होळीच्या पवित्र आग्नीमध्ये गपचूप टाका ही वस्तू; इतका पैसा येईल की मोजताही येणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हिंदू धर्मशास्त्राचा पंचांगानुसार होळी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. दोन दिवस साजरा केला जाणारा होळी या सणामध्ये पहिल्या दिवशी होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन म्हणजेच रंगपंचमी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. होळीच्या दिवशी भगवान विष्णू यांनी नरसिंह देवाचा अवतार घेतला होता म्हणूनच या दिवशी नरसिंह देवाची पूजा केली जाते.
होळीची रात्र विशेष मानली जाते कारण याच दिवशी पौर्णिमा सुद्धा असते. वर्षातील काही विशेष दिवस असतात तिथे असतात त्यातील एक महत्त्वाचा तिथी म्हणजेच होळीची पौर्णिमा होय. या पौर्णिमाच्या रात्री होलिका दहन केले जाते. या होलिका दहन यामध्ये आपल्या जीवनातील काही अडचणी संकटे सर्व दहन होऊन आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान मिळावे याकरिता अनेक उपाय केले जातात.
त्याच बरोबर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या असेल, पैसा टिकत नसेल तर ही समस्या दूर करण्यासाठी व माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी विशेष असे काही उपाय केले जातात. माता महालक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी आपण या दिवशी छोटे-छोटे काही उपाय करू शकतो आणि माता महालक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करेल.
असे म्हटले जाते की माता महालक्ष्मी चंचल स्वभावाचे आहे याचा अर्थ असा की ती एका जागी कधीच थांबत नाही.जर तुम्हाला असे वाटत असेल की माता महालक्ष्मी आपल्या घरांमध्ये थांबत नाही आहे व आपल्याला माता महालक्ष्मी ला आपल्या घरात थांबायचे आहे तर या विशेष दिवशी आपल्याला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे. होळीच्या दिवशी होळी प्रज्वलित केल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो त्याच बरोबर होळीला जल अर्पण करून प्रदक्षिणा सुद्धा घातल्या जातात.
तुम्ही तुमच्या इच्छेनुसार होळीला पाच ,सात, अकरा प्रदक्षिणा घालू शकता आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला विशेष असा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन लवंग, दोन विड्याची पाने , देशी गायीचे तूप घ्यायचे आहे. आपल्या दोन्ही लवंग देशी गायीच्या तुपामध्ये बुडवून विड्याच्या पानामध्ये ठेवायचे आहेत. होळी प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला विड्याचे पान होळीला अर्पण करायचे आहे.
त्यानंतर मनोभावे हात जोडून आपल्याला देवाला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहे त्या संपूर्ण व्यक्त करायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला घरामध्ये सुख शांती हवी असेल तर एक नारळ तुम्ही होळीमध्ये अर्पण करू शकता. असे केल्याने आपल्या घरातील व्यक्तींमध्ये प्रेम वाढते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नांदू लागते. जर तुम्हाला नोकरी संदर्भात काही समस्या असेल तर आपल्याला काळ्या कपड्यांमध्ये काळे तीळ घेऊन ते होळीमध्ये अर्पण करायचे आहे परंतु हा उपाय आपल्याला गुप्त पद्धतीने करायचा आहे.
हा उपाय करताना कोणी तुम्हाला पाहिला नको हवे. जर तुम्हाला नोकरी मध्ये प्रमोशन हवे असेल उद्योग-धंद्यात यश हवे असेल खूप मेहनत करून सुद्धा यश प्राप्त होत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा, हा उपाय केल्यामुळे तुम्हाला यश सफलता मिळेल. जर तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये या सगळ्या समस्या असतील तर होळीच्या या पवित्र दिवशी पवित्र तिथीला हे उपाय जरूर करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.