मूतखडा, किडनी निरोगी, पोट साफ यासाठी करा हे घरगुती उपचार; मरेपर्यंत होणार नाही पित्त.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ऊसा बद्दल ची माहिती जाणून घेणार आहोत. ऊसाचे अनेक असे फायदे आहेत की ते आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरतात. उस खाल्ल्यामुळे आपले दात स्वच्छ तसेच मजबूत होण्यास मदत होते. उसाचा एक तुकडा जरी आपण चावून चावून खाल्ल्यास आपले दात पिवळसर असतात त्यांचा रंग बदलण्याची क्षमता उसामध्ये असते म्हणूनच तुमचे दात पिवळे असतील तर तुम्ही नेहमी ऊस चावून खाल्ला पाहिजे.
त्याचबरोबर उस चावून जो आपण त्याचा रस पीत होतो अगदी शुद्ध असतो आणि यंत्राद्वारे जो रस काढला जातो तो पचायला सुद्धा जड असतो. उसाचे सेवन नियमितपणे केल्यामुळे आपली शरीरातील किडनी असते ती निरोगी राहते तसेच मूत्र मालिकेमध्ये जे काही संक्रमण व इन्फेक्शन असतात ते इन्फेक्शन उसाचे रस प्यायला मुळे होत नाही त्याचबरोबर ,त्वचा, हाडे व केसांच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या दूर करण्यासाठी उसाचे सेवन नियमितपणे केले गेले पाहिजे.
ज्या लोकांना पित्ताचा त्रास असतो अशा लोकांनी जर उसाचा ताजा रस नियमितपणे घेतला तर त्यांच्या पित्ताची संबंधित सर्व समस्या लवकरच दूर होतात. हाच उसाचा रस आहे त्याला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये भूमी रस असे म्हणतात. ज्या व्यक्तींना मुतखड्याचा त्रास आहे अशा व्यक्तीने उसाचा रस प्यायला पाहिजे त्याचबरोबर उस चावून खाल्ल्यास मुतखडाचे तुकडे होऊन बाहेर पडण्यास मदत होते.
म्हणूनच जेव्हा केव्हा हा तुम्हाला ऊस उपलब्ध होईल तेव्हा तो चावून किंवा त्याचा ताजा रस पिणे शरीरासाठी नेहमी चांगले असते. जर तुम्हाला काळ्या रंगाचा ऊस मिळाला तर शरीरासाठी तो उत्तम असतो म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला भविष्यात कधीच मुतखड्याचा त्रास होऊ नये म्हणून शक्य तेवढं उसाचा रस प्या.
ताज्या रसामध्ये जर तुम्ही लिंबू पिळून,काळे मीठ व अदरक टाकून प्यायल्यास तुम्हाला पोट साफ होण्यास मदत होते कारण की उसामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि फायबर सारखे गुणधर्म असतात. जे तुमच्या शरीरासाठी खूपच आवश्यक असतात आणि तुमचे शरीर सुद्धा निरोगी राखण्यासाठी मदत करत असतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.