शेवग्याच्या पानांची भाजी जणू अमृतच कोणत्याही चमत्कारा पेक्षा कमी नाहीत शेवग्याच्या पानांची भाजी खाण्याचे हे जबरदस्त फायदे !
मित्रांनो, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पतींचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच चांगले फायदे आहेत. जे आपल्या अनेक रोगांवर देखील मात करू शकतात.आपल्यातील अनेकजण आवडीने शेवग्याच्या शेंगा खातात. पण या शेंगाचे फायदे फारच कमी लोकांना माहीत असतात. जर तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची भाजी खाण्याचे फायदे सांगितले तर तुम्ही अधून मधून नाही तर नियमितपणे शेवग्याच्या शेंगाची भाजी खाल. या शेंगांची केवळ खासियत नसून आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या याने दूर केल्या जाऊ शकतात. इतकेच काय तर मांस, अंडी आणि दुधापेक्षाही जास्त प्रोटीन तुम्हाला या भाजीतून मिळू शकतं आणि त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगा या अनेक फायदेशीर तत्वांचा भांडार आहे. कारण यात भरपूर प्रमाणात प्रोटीन,अमीनो अॅसिड, बीटा कॅरटीन, कॅल्शिअम, फायबर, सोडिअम आणि वेगवेगळे फीनॉलिक असतात.
आणि शेवग्याच्या केवळ शेंगाच नाही तर याच्या पानांचा देखील भाजीसाठी वापर केला जातो आणि मित्रांनो, शेवगा ही एक शेंग भाजी आहे. दक्षिण भारतात आढळणारी ही वनस्पती खूप औषधी देखील आहे. शेवग्याचं झाड अतिशय वेगानं वाढतं. त्याच्या शेंगांबरोबरच पानं, फुलंदेखील खाण्यासाठी वापरली जातात. या झाडाचे हे तीनही भाग खूप फायदेशीर आहेत. शेवग्यामध्ये प्रथिनं, अमीनो ॲसिड, बीटा-कॅरोटीन आणि वेगवेगळ्या प्रकारचे फिनॉलिक असतात जे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात.
शेवग्याच्या शेंगा, पाने, फुले, खाण्यासाठी तर झाडाची साल डिंक मिळवण्यासाठी वापरतात. शेवग्याच्या झाडाच्या ताज्या हिरव्यागार पानांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे, खनिजे, ऑंटीऑक्सिडंट आणि अमिनो ॲसिड असतात. पाने वाळवून पावडर करून ठेवणे व आहारात वापरणे अधिक सोईचे आहे. वाळलेल्या पानांची पावडर वर्षभर टिकते. झाडांची ताजी हिरवीगार पाने तोडून स्वच्छ धुवावीत आणि उन्हामध्ये वाळवावीत.
परंतु मित्रांनो ही पाने उन्हात वाळवताना त्याला संरक्षित पद्धतीमध्ये शक्यतो सोलार ड्रायरचा वापर करून वाळवावे म्हणजे त्यावर कचरा, धूळ, किडे अथवा इतर घाण बसणार नाही आणि स्वच्छ वाळलेली पाने मिळतील. तसेच वेळही वाचेल. वाळलेली पाने मिक्सरमधून बारीक करून चाळून घ्यावीत. ही पावडर भाजी, वरण, भाकरी, पराठे अथवा सुपमधून वापरता येईल.
मित्रांनो शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असतं. ज्याचा वापर पूर्वीपासून सौदर्यासाठी केला जातो. जर तुम्ही या शेवग्याच्या शेंगाचा आहारात नियमित समावेश कराल तर तुमच्यावर वाढत्या वयाची लक्षणे दिसणार नाही. तसेच याने डोळ्यांची दृष्टीही चांगली राहते आणि त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असतात. ज्याने तुम्हाला हाडे मजबूत करण्याला मदत मिळते. तसेच दातही मजबूत होतात. म्हणूनच लहान मुलांना या शेंगांची भाजी देणं फायदेशीर मानलं जातं.
मित्रांनो शेवग्याच्या पानांमध्ये, फूलांमध्ये अॅन्टीबॅक्टेरियल घटक असतात. यामुळे अनेक प्रकारच्या संसर्गापासून तुमचा बचाव होण्यास मदत होते. शेवग्याच्या शेंगांमध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे व्हिटामिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतं. तसेच शरीरातील फ्री रॅडीकल्सचा धोका कमी करण्यासही शेवग्याच्या शेंग़ा फायदेशीर ठरतात.
मित्रांनो त्याचबरोबर उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी शेवग्याच्या पानांचे पाणी आवर्जून प्यावे. यासाठी एक ग्लास पाण्यात शेवग्याची थोडी पाने टाकून ते पाणी उकळा. पाणी उकळून अर्धे झाल्यावर ते थंड करून घ्या. नंतर ते पाणी गाळून घ्यावं आणि प्यावं. रक्तदाब वाढलेला असेल तेव्हा सलग दोन दिवस हे पाणी प्या. त्यानंतर रक्तदाब कमी झाल्यानंतर हे पाणी दोन दिवसांच्या अंतरानं घ्या. या काळात दररोज आपला रक्तदाब तपासा ज्यामुळं रक्तदाब किती कमी झाला आहे, हे तुम्हाला लगेच समजून येईल. त्यानंतर आठवड्यातून एकदा हे पाणी पिणं योग्य ठरेल.
मित्रांनो शेवग्याच्या पानांच्या रसाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होतेच परंतु त्याचबरोबर मधुमेह असणाऱ्या व्यक्तींच्या ग्लुकोज लेवल्स नियंत्रणात ठेवण्यासही शेवग्याच्या पानांचा रस उपयुक्त आहे. शेवग्याच्या पानाचा रस मधाबरोबर घेतल्यास डायरिया, जुलाबावर गुणकारी आहे. या रसामुळे पोटातील कृमींचा नाश होण्यास मदत मिळते.
वरील माहिती स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.