रोगप्रतिकारक शक्ती झटपट वाढवणारे पदार्थ; डेंग्यू या सारखे आजार होतील लवकर दूर.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याचे वातावरण अतिशय बिघडलेले आहे.या वातावरणामुळे अनेक आजार सुद्धा आपल्याला होत आहेत त्यामध्ये सांध्यामध्ये तीव्र वेदना, वारंवार चक्कर यायला लागणे, वारंवार पोट दुखत असते, आपला ब्लडप्रेशर कमी जास्त होत असतो यासारखे असंख्य समस्या उद्भवत असतात. तापामध्ये शरीराची प्लेटलेट्सची संख्या वेगाने खाली येते यामुळे अनेकदा माणसाचा मृत्यू सुद्धा होतो.
रुग्णाला या गंभीर समस्या पासून मुक्त करण्यासाठी बऱ्याच उपाययोजना केल्या जातात तर काही घरगुती पदार्थ आहेत,फळ आहेत की ज्यांच्या मुळे रुग्णाची प्लेटलेट्सची संख्या काही तासांमध्ये वाढू शकते. एखाद्याच्या शरीरात दीड लाख ते चार लाख प्लेटलेट्स उपलब्ध असतात त्यांची संख्या पन्नास हजाराच्या खाली जाताच रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे आपल्याला या पदार्थांची तसेच या फळांची माहिती असणे फार गरजेचे आहे.
सगळ्यात महत्वाचे आहे ते म्हणजे पपईच्या पानांचा रस.पपईच्या पानांचा रस प्लेटलेट्स वाढविण्याकरता एक रामबाण उपाय आहे त्याचबरोबर एक उत्तम औषध आहे .जर रोज 10 ते 20 मिली पपईचा रस सेवन करणे अत्यंत गरजेचे आहे त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे गुळवेलच्या पानांचा रस. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये गुळवेल अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. गुळवेलच्या अंगी असे काही औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील जे विषाणू असतात ते बाहेर निघण्यासाठी मदत होत असते. त्यासाठी थोडे आले आणि थोडे कोथिंबीर टाकून योग्य पद्धतीने त्यांचा काढा बनवा.
हा काढा कोमट झाला की रोज एक ग्लास सेवन करा त्यानंतर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले रस म्हणजे गव्हांकुर. गव्हांकुर पासून बनविलेला रस कसा करावा हे अनेकांना माहिती नसते. सात दिवस प्रत्येक दिवशी एक सात वाटीमध्ये अगर ट्रे मध्ये सुमारे पन्नास ग्राम गहू पेरणे रोज आठ दिवसाने गव्हांकुराचे शेंडे आणि मूळ काढून त्याचा पाट्यावर रस काढावा त्यामध्ये दोन चमचे मीठ टाकून सेवन करा त्यानंतर महत्वाचा पदार्थ म्हणजे बीट.
बीट हे आपल्या शरीरासाठी भरपूर प्रमाणात महत्त्वाची भूमिका बजावत असते. बीटांमध्ये हिमोग्लोबिन भरपूर प्रमाणात असते आणि यामुळे आपल्या शरीरातील रक्तप्रवाह वाढतो रक्तातील प्लेटलेट्स संख्या वाढण्यासाठी बीट आपल्याला मदत करत असतो ,त्या नंतरचा पदार्थ आहे म्हणजे भोपळा किंवा आपण दुधी सुद्धा म्हणू शकतो. दुधीच्या नियमित सेवनाने आपल्या शरीरातील रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते. किवी फळ आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाचे मानले गेलेले आहे.
दिवसभरातून दोन वेळा आपण किवी फळ खाल्ले तर आपल्या शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते त्याचबरोबर शरीरामध्ये वाईट घाण, कोलेस्ट्रॉल जमा झाले असेलच तर ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा मदत करत असते. त्यानंतरचे फळ आहे डाळिंब. डाळिंब मध्ये भरपूर प्रमाणात लोह उपलब्ध असते जे आपल्या शरीरातील रक्त वाढवण्यासाठी मदत करत असते.
त्याचबरोबर सर्वात जास्त पाणी पिणे अतिशय चांगले आहे. आपण जर दिवसभरातून पाच ते दहा लिटर पाणी प्यायल्याने आपल्या शरीरामध्ये जी काही विषारी घटक असतात ते बाहेर निघण्यासाठी मदत होत असते आणि आपले शरीर पूर्णपणे स्वच्छ होऊन आपल्या शरीराला कोणताही प्रकारचा आजार होत नाही म्हणून आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी सगळी फळे खाणे गरजेचे आहे त्याच बरोबर जास्तीत जास्त पाणी पिणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.