कोणत्या पायात काळा दोरा बांधल्यावर होऊ शकता धनवान आणि भाग्यवान..?

कोणत्या पायात काळा दोरा बांधल्यावर होऊ शकता धनवान आणि भाग्यवान..?

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपण पाहिलं असेल कि अनेकजण त्यांच्या पायामधे काळा धागा बांधतात. यापाठी कोणतं कारण असावं..? अनेकजण फॅशन म्हणून काळा धागा आपल्या पायात बांधतात, तर काही जण धार्मिक प्रवृत्तीने हा धागा पायात बांधतात. मित्रांनो अशा प्रकारे काळा धागा बांधण्याचे कोणकोणते फायदे असतात, तसेच आपण हा धागा कोणत्या पायात बांधावा, या सर्व गोष्टीमागे काही वैज्ञानिक आहे का..? याच सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर आपलं शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे, ज्यांना आपण पंचतत्त्व असेही म्हणतो. अग्नी,जल,वायू, पृथ्वी आणि आकाश या पंचतत्वांपासून आपलं शरीर बनलेलं आहे. आपल्या शरीराला ऊर्जा पुरवण्याचं काम हि ५ पंचमहाभूत करत असतात. मात्र ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्याला नजर लावते त्यावेळी या पंचमहाभूतांपासून मिळणाऱ्या ऊर्जेमध्ये अडथळे येतात.

आणि मग आपलं शरीर व्यवस्थित कार्य करत नाही. आपण आजारी पडतो, आपलं होणार काम अडवलं जात, यशप्राप्ती होत नाही. आपण खूप मेहनत करतो पण त्यामध्ये यश मिळत नाही. ,घरामध्ये पैशांची तंगी निर्माण होते. आणि म्हणूनच मित्रांनो हा काळा धागा आपल्याला अत्यंत महत्वाची मदत करतो.

मित्रांनो तुम्ही जर गळ्यामध्ये काळा धागा बांधला तर त्यामुळे नजर लागण्यापासून तुमचं संरक्षण होऊ शकत. या गळ्यातील धाग्यामध्ये तुम्ही एखाद लॉकेट सुद्धा लावू शकता. मित्रांनो अगदी प्राचीन काळापासून काळ्या रंगाचा उपयोग हा दृष्ट लागण्यापासून वाचवण्यासाठी करण्यात आलेला आहे.

आणि म्हणूनच आपण पाहिलं असेल कि छोट्या मुलांना कपाळावर किंवा गालावर काळा टीका लावला जातो. आणि हाच टीका लहान मुलांचं वाईट नजरेपासून संरक्षण करतो. लहान मुलांना लगेच नजर लागते म्हणून अशा मुलांना काळा टिळा लावणं खूप महत्वाचं असतं.

मित्रांनो जर तुम्हाला वारंवार पोटदुखीचा त्रास असेल तर तुम्ही दोन्ही पायांच्या अंगठ्याना काळा धागा बांधला तर यामुळे तुमचा पोटदुखीचा त्रास सुद्धा यामुळे बंद होऊ शकतो. स्त्रियांनी त्यांच्या डाव्या पायावर हा काळा धागा नक्की बांधावा. असं केल्याने त्यांचं नजर लागण्यापासून संरक्षण होतच मात्र त्याचबरोबरीने अनेक फायदे होतात.

मित्रांनो जर तुम्ही दिवसभर उभं राहून काम करत असाल तर तुमचे पाय नक्कीच दुखत असतील. जर तुम्हाला या पायदुखीपासून सुटका हवी असेल तर महिलांनी किंवा मुलींनी त्यांच्या डाव्या पायात आणि पुरुषांनी उजव्या पायात काळा धागा बांधणं हे अत्यंत शुभ मानलं जात.

मित्रांनो ज्योतिशास्त्र असं मानत कि मंगळवारचा दिवस हा आपल्या पायामधे काळा धागा बांधण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. याच कारण असं आहे कि मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. धनाची देवता कुबेर आणि माता लक्ष्मीचा जर आपल्याला आशीर्वाद मिळाला तर आपल्या जीवनामध्ये धनाची कमतरता कधीही राहत नाही. आणि म्हणून मंगळवारच्या दिवशी काळा धागा आपल्या पायात बांधावा.

तसेच मित्रांनो याचा अजून एक फायदा असा कि ज्यांना शनीची साडेसाती आहे, किंवा ज्यांना वारंवार शनिदोष निर्माण होतात, कुंडली मध्ये शनिदोष आहे अशा लोकांसाठी सुद्धा काळा धागा अत्यंत महत्वाचं काम करतो. प्रत्येक शनिदोषापासून वाचवण्याचं काम हा काळा धागा करत असतो.

मित्रांनो अशाप्रकारे नजर लागण्यापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी प्रत्येकाने आपल्या पायामधे किंवा गळ्यामध्ये काळा धागा अवश्य बांधावा, आम्हाला आशा आहे कि हि माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असणार. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *