या नंबरची नोट मिळाली तर जपून ठेवा; घरात कधीच पैशाची कमी भासणार नाही.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अशा नोटे विषयी माहिती घेणार आहोत ,खरंतर दैनंदिन जीवनात आपल्या हातात अनेक प्रकारच्या नोटा व नाणी येत असतात. यापैकी काही नोटा इतक्या भाग्यशाली असतात की ही नोट जरी आपल्याकडे एखादी असली किंवा आपल्या पॉकेटमध्ये असल्यास, तिजोरीमध्ये असल्यास ,आपल्याकडे धन अक्षरश: आकर्षित होते.
मोठ्या प्रमाणात पैसा आपल्याकडे खेचला जातो. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा की नका ठेवू परंतु आज आम्ही तुमच्यासाठी अशी एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत की या नंबरची नोट तुमच्याकडे आल्यास तर चुकूनही ती खर्च करू नका.ती कायम आपल्याजवळ जपून ठेवा. हा नंबर हिंदू असो किंवा मुस्लीम असो दोन्ही धर्मांच्या लोकांसाठी अत्यंत शुभदायी असा हा नंबर आहे.
आपण बरोबर ओळखले 786. ज्या नोटेवर 786 हे अंक असतील अगदी क्रमाने ती अवश्य घ्या आणि घेतल्या नंतर करायचे करायचे काय सर्वप्रथम जर ही नोट खराब झालेली असेल तर ती व्यवस्थित साफ व स्वच्छ करा त्यानंतर ती आपल्या देवघरात ठेवायची आहे. देवाच्या चरणी ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला हळद-कुंकू आहे ते वाहायचे त्याचबरोबर देवपूजा करताना या नोटेचे सुद्धा आपल्याला धूप अगरबत्ती लावून पूजा करायची आहे.
या नोटची पूजा करत असतानाच एका पिवळ्या रंगाच्या वस्त्रावर आपल्याला दोन हळकुंड ठेवायचे आहेत. हळकुंड ताजी व फ्रेश असावी किडलेली व खराब झालेली हळकुंड घेऊ नये. अशी दोन हळकुंडे आपल्याला पिवळ्या रंगाच्या कपड्यावर ठेवायची आहे त्यांची विधीवत पूजा करायची आहे तसेच आपल्या इष्ट देवतेला म्हणजेच कुलदेवतेला मनोभावे प्रार्थना करायची आहे की आपल्या जीवनामध्ये कधीच भविष्यात धनसंपत्ती ची कमतरता निर्माण होऊ नये.
आपल्या आयुष्यात नेहमी सुख शांती लाभो धनप्राप्ती मोठ्याप्रमाणात होऊ दे.अशी प्रार्थना सुद्धा करायची आहे त्यानंतर ही नोट आपल्याला आपल्या पॉकेटमध्ये सुद्धा ठेवायचे आहे किंवा ही नोट तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये सुद्धा ठेवू शकता. जर तुम्हीही नोट तुमच्या तिजोरीमध्ये ठेवणार असाल तर या नोटे सोबत तुम्हाला पिवळ्या वस्त्रावर ठेवलेल्या दोन हळकुंडाच्या गाठी बांधून तेसुद्धा तुम्हाला तिजोरी मध्ये ठेवायचे आहे.
या पोटली बांधलेल्या वस्त्रातील हळकुंड तीन ते चार महिन्यानंतर खराब होतात त्यानंतर पुन्हा नवीन हळकुंड त्या जागेवर आणून वरील सांगितलेली क्रिया पुन्हा करून आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचे आहे .असे केल्याने तुमच्या तिजोरी मध्ये धन नेहमी भरलेले राहील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.