२१ दिवसांत पोट होईल पूर्णपणे सपाट; वजन कमी करण्याचा रामबाण उपाय एकदा नक्की करा.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पोटाची चरबी वाढली असेल ,लठ्ठपणा आलेला असेल ,शरीरावर इतर भागी म्हणजेच पोटावर ,मानेवर, मांडीवर अतिरिक्त चरबी वाढली असेल तर आज आम्ही सांगितलेला या लेखामधील उपाय करून पहा. तुम्हाला नक्कीच फरक पडेल.
हा उपाय केल्यामुळे पोटाचा वाढलेला घेर सुद्धा कमी होतो आणि हा अगदी घरगुती उपाय असल्यामुळे या उपायाचे कोणते दुष्परिणाम नाही त्याचबरोबर या उपायांचा परिणाम तुम्हाला लवकरच पाहायला मिळतो म्हणूनच हा उपाय अवश्य करा. हा उपाय केल्याने पोट अगदी स्वच्छ राहते.
पोटातील आतड्याची पातळी निरोगी राहतात व शरीराची हे महत्त्वाचे कार्य असते ते म्हणजे पचन कार्य , योग्य पद्धतीने सुरळीत कार्य करते. हा उपाय सलग तुम्हाला २१ दिवस करायचा आहे त्याचबरोबर हा उपाय करताना एक काळजी घ्यायची आहे म्हणजे हा उपाय झोपण्या वेळी करायचा आहे. दिवसभर करायचा नाही.
त्यासाठी आपल्याला एक पदार्थ लागणार आहे आणि या पदार्थाचे नाव आहे त्रिफळा चूर्ण. हे त्रिफळा चूर्ण आपल्याला बाजारात व मेडिकलच्या स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होत असते. त्रिफळा चूर्ण मध्ये आवळा, बेहडा ,हिरडा या तीन आयुर्वेदिक घटकांचा समावेश असतो.
त्यासाठी आपल्याला एक टोप भर पाणी घेऊन त्यामध्ये दोन चमचा त्रिफळा चूर्ण मिसळायचे आहे आणि हे मिश्रण मंद आचेवर तीन ते चार मिनिटं उकळायचे आहे एकदा काही मिश्रण चांगल्या पद्धतीने उकळून झाल्यास थोडा वेळ गार होईपर्यंत वाट पाहायचे आहे नंतर गाळणीच्या साह्याने हे मिश्रण गाळून घ्या.
एकदा का मिश्रण गाळून झाल्यानंतर त्यात एक चमचा मध मिसळून ते पाणी प्यायचे आहे. हा उपाय साधारणतः आपल्याला एकवीस दिवस करायचा आहे. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला लवकरच पित्ताचा होणारा त्रास बद्धकोष्ठता , पोट वेळेवर साफ न होणे, पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबी, लठ्ठपणा इत्यादी सारख्या समस्या लवकरच दूर होतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.