नवीन वर्ष सुरु होत आहे ही 1 वस्तू नक्की खरेदी करा. वर्षभर पैशाची कमी भासणार नाही.
मित्रांनो नवीन वर्षास सुरवात होणार आहे आणि हे नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी आपण जर आपल्या घरात काही वस्तू खरेदी करून आणल्यास आपल्या घरात मोठ्या प्रमाणात सकरात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि ज्या ठिकाणी सकारत्मक ऊर्जा असते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास हा नक्कीच निर्माण होतो. येणारं वर्ष सुख समाधानाचं जावं, घरामध्ये आजारपण येऊ नये, घराला नजर लागू नये, शनी दोषांपासून व ग्रह दोषांपासून आपलं घर वाचावं तसेच आपल्या घरात पैशाचा ढीग लागावा, माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी या साठी या ५ वस्तू आपण आपल्या घरी नक्की आणाव्या. नवीन वर्ष सुरु होणार आहे आणि हे वर्ष सुरु होण्या पूर्वी या वस्तू नक्की खरेदी करा.
१. लक्ष्मी-गणेशाची मूर्ती
आपण दिवाळी किंवा अन्य महत्वाच्या प्रसंगी लक्ष्मी गणेशाची मूर्ती खरेदी करतो. मित्रांनो नवीन वर्ष सुरु होत आहे आणि या शुभ प्रसंगी आपण जर लक्ष्मी- गणेशाची मूर्ती खरेदी करून घरी आणली तर संपूर्ण वर्षभर आपल्या घरात सुख-समृद्धी राहील. धन दौलतीने आपलं घर परिपूर्ण बनेल. याच कारण असं आहे कि भगवान श्री गणेश हे विघ्णहर्ता आहेत. आपल्या घरावर व कुटुंबावर जे काही दुःख , संकट आणि विघ्न येईल ते ते हरण करण्याचं काम श्री गणेश करतात. तसेच माता लक्ष्मी हि धनाची देवता आहे. धन वृद्धी होण्यासाठी, सुख समृद्धी ची वाढ होण्यासाठी आपण माता लक्ष्मी ची मूर्ती नक्की खरेदी करा. या मूर्ती खरेदी करताना लक्ष्मी आणि गणेश एकत्र असतील ,एका ठिकाणी , एकाच मूर्तीत असतील याची आपण काळजी घ्यावी.
२. गोड वस्तू
दुसरी गोष्ट म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या तारखेला म्हणजेच १ जानेवारीला आपल्या घरातील जो कर्ता पुरुष आहे जो कमवतो अशा पुरुषाने किंवा अशा स्त्रीने गोडधोड काहीतरी आपल्या घरी नक्की घेऊन यावं. असं म्हणतात कि प्रत्येक शुभ कार्यामध्ये साखर हि असायला हवी. थोडक्यात म्हणजे गोड वस्तूने आपण सुरुवात करत असतो आणि म्हणूनच नवीन वर्ष सुरु होत आहे आणि या नवीन वर्षाची सुरुवात अल्हाददायक व्हावी, उत्साही वातावरणात व्हावी या साठी आपण मिठाई आपल्या घरी आणावी आणि सर्वात प्रथम आपल्या घरातील देवघरात ठेवावी. देवाला भोग चढवावा आणि मग नंतरच ती मिठाई आपल्या घरातील सर्वांनी एकत्र बसून खावी. असं केल्याने विजयी प्राप्ती होते म्हणजेच आपल्या घरात जो काही व्यवसाय असेल, नोकरी किंवा उद्योग असेल ते प्रत्येकामध्ये यश प्राप्त होते. त्या मध्ये कोणत्याही अडचणी येत नाही.
३. हनुमान प्रतिमा
मित्रांनो शक्य झाले तर पंचमुखी हनुमानाची प्रतिमा वा फोटो आपण नक्की खरेदी करा. आणि आपल्या प्रवेश द्वारावर्ती हा फोटो १ तारखेला नक्की लावा. असं म्हणतात ज्या ठिकाणी हनुमानाची प्रतिमा असते त्या घरावरती शनीचा दोष लागत नाही. भूत प्रेत या गोष्टी त्या घरापासून लांब राहतात. कोणत्याही प्रकारची दृष्ट शक्ती, दृष्ट आत्मा त्या घरावर ढुंकूनही पाहत नाही. आपलं भाग्य, आपलं नशीब प्रबळ करण्यासाठी श्री हनुमानाची प्रतिमा आपल्या प्रवेश द्वारावरती लावावी.
४. मोरपंख
मोरपंखची खरेदी हि सुद्धा आपण १ तारखेला किंवा त्याच्या पूर्वी करा. मोरपंख हा मुळातच पवित्र मानला जातो. भगवान श्री कृष्णांना मोर पंख हा अतिशय प्रिय होता आणि त्यांनी मोर पंखाला आपल्या मुकुटावर स्थान दिलं होत. वस्तू शास्त्र सुद्धा असं मानत की ज्या ज्या ठिकाणी मोर पंख असेल त्या ठिकाणच प्रत्येक काम हे यशस्वी होते. आणि त्यातून धन प्राप्ती सुद्धा होते. हा मोर पंख खरेदी केल्यांनतर तो तुमच्या घराच्या उत्तर दिशेला लावावा. जेणेकरून धन प्राप्ती मोठ्या प्रमाणात होईल. घरात जर सतत आजारपण असेल तर तुम्ही २ मोर पंख खरेदी करू शकता. १ मोर पंख तुम्ही उत्तरेला लावा जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा राहील. भगवान कुबेर प्रसन्न होतील आणि दुसरा मोर पंख हा पूर्व दिशेला लावा. पूर्व दिशेला लावलेल्या मोर पंखांमुळे घरामध्ये आजारपण राहत नाही. ईशान्य दिशा सुद्धा मोर पंख लावण्यासाठी उत्तम आहे.
५. Laughing buddha
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.