एकादशीच्या रात्री गुपचूप डब्ब्यात टाका “हे”; प्रत्येक कष्ट दूर करतील भगवान विष्णू.!

एकादशीच्या रात्री गुपचूप डब्ब्यात टाका “हे”; प्रत्येक कष्ट दूर करतील भगवान विष्णू.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येतात त्याच्या मधल्या कोणत्याही एकादशीला आपण हा उपाय करू शकतात. खरतर एकादशीच्या दिवशी तांदळामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ह्या एका वस्तूच्या प्रभावाने आपल्या घरात माता लक्ष्मीची कृपा बरसते. धनसुख, वैभव, ऐश्वर्य निर्माण होते. हा उपाय कसा करायचा आहे ? त्याचे नियम कोणते आहे? ते आपण आता जाणणार आहोत. एकादशी तिथि भगवान श्रीहरी श्रीविष्णूची प्रिय तिथी मानली जाते.

हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वश्रेष्ठ व्रत एकादशीचे व्रत मानलं जाते. तुम्ही देव पूजा करतात अगदी त्याच प्रमाणे हा उपाय करायचा आहे. एका पाटावरती भगवान श्रीहरी यांची आणि माता लक्ष्मीची पूजा करा. ही पूजा आपण सकाळी करू शकतात आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर रात्री करू शकतात. काही वस्तू माता लक्ष्मीना अतिशय प्रिय असतात त्यामध्ये अक्षता ,तुटले फुटलेले तांदूळ ,चांदी विलायची, केशर, लवंग या वस्तू माता लक्ष्मी अत्यंत प्रिय आहे.

खरेतर एकादशीच्या दिवशी अक्षताचे सेवन करू नये म्हणजेच हिंदू धर्म असं मानतो की एकादशी मसूर, डाळ असेल ,वांगी असेल किंवा मांसाहार असेल या गोष्टी वर्ज्य कराव्यात आणि आपण तर विशेष प्रयोग करत आहोत माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी. या नियमाचं पालन आवश्य करा. या दिवशी भात ,तांदूळ खाऊ नका तसेच या दिवशी जर आपण तांदूळ खात नसलो तरीही या दिवशी आपण तांदळाचा उपयोग करणार आहोत. माता लक्ष्मी यांना अक्षता अत्यंत प्रिय असतात.

माता लक्ष्मीची पूजा करताना एक चांदीचा सिक्का तोही तुम्ही वापरू शकता किंवा नवीन खरेदी केला तरीही चालेल. असा एक चांदीचा सिक्का पूजा करताना आपण माता लक्ष्मी जवळ ठेवणार आहोत. पूजा करताना गंगाजल ने किंवा साध्या पाण्याने स्वच्छ धुऊन एका पात्रांमध्ये माता लक्ष्मी च्या चरणी ठेवायचा आहे. थेट जमिनीवर किंवा पाटावर ठेवू नका त्याच्याखाली काही ना काही आसन ठेवा. फुलाच्या पाकळ्या किंवा एका झाडाचं पान किंवा काही नसेल तर वाटीमध्ये हा चांदीचा शिक्का ठेवा आणि त्यानंतर विधिवत माता लक्ष्मीचे आणि श्री भगवान हरी श्रीविष्णूची पूजा करायची आहे.

त्या चांदीच्या सिक्का वरही आपण हळद-कुंकू व्हायचा आहे आणि त्यानंतर ही पूजा संपूर्ण झाल्यानंतर एकादशीच्या रात्री आपण आपल्या किचन मध्ये तांदळाच्या डब्यात हा चांदीचा शिक्का ठेवायचा आहे. तो टाकण्यापूर्वी माता लक्ष्मी यांना श्री भगवान विष्णू यांना मनोभावे प्रणाम करून वंदन करून प्रार्थना करायची आहे. आमच्या जीवनातील धन समस्या पैशांच्या समस्या दूर करण्याची आणि आपल्या घरात धन वैभव, बरकत करण्याची प्रार्थना करायची आहे.

त्यानंतर तो सिक्का उचलून तांदळाच्या डब्यात टाकायचा आहे तसेच संपूर्ण वर्षभर चांदीचा सिक्का त्याठिकाणी असेल मात्र जेव्हा जेव्हा दीपावली येईल तेव्हा आपण माता लक्ष्मीची पूजा करतो त्यावेळी तो सिक्का काढून माता लक्ष्मी पुजेस ठेवायचा आहे आणि पूजा संपूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री पुन्हा तो सिक्का तांदळाच्या डब्यात ठेवायचा आहे. त्यातील तांदूळ आपण वारंवार वापरू शकतात आणि वापरायचे आहेत. तांदूळ बदलत राहतील मात्र सिक्का त्याच ठिकाणी असेल. हा छोटासा उपाय आहे नक्की करून पहा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *