागत नाहीये, त्यांना वाईट स्वप्ने पडत असतात अशा लोकांनी तुळशीची पाच पाने दिवसभरात कधीही तोडायचे आहे. ती स्वच्छ करायचे आहेत आणि संध्याकाळी ग्लासमध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये तुळशीची 5 पाने टाकायची आहेत. हा ग्लास संध्याकाळी आपल्या उशाशी ठेवायचा आहे आणि त्या ग्लास वर एखादी प्लेट झाकून ठेवायचे आहेत. सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर हे ग्लास भरलेले पाणी प्यायचे आहे. त्यामुळे आपल्याला वाईट स्वप्ने पडणे तसेच झोप न लागणे या समस्या दूर होणार आहेत.

मित्रांनो, तुळशीचा प्रभाव अधिक करण्यासाठी आपल्याला तुळशीपाशी तिसरी वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे मित्रांनो सकाळच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला एक तुपाचा दिवा आपल्या तुळशीपाशी प्रज्वलित करायचा आहे. हे तूप शुद्ध देशी गायीचे असेल तर खूपच उत्तम आहे. किंवा इतर कोणत्याही गाईचे तूप घेतले तरीही चालेल. परंतु तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करीत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करण्यास अजिबात विसरू नका. मित्रांनो तुपाचा दिवा प्रज्वलित केल्याने अनेक देवी-देवता आमंत्रित होतात. तसेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होते व आपल्याला पैशाची कमतरता कधीच भासत नाही.

तर मित्रांनो अशा प्रकारच्या या तीन वस्तू जर तुम्ही तुळशीजवळ ठेवल्या तर तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. प्रत्येक कामात अपयश येत असेल तर या तीन वस्तू तुळशी जवळ ठेवल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळत जाईल. पैसा अजिबात कमी पडणार नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्तोत्रांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे.याचा कुणीही अंधध्देशी संबंध जोडू नये, ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Team Viral Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *