रक्त बनवायचा कारखाना आहेत हि ५ फळं., शरीरातील रक्त वाढवण्यासाठी यांचा नक्कीच वापर करा..!

रक्त बनवायचा कारखाना आहेत हि ५ फळं., शरीरातील रक्त वाढवण्यासाठी यांचा नक्कीच वापर करा..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो काही कारणांमुळे आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण होते. मग आपलं आजारपण असेल, आपलं वय असेल किंवा इतर काही गोष्टी असतील. जर आपल्या शरीरातील रक्त कमी झालं तर याची लक्षण कोणती हे आपण सर्वप्रथम जाणून घेणार आहोत.

आपल्याला थकल्यासारखं वाटणे, अशक्तपणा आपल्या शरीरामध्ये निर्माण होणे, त्याचबरोबर सतत हातपाय हलवत राहणे, शरीरामध्ये मुंग्या येणे इत्यादी सर्व गोष्टींची लक्षण आहे. तर आज आम्ही तुम्हाला अशी ५ फळे सांगणार आहोत ज्यांचे तुम्ही नियमित सेवन केलंत तर या सर्व समस्या आणि रक्ताची कमी भरून निघेल. चला तर मग जाणून घेऊया या फळांबद्दल.

१. बिट:- बिट तुम्हा सर्वांना माहिती असेलच. बिट आपल्या आहारामध्ये असणं खूप महत्वाचं आहे. यामध्ये व्हिटॅमिन,A ,B,C यांची मात्रा जास्त असते. आपल्या त्वचेसाठी सुद्धा हे फळ खूप चांगलं आहे, यामुळे आपल्या चेहऱ्यावर लाली येते. बिट आहारात असल्यास रक्ताची कमतरता दूर होते.

२. टोमॅटो:- आपल्याला जर अनेमिया असेल, आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर ती कमतरता दूर करण्यासाठी टोमॅटो सुद्धा खूप फायदेशीर ठरतो. हे आपल्या शरीरासाठी खूप पोषक आहे, टोमॅटोच्या रसामुळे आपलं जे पाचनतंत्र आहे ते सुद्धा व्यवस्थित सुरळीत काम करत. पोट साफ न होण्याची समस्या, कब्ज असेल तर ती सुद्धा या टोमॅटोने दूर होईल.

३. गाजर:- गाजर सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप शक्तिशाली आहे. रक्त वाढवण्यासाठी,  आपली पचनसंस्था सुरळीत करण्यासाठी गाजर सुद्धा चांगलं आहे. ज्यांच्या डोळ्यांची नजर कमी आहे अशांनी सुद्धा गाजराचे सेवन केल्यानंतर डोळ्यांची शक्ती वाढते. हिमोग्लोबिनची सुद्धा आपल्या शरीरात कमतरता असेल तर त्यांनी सुद्धा गाजराचे सेवन करावे.

४. सफरचंद:- सफरचंद सगळ्या रोगांचा महाकाल असं म्हटलं जातं. जर रोज सकाळी आपण १ सफरचंद नित्यनियमान खाल्लं तर अशी लोकं कधीच आजारी पडत नाहीत असं म्हटलं जातं. कारण सफरचंदामध्ये व्हिटॅमिन,A ,B,C आहे तसेच यामध्ये कॅल्शियम ची मात्रा सुद्धा भरपूर आहे. त्यामुळे मित्रांनो ज्यांना आयुष्यभर तंदुरुस्त राहायचं आहे त्यांनी दररोज सकाळी एक सफरचंद खाल्लंच पाहिजे. याने आपल्या शरीरामध्ये रक्ताची आलेली कमतरता सुद्धा दूर होते.

५. चुकंदर:- ज्यांना रक्ताची समस्या आहे किंवा ज्यांच्या शरीरामध्ये रक्त तयार होत नाही अशांनी चुकंदर मात्र अवश्य खावं. चुकंदर खाल्ल्याने सुद्धा आपल्या शरीरातील रक्ताची मात्रा असते ती तयार होण्यास मदत होते. हे खाल्ल्याने आपल्या जी काही हिमोग्लोबिन, रक्ताची कमतरता अशा समस्या असतील त्या हे फळ खाल्ल्याने दूर होतील.

मित्रांनो हि माहिती नक्कीच आपल्या सर्वांना फायदेशीर ठरेल, हि माहिती तुमच्यापुरतीच मर्यादित न ठेवता तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *