उभ्या आयुष्यात पुन्हा तोंड येण्याची समस्या कधीच उद्भवणार नाही; १ दिवसातच तोंड येण्याची समस्या होईल दूर.!

उभ्या आयुष्यात पुन्हा तोंड येण्याची समस्या कधीच उद्भवणार नाही; १ दिवसातच तोंड येण्याची समस्या होईल दूर.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुमचे वारंवार तोंड येत असेल ,वारंवार तोंड येण्याची समस्या तुम्हाला उद्भवत असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूपच महत्वपूर्ण ठरणार आहे. या लेखात वारंवार तोंड येण्याची समस्या आहे ती कायमची दूर होणार आहे. ही समस्या दूर करण्यासाठी आपण आज उपाय करणार आहोत. तो अगदी सोपा साधा सरळ आहे. घरातली काही वस्तूंचा वापर करूनच आपण हा उपाय करणार आहोत.

अनेकदा तोंड आल्यामुळे आपल्याला व्यवस्थित जेवता येत नाही, काही पदार्थ सेवन करता येत नाही, कोणत्याही कामामध्ये आपले चित्त लागत नाही. जर ही छोटीशी समस्या असली तरी ती खूपच त्रासदायक असते. या समस्येने ग्रस्त असाल तर चला मग जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत? हे सर्व आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

तोंड येण्याची काही प्रमुख कारणे असतात जर आपण ती कारणे समजून घेतली तर आपले तोंड येणारच नाही.  तुम्ही खूप सारे मसालेदार पदार्थ सेवन करत असाल, मद्यपान करत असाल, तेलकट तिखट बाहेरील जंकफूड खात असाल, अपुरी झोप अति जागरण करत असाल, आपल्या जेवणाची वेळ चुकली असेल, आपल्या शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढले असेल किंवा अति ऍसिडिक पदार्थांचे सेवन जर तुम्ही करत असाल तर तुमचे तोंड हे नक्की येऊ शकते. ताप आल्यामुळे आपल्या शरीराचे तापमान सुद्धा वाढते त्यामुळे उष्णतेमुळे सुद्धा आपले तोंड येऊ शकते. जर आपण आपल्या दातांची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यास हे सुद्धा तोंड येण्याची कारण बनू शकते.

जर तुम्ही ही कारणे टाळली तर तुमचे तोंड भविष्यात कधीच येणार नाही परंतु तोंड आल्यावर आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहेत त्यासाठी सर्वप्रथम आपण एका ग्लासमध्ये पाणी घेणार आहोत. त्यानंतर आपल्या दुसरी वस्तू लागणार आहे ते मीठ. मीठ आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा मीठ घ्यायचे आहे आणि ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहे त्यानंतर जेव्हा कधीही भविष्यात तुम्हाला तोंड येईल अशा वेळी सर्वप्रथम साध्या पाण्याने तोंड स्वच्छ करून त्यानंतर मीठ व साधे पाण्याचे जे मिश्रण आहे त्याने दिवसभरातून दोन वेळा गुळण्या करायचे आहेत , असे केल्याने तुमचे तोंड येण्याची समस्या आहे ती दूर होईल.

त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तो उपाय करण्यासाठी आपल्याला फणस सारखी दिसणारी एक वस्तू म्हणजेच बाळ फणस लागणार आहे. यालाच आपण फणसाचे लहान फळ सुद्धा म्हणतो. हे फळ तोंड येण्याच्या समस्येवर अतिशय गुणकारी ठरते. तुम्हाला तोंड आले असेल अशावेळी या बाळ फणसाची राख तुम्ही चुलीमध्ये किंवा गॅसवर भाजून त्याची राख ज्या ठिकाणी तोंड आलेले आहे किंवा फोड आलेले आहे छाले आलेले आहेत. अशा ठिकाणी ती राख आपल्याला लावायची आहे. असे काही महत्त्वाचे उपाय केल्यामुळे तुमची तोंड येण्याची समस्या लवकरच दूर होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *