मोतिबिंदू जाऊन हे ८ आजार फुकट बरे करते हि वनस्पती… जाणून घ्या या औषधी वनस्पती बद्दल..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो जांभूळ खाणे अगदी प्रत्येकालाच आवडते आणि त्याचे औषधी गुणधर्म बघितले तर ते नक्कीच खाल्ले पाहिजेत. परंतु हे बहुउपयोगी असलेले जांभूळ सिजनिय फळ असल्यामुळे ते फक्त वर्षातून एकदाच उपलब्ध होते. परंतु तुम्हाला माहिती आहे का जांभळाचे संपूर्ण झाडंच औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे.
होय.. जांभळाच्या पानांचे, मुळांचे, सालीचे औषधी उपयोग तुम्ही जाणून घेतले तर तुम्हीही थक्क व्हाल. अशी हि औषधी गुणधर्म असलेली वनस्पती संपूर्ण भारतात उपलब्ध आहे. चला तर जाणून घेऊया या जांभळाच्या झाडाचे काही औषधी उपयोग.
मित्रांनो शरीरातील उष्णता वाढून अनेकांना तोंडाला फोड येतात ज्याला आपण तोंड येणे असेही म्हणतो. अशावेळी जांभळाच्या पानांचा काढा बनवून हे पाणी थंड झाल्यावर या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडाचे फोड नाहीसे होतात. हा उपाय दिवसातून ३ वेळा करावा.
अनेकवेळा अतिथंड किंवा अति गरम पदार्थ खाल्ल्याने किंवा वायरल इन्फेक्शन मुळे घसा बसतो. अशावेळी या जांभळाच्या झाडाची ताजी साल काढून त्याचा काढा बनवावा व त्या कोमट काढ्याने रात्री गुळण्या केल्याने अगदी दुसऱ्यादिवशीच आराम मिळतो. तसेच कोणत्याही कारणाने झालेली जखम धुण्यासाठी या जांभळाचे पाणी उकळवून थंड केलेले पाणी वापरले तर त्यामुळे जखम लवकर भरण्यास मदत होते.
जांभळाच्या सीजन मध्ये जांभळे गोळा करून ती स्वच्छ धुवून एका भांड्यात ठेवावी. त्यामध्ये थोडे मीठ घालून जांभळे बुडतील एवढे पाणी टाकावे. हे २-३ दिवस असेच ठेऊन त्याचा रस काढावा आणि तो एक दिवसभर उन्हात ठेवावा. मित्रांनो हा रस मधुमेहासाठी तसेच पोटाच्या सर्व समस्येसाठी अत्यंत उपयुक्त आहे. मंदावलेली पचनक्रिया, अपचन यांसारखे सर्व विकार याच्या २ चमचा सकाळ आणि संध्याकाळच्या सेवनाने नष्ट होतात.
दातांच्या समस्यांसाठी या जांभळाच्या वाळवलेल्या सालीचे राख बनवावी व त्यामध्ये थोडे सैंधव मीठ टाकून या पावडरने दात घासल्याने हिरड्यांची सूज तसेच हिडयातून रक्त येणे, दात दुखणे, दातांची कीड, तोंडाचा वास येणे या सर्व समस्या नष्ट होतात.
मित्रांनो जर तुमचे डोळे जळजळ करत असतील, डोळ्यातून सतत पाणी येत असेल तर या पानाची कोवळी पाने बारीक ठेचून त्याचा गोलाकार असा लगदा बनवावा व तो डोळ्यांवर पाच मिनिटे ठेवल्याने सर्व समस्या नष्ट होतात, जांभळाच्या बियांची पावडर आणि आवळा पावडर सम प्रमाणात घेऊन ती मिक्स करावी आणि हि पावडर २ ग्राम या प्रमाणामध्ये घेऊन एक चमचा मध घालून त्याचे सेवन करावे. यामुळे मोतीबिंदू नाहीसा होण्यासही मदत होईल.
मुळव्याधाचे दुखणे सुरु झाल्यास या जांभळाच्या कोवळ्या पानांचा काढा सकाळ-संध्याकाळ सेवन केल्याने मूळव्याध देखील बरी होते. जुलाब होत असतील तर या जांभळाची पाने व साल यांचा काढा बनवून पिल्याने जुलाब थांबते. मित्रांनो जो व्यक्ती एकदा येणाऱ्या या जांभळाचे सेवन सलग १५ दिवस करतो त्याला मुतखडा होण्याचा धोका अगदी शून्य होतो.
तर मित्रांनो हे होते जांभळाचे काही औषधी उपयोग. हि माहिती आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करायला विसरू नका.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.