या ६ आजारांमुळे केस गळतात… तुम्हाला तर हे आजार नाहीत ना..?
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर आपले केस खूप वेगाने गळत असतील तर त्यामागे अनेक गंभीर कारणे असू शकतात. म्हणजेच शरीरात वाढणारा कोणताही आजार असू शकतो. अशा आजारांबद्दल आज आपण जाणून घेऊयात जे शरीरात हळू हळू वाढतात आणि नंतर हानिकारक ठरतात. केस झडणे या रोगाचे प्रारंभिक लक्षण असू शकते. वेगाने झाडणारे केस टाळण्यासाठी आपण बरीच सौंदर्य उप्तादने आणि टिप्स वापरतो. परंतु आपणास माहित आहे का केसांची काळजी न घेतल्यामुळेच केस झडत असतात. यामध्ये अनेक छोट्या मोठ्या आजारांचे लक्षण असू शकते.
तर चला मग जाणून घेऊया कोणते ६ आजार आहेत ज्याच्यामुळे आपले केस गळायला चालू होतात. हि सर्वात महत्वाची गोष्ट आहे जेव्हा केस गळतीची बाब येते तेव्हा प्रत्येकाला असे वाटते कि त्याचे केस गळत आहेत कारण केस गळणे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. केस तत्ज्ञांच्या मते जर एखाद्या व्यक्तीचे दररोज ७० ते १०० केस गळत असतील तर घाबरून जाण्यासारखं नाही. परंतु आपल्या केस गळतीचे प्रमाण यापेक्षाही जास्त असेल तर आपल्याला सौंदर्य उप्तादने नाहीत तर बरेच काही करणे आवश्यक आहे. कारण केस गळणे देखील शरीरात वाढणाऱ्या बऱ्याच आजरांचे लक्षण असू शकते.
१. थायरॉईड च्या वाढीमुळे केस गळतात.
तीव्र आणि दीर्घकाळापर्यंत हायपोथॉराईजम मुळे केस गळतात. थायरॉईड चा योग्य उपचार केवळ आपले केस गळूच शकत नाहीत तर नवीन केस वाढवण्यासही मदत होते. या प्रक्रियेस काही महिने लागू शकतात.
२. कर्करोगाची शरीरात वाढ होणे.
केस गळणे हे कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सामान्य समस्या आहे. बऱ्याचवेळा वेगाने केस गळणे हे देखील याचे संकेत आहेत. शरीरात कर्करोगासारख्या गंभीर आजाराची शक्यता वाढत आहे.
३. ब्लडप्रेशर
ब्लडप्रेशरमुळेही अधिक केस गळतात. जास्त काळासाठी उच्च रक्तदाब राखणे देखील केस गळतीस कारणीभूत ठरू शकते. कारण अशा परिस्थितीत रक्त वाहिन्यांवरील उच्च रक्तदाब दबाव आणतो. रक्तामध्ये सोडियमची मात्रा जास्त असते आणि त्याचा प्रवाह शरीरात व्यवस्थित वाहू शकत नाही. केस आणि हृदयाच्या आरोग्यासाठी हि स्थिती अत्यंत धोकादायक आहे.
४. इटिंग डिसऑर्डर
तरुण मुली आणि मुले बऱ्याचदा स्लिम आणि फिट बॉडीच्या शोधात अलोक्सओमिया आणि वुलेनियम सारख्या विकाराचे बळी पडतात. यात तरुणांपैकी बहुतेक मुली आणि महिला असतात. खाण्याच्या विकारामुळे आरोग्याच्या इतर समस्यांसह केस गळतीचे एक मोठे कारण समोर येत आहे. त्यामुळे आवश्यक पोषक आपल्या शरीरातील पेशींमध्ये पोहोचत नाही. आणि पोषण अभावामुळे वेगाने केस गळण्यास सुरुवात होते.
५. नैराश्य
नैराश्यामुळेही केस गळतात, एखादी व्यक्ती नैराश्यामध्ये अडकण्याआधी दीर्घकाळ चिंता आणि तणावात असते. या परिस्थितीत शरीरात आवश्यक उप्तादन नसतात आणि पचनाचा त्रास होतो. तसेच योग्यप्रकारे आहार न घेतल्यामुळे केसांना आवश्यक पोषण भेटत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा केस गळायला चालू होतात.
६. लुपस डिसऑर्डर
केस गळण्यामुळे आपल्याला लुपस डिसऑर्डर सुद्धा आपल्याला होऊ शकतो. हा एक स्वयम प्रतिकारक रोग आहे, यामध्ये शरीरात सूज बऱ्याचकाळापर्यंत राहते. त्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर आणि केसाच्या मुळावर प्रामुख्याने परिणाम होतो. यामुळे डोक्याचे केस वेगाने गळतात तर काही लोकांच्या मिश्या आणि भिवया मधील सुद्धा केस गळतात.
मित्रांनो हे जे ६ आजार होते या आजारांमुळे आपले केस गळत असतात. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर हि एवढी शेअर करा कि ज्यांचे केस गळत असतील तर त्यांना नेमका कोणता आजार आहे हे लवकर समजेल.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.