भारतातील या ठिकाणी सीतामाता पृथ्वीमध्ये विलीन झाली होती; हा आहे पाताळलोकचा रस्ता.!

भारतातील या ठिकाणी सीतामाता पृथ्वीमध्ये विलीन झाली होती; हा आहे पाताळलोकचा रस्ता.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा एका ठिकणाबद्दल सांगणार आहोत जिथे पृथ्वीच्या रचेत्या श्री ब्रह्मदेवांनी तपश्चर्या केली होती तथा श्री रामचंद्रांनी माता सीतेचा त्याग केला होता, जिथे लवू-अंकुशचा जन्म झाला होता, जिथे बालक धृव याने तपश्चर्या केली होती, इथेच वाल्मिकी यांनी रामायणाची रचना केली होती, इथेच प्रभू रामांच्या अश्वमेध घोड्याला लवू-अंकुश यांनी पकडले होते, इथेच स्वर्ग पायरी आहे आणि इथेच माता सीतेने पृथ्वीच्या गर्भात स्वत:ला विलीन करुन घेतले होते. मित्रांनो या सर्व गोष्टींचे मिलन या एका जगी होणे ही साधारण बाब नाही आहे. चला तर जाणून घेऊया कोणती आहे ही जागा? आणि तुम्ही इथे कसे येऊ शकता.?

भारताच्या कानपूर शहरात एक अतिपवित्र असे ठिकाण आहे त्यास बित्ठूर असे संबोधले जाते. वेद पुराणांनुसार हीच ती पवित्र भूमी आहे जिथे श्री ब्रह्मदेव यांनी तपश्चर्या केली होती. तथा बालक धृव याने सुद्धा भगवान विष्णूंची तपश्चर्या इथेच केली होती. बित्ठूर श्रीमद वाल्मिकी यांची तपोभूमी होती आणि इथेच त्यांनी रामायण लिहले होते. मंदिरातील पुजरी सांगतात की सुमारे 8 लक्ष वर्ष पुर्व माता सीता बित्ठूरला आली होती आणि इथेच लवू-अंकुशचा जन्म झाला होता.

या भूमीतच लवू-अंकुश यांनी वाल्मिकींकडून शिक्षा ग्रहण केली होती. आज ही राम-जानकी मंदिरात लवू-अंकुश यांचे बाण ठेवलेले आहेत. गंगा नदीच्या तिरावर असलेल्या या भूमीत सीता रसोई देखील आहे. मानले जाते की माता सीता इथे जेवण बनवत असत. मित्रांनो हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की माता सीता जेवण बनविण्याकरिता जी भांडी वापरत असत ती आज ही इथे पहिली जाऊ शकतात. तसेच लवू-अंकुश ज्या झाडाखाली ल’घूशं’का करत असत ते झाड सुद्धा इदा पहिले जाऊ शकते.

श्री रामचंद्रांनी जेव्हा अश्वमेध यज्ञाचा घोडा सोडला होता तेव्हा कोणी ही त्या गोड्याला पकडण्याची हिम्मत केली नाही परंतू घोडा जेव्हा बित्ठूर पोहचला तेव्हा लवू-अंकुश यांनी या घोड्याला पकडले. त्यानंतर रामभक्त श्री हनुमान घोडा सोडविण्यासाठी इथे आले होते तेव्हा लवू-अंकुश यांसोबत त्यांचे युद्ध झाले होते आणि ते लवू-अंकुश यांकडून परजित होवून बंदी बनले होते.

त्यानंतर श्री लक्ष्मण घोडा सोडविण्यासाठी बित्ठूरला आले परंतू त्यांना ही बंदिस्त केले गेले आणि ज्या ठिकानी हे दोघ बंदिस्त होते ते ठिकाण अजून ही बित्ठूरला पहिले जाऊ शकते. त्यानंतर स्व:ता प्रभू राम येथे आले. लढाई करतानाच रामांना कळले की लवू-अंकुश त्यांचे पुत्र आहेत. मग ते माता सीतेला जाऊन भेटले परंतू तेव्हा च माता सीता धरती मातेच्या ‘ग’र्भा’त’ विलिन झाली. हे स्थान अजूनही इथेच आहे आणि सकाळ-संध्याकाळ याची पूजा केली जाते.

तसेच ब्रह्मदेवांनी इथे एक शिवलिंग स्थापित केले आणि याचे लिंग ब्रह्ममहलिंग असे पडले. मित्रांनो जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा तुम्हाला इथे ब्रह्म खुटी दिसेल आणि याला धरतीचा केंद्रबिंदू मानले जाते. तसेच हे ही मानले जाते की श्री ब्रह्मांनी इथेच बसून धरतीची स्थापना केली होती. तसेच इथे 99 यज्ञ केले गेले आणि जेव्हा ब्रह्मदेव जाण्यास उठले तेव्हा त्यांच्या डाव्या पायाची करंगळी मातीत घुसली आणि तिथेच ब्रह्म खुटी निर्माण झाली . बित्ठूरच्या धरतीत अश्या अनेक चमत्कारीक घटना घडल्या आहेत ज्यांना अजून शोधकरता शोधत आहेत. बित्ठूर हे प्राकृतिक सुंदरता आणि पौराणिक कथांनी नटलेला आहे. आयुष्यात एकदा तरी तुम्ही बित्ठूरला नक्की भेट द्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *