अशाप्रकारे करा टोमॅटोचा वापर करा त्वरित वजन कमी; डोळ्यांची नजर वाढून शुगर देखील होईल कमी.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जागतिक कीर्ती व प्रसिद्ध असणारा सर्वात महत्त्वाचं म्हणजे टोमॅटो त्यालाच आपण टमाटर असेच म्हणतो.टोमॅटो हे फळ खूपच आल्हाददायक तसेच चवीसाठी वापरले जाणारे महत्त्वाचे फळ आहे. टोमॅटोमुळे केसांचा पीएच लेवल असतो तो संतुलित राहतो शिवाय त्वचेचा पोत सुद्धा चांगला राहतो.
त्याचप्रमाणे टोमॅटो चा उपयोग चेहऱ्यावरील पिंपल्स, काळे डाग दूर करण्यासाठी टोमॅटो चा रसाचा वापर केला जातो. टोमॅटोमध्ये लोह ,कॅल्शियम मॅग्नेशियम , जीवनसत्व ब , जीवनसत्व क इत्यादी घटक मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतात.आयुर्वेदिक शास्त्रामध्ये टोमॅटोला अनन्य महत्त्व आहे.टोमॅटोमध्ये अग्नि रस पाचक तंत्रास उपयुक्त असे महत्त्वाची भूमिका करणारे फळ मानले गेलेले आहेत.
टोमॅटो मध्ये कमी उष्मांक असल्यामुळे डायबिटीस पेशंटसाठी सुद्धा या फळाचा मोठ्या प्रमाणामध्ये उपाय केला जातो तसेच आपण टोमॅटोचा वापर सुप बनवण्यासाठी, अन्नपदार्थांमध्ये चव आणण्यासाठी, फोडणी करण्यासाठी ,सलाड बनवण्यासाठी तसेच जाम बनवण्यासाठी सुद्धा वापरतात. म्हणूनच आज आपण ह्या लेखांमध्ये टोमॅटो बद्दल काही औषधी गुणधर्म सुद्धा जाणून घेणार आहोत. या औषधी गुणधर्मामुळे मोठे मोठे आजार सुद्धा क्षणांमध्ये दूर करण्यास मदत होत राहते. चला तर मग जाणून घेऊया या बद्दल..
ज्या व्यक्तींना आपले वजन कमी करायचे आहे अशा व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये टोमॅटो चा उपयोग प्रामुख्याने करावा कारण की टोमॅटोमुळे वजन वाढत नाही त्याचबरोबर पोट भरण्याची भावना सुद्धा यामुळे निर्माण होते त्याचबरोबर कमी कार्बोदके, कमी कॅलरीज असल्यामुळे उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना ,मधुमेह असणाऱ्या रुग्णांना तसेच कोलेस्ट्रॉल चा प्रॉब्लेम असणाऱ्या रुग्णांसाठी टोमॅटो ही रामबाण उपाय ठरते.
तसेच टोमॅटोमध्ये मोठ्याप्रमाणावर जीवनसत्व अ उपलब्ध असल्यामुळे रातांधळेपणा, डोळ्याची दृष्टी तसेच नजरे संबंधित त्या आजारांवर उपचार म्हणून टोमॅटो गुणकारी ठरत असतो. जर तुम्ही टोमॅटोच्या पानांचा रस एक ग्लासभर पाण्यामध्ये कूच करून दिवसभरातून दोन वेळा प्यायलात तर तुम्हाला दृष्टीचा कोणताही त्रास असेल तर तो नष्ट होतो.
तुमच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल तर दिवसभरातून दोन टोमॅटो नक्की खा ,असे केल्याने तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी भरून निघेल कारण टोमॅटोमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण खूप असते शिवाय यकृताच्या विकारांमध्ये सुद्धा टोमॅटोचा रस उपयोगी पडतो. ज्या व्यक्तींना बद्धकोष्ठतेचा व पोटासंबंधी समस्येचा त्रास असतो अशा व्यक्तींना टोमॅटो मधील सायट्रिक ऍसिड मुळे लहान आतडे तसेच मोठे आतडे यांचे कार्य योग्य प्रमाणावर कार्य करण्याची शक्ती टोमॅटोमुळे प्राप्त होते.
शरीरात घट्ट साचलेला मळ असतो तो पुढे करण्यासाठी मदत होत राहतो शिवाय लहान मुलांसाठी टोमॅटो चा रस गुणकारी ठरतो. जर मुलांचे आरोग्य चांगले सदृढ व निरोगी ठेवायचे असल्यास दिवसभरातून दोनदा टोमॅटोचा रस लहान मुलांना आवश्य द्या ,असे केल्याने त्यांचे आरोग्य चांगले राहते.
हृदयाशी संबंधित समस्या असणाऱ्या लोकांसाठी व त्यामध्ये अर्जुन सालीच्या दोन पाने तसेच साखर मिक्स करून जर घेतल्यास हृदया संबंधित ज्या काही समस्या असतात त्या लवकर दूर होतात शिवाय ज्या व्यक्तींना झोप लागत नाही, इंसोमेनिया चा त्रास आहे अशा व्यक्तींनी जर दिवसभरातून दोन वेळा टोमॅटोचा रस किंवा झोपायच्या आधी टोमॅटो खाल्ल्या तर त्यांना झोप व्यवस्थित लागते व निद्रानाशाची समस्या सुद्धा लवकरच नष्ट होते त्याचबरोबर टोमॅटोमध्ये जीवनसत्व के आणि कॅल्शिअम खूप मोठ्या प्रमाणावर असते म्हणून तुम्हाला जर हाडं संबंधित काही समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी नक्कीच मदत करतो.
म्हणून टोमॅटो हे अत्यंत लाभदायक असणार फळ आहे. टोमॅटो फळ फक्त चार आजार असणाऱ्या व्यक्तींनी टाळले पाहिजे ते म्हणजे ज्या व्यक्तींना मुतखड्याचा त्रास आहे अशा व्यक्तीने टमाटर अजिबात खाऊ नये कारण ती टोमॅटोच्या सालीमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते ते मुतखडा वाढीस कारण ठरू शकते शिवाय संधिवात ,आमवात आमलवात असणाऱ्या व्यक्तीने सुद्धा टोमॅटो खाऊ नये यामुळे हा त्रास वाढायला मदत होतो. शिवाय टोमॅटोमुळे पोटात गॅस सुद्धा होत असतो म्हणून अशा व्यक्तींनी टोमॅटोचा वापर जरा जपूनच करावा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.