स्वप्नामध्ये स्वतःला मरत असताना पाहणे याचा नेमका काय अर्थ असतो.? स्वप्नामध्ये स्त्री ला पाहणे म्हणजे….
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तसे तर स्वप्न पाहणे सर्वसाधारण गोष्ट आहे. या जगातील प्रत्येक व्यक्ती स्वप्न पाहत असतो आणि या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुद्धा करत असतो परंतु आपल्याला पडणारे स्वप्न त्याचा अर्थ अनेकदा आपल्याला काही गोष्टी सुचक सुद्धा असतात. या स्वप्नांच्या आधारे आपल्या भविष्यातील अनेक घटना आपल्याला दर्शवण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्याला पडणाऱ्या प्रत्येक स्वप्नांचा अर्थ कधी कधी आपल्याला कळत नाही. या स्वप्नांचा अर्थ आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे असतो. प्राचीन शास्त्र मध्ये स्वप्नांबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आलेले आहेत.
स्वप्न व त्यामागे घडणाऱ्या घटना त्यांच्या घडामोडी याबद्दल विवेचन करण्यात आले आहे. अनेक अध्यात्मिक शास्त्रामुळे सुद्धा स्वप्ना बद्दल काही संकेत सुद्धा सांगण्यात आलेले आहे. बहुतेक वेळा आपण असे एखादे स्वप्न बघतो की त्या स्वप्नांमधे आपण एखादा अत्यंत सुंदर ठिकाणी असतो,ती जागा मनाला मोहून देणारी असते पण प्रत्यक्षात अशी जागा अस्तित्वातच नसते.
आपल्या स्वप्नातील ती जागा स्वर्गापेक्षा अतिशय सुंदर असते आणि आपण स्वर्गामध्ये आलेलेच आहे की काय असे आपल्याला भास होऊ लागतो. दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक व्यक्तींना मित्रांना व वृद्ध व्यक्तींना स्वप्नामध्ये पाहत असतो परंतु कधीकधी स्वप्नामध्ये अशा काही सुद्धा व्यक्ती येत असतात की ज्यांना आपण कधी पाहिले सुद्धा नाही, कधीच भेटलो सुद्धा नाही तर अशा वेळी अशा व्यक्ती ईश्वराचा दूत म्हणून तुमच्या समोर येत असतात. तर असे समजून घ्या की तुमच्या जीवनातील वाईट काळ संपून चांगला काळ येणार आहे असे याचा सुद्धा संकेत असू शकतो म्हणूनच आज आपण आपल्या लेखामध्ये असे काही संकेत याबद्दल जाणून घेणार आहोत की त्याच्या माध्यमातून स्वप्नांचा अर्थ आपल्याला नेमका काय असतो हे जाणून घेणार आहे.
जर तुम्ही स्वप्नामध्ये धावणाऱ्या घोड्यांचे दर्शन घेत असाल किंवा घोड्यावर बसून घोडेस्वारी करत असाल तर अशा प्रकारची स्वप्न अत्यंत शुभ मानले जातात. जर तुम्ही कोणत्याही नोकरीच्या शोधामध्ये असाल तर ती नोकरी तुम्हाला अवश्य मिळते आणि त्या नोकरीमध्ये तुम्हाला यश प्राप्त होते त्याचबरोबर ज्या स्वप्नांमध्ये सात घोडे वेगाने धावताना जर तुम्हाला दिसत असतील तर ती सुद्धा शुभ संकेत मानले जाते. अशा प्रकारच्या स्वप्नामुळे अचानक पणे तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता असते त्यानंतर दुसरे स्वप्न आहे स्वप्नात आरसा पाहणे.
जर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा स्वप्न बघत असाल तर याचा अर्थ तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये खूप सारे बदल पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये सुख शांती व चांगल्या गोष्टी घडणार आहेत. जर एखादी मुलगी अशा पद्धतीचे स्वप्न पाहत असेल तर तिचे लवकरच एखाद्या श्रीमंत मुलासोबत विवाह होणार आहे असा याचा अर्थ असतो त्यानंतर चे तिसरे स्वप्न आहे, स्वप्नात केस कापणे.
जर तुम्ही स्वप्नामध्ये केस कापताना पाहत असाल तर याचा अर्थ ही तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी चा लवकरच नाश होणार आहे आणि तुम्ही जे काही कार्य करत आहात या कार्यामध्ये अडचणी येत असतील तर त्या दूर होऊन तुमचे खास काम यशस्वी होणार आहे. जर तुम्ही स्वतः चे केस जप्त असताना स्वप्न पाहात असाल तर यामुळे तुम्हाला धन हनी सुद्धा होऊ शकते असा याचा अर्थ असतो.
जर आपण स्वप्नामध्ये भरपूर पाऊस पडत आहे, विजा चमकताहेत ढगांचा गडगडाट होत आहे अशा प्रकारचे चित्र आपल्याला दिसत असेल तर याचा अर्थ शुभ मानला जातो. याचा संकेत म्हणजे की ज्या ठिकाणी आपण काम करत आहोत आणि एखाद्या कार्यामध्ये जर आपण पैसा गुंतवला असेल तर त्या कार्यामध्ये आपल्याला पैसा दुपटीने प्राप्त होतो. जर तुम्हाला स्वप्नामध्ये चंद्र दिसत असेल तर याचा अर्थ सुद्धा शुभ मानला गेलेला आहे.
चंद्र हा शीतलतेचा प्रतीक आहे आणि जर आपल्याला स्वप्नामध्ये चंद्र दिसत असेल तर लवकरच आपल्या जीवनातील सगळ्यात संकटे अडचणी दूर होणार आहे. जर तुम्हाला स्वप्नामध्ये शृंगार केलेली महिला व लाल विवाहाची साडी नेसलेली महिला जर तुम्हाला दिसत असेल तर असे स्वप्नसुद्धा शुभ मानले जाते, याचा अर्थ की तुमच्यावर माता महालक्ष्मी प्रसन्न होणार आहे.
तुमच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव लाभणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये अचानक धनप्राप्तीचे योग निर्माण होणार आहे याची सुद्धा संकेत मानले जाते म्हणून स्वप्नामध्ये शृंगार केलेली स्त्री पाहणे अत्यंत चांगले आहे. जर तुम्हाला स्वप्नांमध्ये एखादी महिला आंघोळ करताना दिसत असेल तर याचा अर्थ शुभ मानला जातो व त्याचबरोबर तुम्ही जे काही कार्य करत आहात या कार्यामुळे तुम्हाला यश प्राप्त होणार आहे याचीसुद्धा संकेत मानला जातो.
परंतु जर एखादी स्त्री घाणेरड्या पाण्याने आंघोळ करत असेल किंवा चिखलाने माखलेली असेल तर असे स्वप्न दुर्भाग्य मानले जाते. जर तुम्हाला स्वप्नामध्ये एखादी महिला रागवताना दिसत असेल तर याचा अर्थ सुद्धा शुभ मानला जातो किंवा एखादी महिला तुम्हाला खोटे बोलून फसवत आहे असे काही दिसत असेल तर याचा अर्थ सुद्धा शुभ मानला जातो. तुम्ही कोणतेही कार्य करत आहात त्या कार्यामध्ये येणारी बाधा आता लवकरच संपणार आहे आणि कामांमध्ये यश प्राप्त होणार आहे याचा शुभसंकेत सांगणारी अशा प्रकारचे स्वप्न असते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.