हि सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री करणार आहे नववर्षाच्या सुरुवातीलाच लग्न..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपले स्वागत आहे. अभिनेत्री नेहा पेंडसे लवकरच लग्न करणार आहे. तिने आपल्या सोशल मीडियावर नवीन वर्षाचं अवचित्त साधून बिसिनेसमॅन शार्दूल सिंग ब्यास यांच्यासोबत किस करतानाचा फोटो शेअर केला आहे. यापूर्वी देखील नेहाने दोघांचा फोटो शेअर केला होता तेव्हा चाहत्यांनी तिच्या हातातली रिंग पाहून तिचा साखरपुडा झाल्याचा अंदाज लावला होता. परंतु नेहाने त्यावेळी तिचे रिलेशनशिप जाहीर केले नव्हते. मात्र आता तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे कि ति ५ जानेवारी रोजी महाराष्ट्रीयन पद्धतीने विवाहबंधनात अडकणार आहे. एवढच नाही तर नेहाच्या घरी लग्नापुर्वीच्या सर्व पूजा आणि लग्नाची तयारी देखील जोरदार चालू आहे.
latestly.com
नेहाचे काही पूजेचे फोटो सोशल मीडिया अकाउंट वर वायरल होत आहेत. शार्दूल सिंग ब्यास हे मोठे बिसिनेसमॅन आहेत. खूप दिवसांपासून ते रिलेशनशिप मध्ये आहेत. शार्दूल सिंग ब्यास यांनी नेहाच्या बर्थडे च्या दिवशी तिला एक कार देखील गिफ्ट केली होती. एका मीडिया चॅनेल शी बोलताना नेहा म्हणाली कि मी माझ्या स्वप्नातल्या राजकुमाराशी लग्न करत आहे. मी नवीन आणि सुंदर कुटुंबात जात आहे.
तर मित्रांनो शार्दूल सिंग ब्यास आणि नेहा ची जोडी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. तसेच DarjaMarathi कडून नेहा पेंडसे ला तिच्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्या.