एका रात्रीतच कंबर दुखी करा कायमस्वरूपी गायब; करा फक्त हा एक सोप्पा घरगुती उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याचा ऋतू हिवाळा चालू आहे. या ऋतूमध्ये आपल्या शरीराला अनेक समस्या उद्भवत असतात व या समस्या पित्ताच्या असतील, वाताच्या असतील व कफ संबंधित असतील तर या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय सुद्धा करत असतो परंतु काही केल्या आपल्याला फारसा फरक जाणवत नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत.
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणामध्ये थंडावा निर्माण झालेला असतो आणि अशावेळी आपल्याला सांधेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी व हाडांच्या अन्य समस्या वारंवार उद्भवत असतात कारण की त्यामुळे आपल्या शरीरामध्ये वेदना भरपूर प्रमाणात होतात, चला तर मग जाणून घेऊया आपल्या शरीरातील मांस पेशी च्या वेदना दूर करण्यासाठी नेमके कोणते उपचार आपल्याला करायला हवेत त्याबद्दल..
अनेकदा आपल्या शरीरामध्ये वेदना या पोषक तत्वांची कमतरता असल्यामुळे सुद्धा होत असते त्याचबरोबर सध्या प्रत्येकाला अंगदुखी, कंबरदुखी, मांस पेशी मध्ये वेदना सतावत आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनाच या समस्या त्रास देत आहेत आणि प्रत्येक जण पेन किलर खाऊन आपल्या शरीरातील वेदना दूर करत आहे. बहुतेक वेळा पेनकिलर खाल्ल्याने वेदना लगेच थांबते परंतु त्याचे विपरीत परिणाम नंतर आपल्या शरीराला भोगावे लागतात म्हणूनच अशा वेळी आपल्याला काही आयुर्वेदिक उपचार आवश्य करायला हवेत.
आजच्या लेखामध्ये आपण जे उपाय करणार आहोत तो अत्यंत महत्त्वशाली आहे तसेच हा उपाय केल्याने आपल्या शरीराला कोणत्याच प्रकारचा दुष्परिणाम सुद्धा उद्भवत नाही. हा उपाय करण्यासाठी आपण जो पदार्थ वापरणार आहोत ते आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जाते आणि हा पदार्थ म्हणजे फळ आहे आणि त्या फळाचे नाव आहे जायफळ.
जायफळ हे एक मसाल्याचा पदार्थ आहे आणि आपल्या अन्नपदार्थांमध्ये अनेकदा आपण या फळाचा वापर सुद्धा करत असतो परंतु या फळाचा वापर अन्नपदार्थांमध्ये तर केला जातोच पण त्याचबरोबर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा केला जातो. या फळाचे अनेक औषधी गुणधर्म सांगण्यात आलेले आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये जायफळ चा वापर अन्नपदार्थांमध्ये अवश्य करायला पाहिजे त्याचबरोबर लहान मुलांना सर्दी खोकला व छातीमध्ये कफ झाला असेल तर अशा वेळी चुटकीभर जायफळाची पावडर त्यांना चाटायला अवश्य द्यायला पाहिजे.
जायफळाचे तेल हे वेदनाशक म्हणून प्रसिद्ध आहे तसेच जर आपण जायफळचे सेवन केले तर आपली पचनशक्ती सुद्धा योग्य प्रमाणात काम करते आणि म्हणूनच जर तुम्हाला पोटा संबधित कोणत्याही प्रकारचे आजार असतील तर अशा वेळी आपण जायफळ आवश्य खायला पाहिजे. आपण आपल्या लहान मुलांना जायफळाचे चाटण सुद्धा देऊ शकतो त्यामुळे त्यांचे पोटाचे आरोग्य चांगले राहते.
ज्या व्यक्तीना रात्री झोप लागत नाही, नेहमी ताण तणाव असतो व अनिद्रा ची समस्या वारंवार त्रास देत असते अशा व्यक्तींनी रात्री झोपताना एक ग्लास दुधामध्ये थोडीशी जायफळ पावडर टाकून सेवन करावे यामुळे तुम्हाला झोप चांगली लागेल व निद्रानाशाची समस्या लवकरच दूर होऊन जाईल. जर आपण जायफळ पेस्ट बनवून आपल्या चेहऱ्यावर लावल्यास आपला चेहरा नैसर्गिक रित्या चमकू लागतो तसेच आपल्या चेहऱ्यावर काळे डाग, वांग, पिंपल्स आले असले तरी ते सुद्धा निघून जातात तसेच नैसर्गिक दृष्ट्या आपल्या त्वचेची शुद्धता करण्याचे कार्य जायफळ करत असते.
आपण कच्चा दुधामध्ये जायफळ उगाळून सुद्धा लहान मुलांना देऊ शकतो परंतु आपल्याला लहान मुलांना देताना अगदी चिमुटभर पेक्षा कमी त्यांना द्यायची आहे अन्यथा लहान मुलं त्यांना झोप खूप लागेल आणि अशा वेळी जर तुमच्या मुलाला लवकर जाग आली नाही तर तुम्ही घाबरून जाल आणि यामुळे तुमच्या मनात भीतीचे वातावरण परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते म्हणून आपल्या बाळाला अगदी चिमुटभर त्यापेक्षा कमी चाटण चाटायला द्यायचे आहे.
जायफळचे प्रमाणापेक्षा जास्त जर आपण सेवन केले तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो कारण की जायफळ हे उष्णता गुणधर्मांनी युक्त असल्याने आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्याचे कार्य करते आणि म्हणूनच अनेकदा तज्ञ मंडळी द्वारे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये जायफळ खाण्याचे सल्ला दिला जातो. आपल्यापैकी अनेक जण वेदना दूर करण्यासाठी जायफळ चा वापर सुद्धा करतात म्हणूनच आज आपण जायफळाचा वेदना दूर करण्यासाठी उपाय जाणून घेणार आहोत.
जायफळ युक्त तेल बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मोहरीचे तेल घ्यायचे आहे. मोहरीचे तेल सुद्धा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे व ज्या व्यक्तींना सांधेदुखीची समस्या असते अशा व्यक्तीने मोहरीच्या तेलाने नियमित पाणी मालीश करायला हवी.आपल्याला हा उपाय करण्यासाठी दोन ते तीन चमचे मोहरी चे तेल लागणार आहे.
त्यानंतर आपल्याला चिमूटभर जायफळ बारीक केलेले पावडर घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा हळद पावडर घ्यायची आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की हळद ही नैसर्गिक दृष्ट्या पेन किलर म्हणून कार्य करते नंतर आपल्याला हे सगळे मिश्रण गॅसवर गरम करायचे आहे आणि कोमट कोमट झाल्यावर ज्या ठिकाणी वेदना भरपूर प्रमाणामध्ये होत आहे अशा ठिकाणी हितेल आपल्याला लावायचे आहे.
हे मिश्रण आपण जास्त दिवसासाठी बनवून एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर सुद्धा करू शकतो अशा पद्धतीने आपण जायफळचा वापर करून नैसर्गिक दृष्ट्या वेदनाशामक तेल बनवू शकतो. जर तुम्हाला सुद्धा सांधेदुखी कंबरदुखी व पाठदुखी व अन्य हाडांच्या समस्या त्रास देत असतील तर हा उपाय अवश्य करून पाहा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.