मोर पंखास गुपचूप आपल्या घरातील या दिशेला ठेवा; माता महालक्ष्मी तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहील.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अनेक अशा काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींना महत्त्व देण्यात आलेले आहे. या गोष्टींच्या आधारे आपण आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणू शकतो आणि या वस्तू जर आपल्या घरामध्ये असतील तर आपली प्रगती सुद्धा निश्चित होत असते अशाच एका वस्तूबद्दल आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. ही वस्तू जर आपल्या घरामध्ये असल्यास आपल्या जीवनामध्ये नेहमी प्रगती होते तसेच त्या वस्तूला अध्यात्मिक दृष्ट्या महत्व आहे त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा अनेकदा महत्त्व सांगण्यात आलेले आहे,चला तर मग जाणून घेऊया वस्तूबद्दल..
आपल्या सर्वांना मोर हा पक्षी आवडत असतो. मोराचा पिसारा प्रत्येकाला आवडत असतो. या मोराचा पिसारा मध्ये वेगवेगळे रंग मानवाला मोहित करत असतात आणि या रंगामुळे प्रत्येकाला आपल्याकडे सुद्धा मोरपंख असावा अशी इच्छा अपेक्षा वाटत असते म्हणूनच आज आपण मोरपंख बद्दल काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. मोरपंख प्रत्येकाला आवडत असतो तसेच यामुळे पंखाला अध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्त्व देण्यात आलेले आहे, याचा अध्यात्मिक दृष्टीकोणबद्दल आज आपण या लेखामध्ये सविस्तर रीत्या जाणून घेणार आहोत.
मोर पंखामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो त्याच बरोबर सर्व नवग्रहांचा आशीर्वाद सुद्धा मोर पंखा मध्ये आपल्याला मिळतो. मोर हा पक्षी भगवान कार्तिकेय यांचे वाहन आहे असे मानण्यात आलेले आहे आणि म्हणूनच पक्षी शास्त्रांमध्ये सुद्धा मोराला विशिष्ट महत्त्व देण्यात आलेले आहे. अनेक देवदेवता यांच्या मुकुटावर सुद्धा आपण मोरपंख पाहिले आहे. श्रीकृष्ण यांच्या मुकुटावर सुद्धा अनेकदा आपण मोरपंख पाहिलेला आहे.
हा मोरपंख अत्यंत सुशोभित असतो यामध्ये असणाऱ्या रंगामुळे आपल्याला प्रसन्नता वाटत असते तसेच जर आपण या मोरपंखाचा विधिपूर्वक आपल्या घरामध्ये आणल्यास आपल्याला खूप सारे फायदे सुद्धा प्राप्त होतात. वास्तुशास्त्रानुसार मोरपंख आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो तसेच नवग्रहापैकी कोणत्याही ग्रहाची जर तुमच्यावर वक्र दृष्टी असेल तर अशावेळी ग्रहाची शांती करण्यासाठी सुद्धा मोरपंख अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
मोरपंख हो आपल्या घरामध्ये ठेवल्याने आपल्याला काय काय फायदे होतात? घराच्या नेमक्या कोणत्या दिशेला आपल्याला मोरपंख ठेवायला पाहिजे? नजर दोष झाल्यावर , आपल्यावर शत्रूचा नियंत्रण जास्त प्रमाणामध्ये असेल, शत्रुपीडा दूर करायची असेल तर अशा वेळीसुद्धा मोरपंख आपल्याला उपयोगी ठरतात तसेच विद्यार्थ्यांना विद्या प्राप्त करायची असेल तर अशा वेळीसुद्धा मोरपंख कशा पद्धतीने कार्य करतो याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जानणार आहोत.
तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करत आहेत आणि यामुळे आपल्या घरातील सदस्य नेहमी आजारी पडत असतील तर अशा वेळी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती श्री गणेशाची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करायची आहे आणि या मूर्तीच्या दोन्ही बाजूला मोरपंख लावायचे आहेत. असे केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा लवकरच दूर होते आणि आपल्या घरातील सदस्यांना सुख शांती वैभव व यश प्राप्त होते.
जर तुमचे प्रवेशद्वार वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या दिशेला असेल तर अशा वेळी वास्तुदोष दूर करण्यासाठी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तीन मोर पंख जरूर ठेवावेत. जर तुमच्यावर एखाद्या ग्रहाचा कोप असेल किंवा ग्रह शांत नसेल तर अशा वेळी आपण आपल्या घरामध्ये मोरपंख आणायचा आहे आणि त्यावर गंगाजल शिंपडून आपल्या घरातील अशा कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे जिथे कोणाचे लक्ष जाणार नाही असे केल्याने आपल्या वरील ग्रह शांत होतील आणि त्यांचा प्रभाव सुद्धा कमी होईल.
जर आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला नजर बाधा, नजर दोष झाला असेल किंवा एखाद्या लहान मुलांना नजर लागली असेल तर अशा वेळी रात्री झोपताना त्या व्यक्तीच्या किंवा मुलाच्या उशीखाली आपल्याला एक मोर पंख ठेवायचा आहे आणि सकाळी उठल्यावर ते मोरपंख वाहत्या पाण्यामध्ये किंवा विहिरीमध्ये विसर्जित करायचे आहे असे केल्याने जर तुम्हाला कोणतीही बाधा झाली असेल तर ती नजर निघून जाते.
आपल्या घरातील लहान मुलांना अभ्यासामध्ये मन लागत नसेल त्यांची स्मरणशक्ती कमजोर असेल तर अशा वेळी माता सरस्वतीची मूर्ती त्यांच्या अभ्यास घरांमध्ये ठेवून त्यापुढे एक मोरपंख आपल्या ठेवायचा आहे माता सरस्वतीची प्रार्थना व मंत्र जप करायचा आहे.असे केल्याने आपल्याला काही दिवसांमध्येच फरक जाणवू लागेल आणि आपल्या घरातील विद्यार्थी चांगल्या पद्धतीने अभ्यास करू लागतील.
जर तुम्हाला एखादा शत्रू वारंवार त्रास देत असेल, शत्रूकडे पासून तुम्ही त्रस्त असाल तर अशावेळी आपल्याला हनुमान जी यांच्या मंदिरात जायचे आहे आणि हनुमान जी यांच्या कपाळवरील सिंदूर घेऊन तो मोर पंखास लावायचा आहे आणि आपल्या समस्या सांगायचे आहेत असे केल्याने सुद्धा लवकरच दूर होते. जर तुम्हाला मनाची इच्छा ,फळ प्राप्ती करायचे असेल तर अशावेळी तुम्ही राधाकृष्ण यांच्या मंदिरामध्ये जाऊन एक मोरपंख अर्पण करू शकता किंवा आपल्या घरामध्ये जर श्री कृष्णाची मूर्ती असेल तर श्री कृष्णा च्या कपाळावर मुकुटावर मोरपंख लावू शकता असे केल्याने तुमच्या जीवनातील अडचणी पूर्णपणे नष्ट होऊन जातील आणि तुमच्या मनाच्या ज्या काही इच्छा अतृप्त आहेत त्या पूर्णपणे पूर्ण होतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.