तोंडाचा घाण वास दोन मिनिटात घालवा; या सात उपाय पैकी कोणताही एक उपाय करा.!

तोंडाचा घाण वास दोन मिनिटात घालवा; या सात उपाय पैकी कोणताही एक उपाय करा.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तोंडाचा घाण वास येणे हि समस्या म्हणजे मुखदुर्गंधी समस्या अनेकांना असते. कांदा लसूण ,मासे यासारखे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या तोंडातून घाणेरडा वास येऊ लागतो त्याचबरोबर श्वासाचा सुद्धा घाण वास येऊ लागतो. आपल्या तोंडाचा नेहमी वास येत असेल तर आपल्याला इतरांशी बोलताना आत्मविश्‍वास येत नाही आणि नेहमी संकोचल्यासारखे वाटत राहते. अनेकदा समोरची व्यक्ती सुद्धा आपल्या सोबत बोलण्याचे टाळत असते म्हणूनच या समस्येवर वेळीच उपचार करून या समस्येचे निदान करणे गरजेचे असते.

बाजारात यासाठी अनेक महागडी उत्पादने उपलब्ध आहेत पण त्यांची परिणामकारकता आपल्याला माहिती आहे म्हणून तोंडाच्या दुर्गंधीवर आपल्या घरगुती उपाय केल्यास त्यातून कायमची सुटका होते. तोंडाला दुर्गंधी येण्याचे मुख्य कारण म्हणजे अपचन सारखे आजार असणे. अपचनाच्या समस्यांमुळे पोटात साचलेल्या अन्नाची दुर्गंध श्वासाद्वारे बाहेर पडत असते आणि तोंडाचा सतत वास येत राहतो पण जेवण झाल्यानंतर तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा त्रिफळा चूर्ण टाकून प्यायल्यास पोट साफ होते त्याचबरोबर अपचनाची समस्या सुद्धा नष्ट होऊन तोंडाचा घाणेरडा वास येणे सुद्धा बंद होतो.

म्हातारपणात तोंडात लाळ निर्माण होण्याचे प्रमाण सुद्धा कमी झाल्यामुळे म्हाताऱ्या माणसांची दुर्गंधी सतत येत असते. वारंवार चूळ भरून तोंडाची स्वच्छता राखणे हाच यासाठी एक महत्त्वाचा पर्याय असतो. आपण सर्वजण सकाळी उठल्यावर ब्रश करत असतो परंतु हे करून सुद्धा तोंडाची दुर्गंधी जात नाही अशा वेळी दिवसभरातून दोन-तीन वेळा ब्रश करणे यासाठी फायद्याची ठरते. दातांमध्ये अडकलेले अन्नकण चूळ द्वारे सुद्धा तुम्ही बाहेर काढू शकता.

हे कारण सुद्धा अनेकदा दुर्गंधी येण्यासाठी कारणीभूत ठरते, अशा व्यक्तीने जेवण झाल्या नंतर एक लवंग चावून चावून खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होते त्याचबरोबर दातांमध्ये निर्माण होणारी कीड सुद्धा थांबते. सकाळ-संध्याकाळ ब्रेकअप झाल्यानंतर जीभ साफ केल्यानंतर तोंडाची दुर्गंधी कमी होते त्याचबरोबर आपल्या जीभेची चव घेण्याची क्षमता सुद्धा वाढते. त्यामुळे आपल्या घरातील लिंबू सुद्धा आपल्या मुखाची दुर्गंधी दूर करण्यासाठी महत्त्वाचे ठरते यासाठी आपल्याला एक ग्लास कोमट पाण्यामध्ये थोडेसे लिंबू पिळून सकाळ दुपार या पाण्याद्वारे गुळण्या केल्यास आपल्या मुखातील चिकटलेले अन्नकण जंतू नष्ट होतात.

त्या सर्व गोष्टीमुळे आपल्या तोंडाचा वास येणे बंद होते कारण हा उपाय फक्त आपल्याला एका दिवसासाठीच करायचा आहे आणि रोज हा उपाय केल्यास आपले दात झिजू लागतात. आपल्या स्वयंपाक घर मधील मोहरी तेल व मीठ एकत्र करून यांची हलकीशी मालिश हिरड्यांवर केल्यामुळे सुद्धा तोंडाचा वास कमी होतो. ज्या लोकांना तोंडाच्या दुर्गंधी चा वास खूप मोठ्या प्रमाणात जाणवतो.

अशा व्यक्तीने नियमित केल्याने वेलची आणि चार-पाच पुदिना चे पान खायचे आहे असे केल्याने दुर्गंधीचे रूपांतर सुगंधी मध्ये होते. ग्रीन टी पिल्याने सुद्धा तोंडाचा वास येत नाही कारण की ग्रीन टी मध्ये अंतीबॅक्टरियल चे प्रमाण जास्त प्रमाणात असते त्याचबरोबर दालचिनीचा तुकडा गरम पाण्यामध्ये टाकून उकळून प्यायल्याने तोंडाची दुर्गंधी सुद्धा दूर होते. अशा पद्धतीने जर तुम्हाला तोंडाच्या दुर्गंधीचा नायनाट करायचा असेल तर अशावेळी तुम्ही सगळे उपाय करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *